धर्मवीर बलिदान मास – श्लोक क्रमांक ३ – छत्रपती संभाजीमहाराज बलिदान मास श्लोक व संपूर्ण माहिती

Hosted Open
1 Min Read
धर्मवीर बलिदान मास - श्लोक क्रमांक 3

धर्मवीर बलिदानमासश्लोक क्रमांक

श्री संभाजीसुर्यहृदय

राष्ट्रांत धर्म जणुं हा शरीरात प्राण ।

ही निर्मू हिन्दूहृदयीं अति तीव्र जाण ॥

संभाजी छत्रपती म्लेंच्छवधार्थ लढले ।

धर्मार्थ देह त्यजुनी “ध्वजरूप” झाले ॥३॥

आजच्या या तिसर्‍या श्लोकाचा अर्थ-

ज्याप्रमाणे शरीरात प्राण नसेल, तर ते निर्जीव समजले जाते, त्याच प्रमाणे राष्ट्रात धर्म नसणे हेही निर्जीव पणाचे प्रतिक समजले जाते, हि भावना छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या बलिदानातून प्रत्येक हिंदूंच्या मनात प्रज्वलित केली, शंभूराजांनी आपल्या नऊ वर्षांच्या खडतर कारकिर्दीत मुघलांसारख्या म्लेंच्छ शत्रूंचा, तसेच सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या परकीय शत्रूंचा नायनाट केला आणि शेवटी या शत्रूंशी लढत लढत त्यांनी देव, देश आणि धर्मासाठी आपले बलिदान दिले, त्यांनी आपल्या देहाचा त्यांनी देव, देश धर्मासाठी त्याग केला.

आणि शंभूराजे त्यांच्या बलिदानाने भगव्या ध्वजाच्या रुपात आज प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात वास करत आहेत.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *