Hosted Open वर तुमचे मनःपूर्वक स्वागत!

महाराष्ट्राच्या अप्रतिम भटकंतीचा आणि रोड ट्रिप चा अनुभव देणारे मराठी व्यासपीठ

नमस्कार! मी सोमेश. मला प्रवास करायला, नवनवीन ठिकाणे शोधायला आणि त्या ठिकाणामागचा इतिहास, संस्कृती आणि निसर्ग अनुभवायला मनापासून आवडते. माझ्यासाठी प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नाही, तर प्रत्येक ठिकाणाची वेगळी ओळख, त्यामागची कहाणी आणि तिथले अनुभव जवळून जाणून घेण्याची एक संधी आहे.

भारताच्या कानाकोपऱ्यात प्राचीन मंदिरे, भव्य किल्ले, ऐतिहासिक वास्तू, निसर्गरम्य घाटमार्ग, सुंदर समुद्रकिनारे आणि अजूनही अनेकांच्या नजरेपासून दूर असलेली अप्रतिम ठिकाणे आहेत. अशाच ठिकाणांना भेट देऊन त्यांचा इतिहास, वैशिष्ट्ये, संस्कृती आणि माझे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो. मला लिहिण्याचीही आवड आहे, त्यामुळे प्रवास आणि लेखन या दोन्ही आवडींचा सुंदर संगम Hosted Open च्या माध्यमातून साधता आला.

Hostedopen About

यात मला दोन गोष्टी साध्य करता येतात, एक म्हणजे माझ्या प्रत्येक प्रवासाची, अनुभवांची आणि आठवणींची कायमस्वरूपी नोंद करून ठेवता येते; आणि दुसरी म्हणजे त्याच माहितीचा उपयोग भविष्यात इतर प्रवाशांनाही त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी होऊ शकतो. माझ्यासाठी हा केवळ ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न नसून, माझ्या प्रवासाच्या आठवणी जपण्यासोबतच त्या इतरांसाठी उपयोगी ठराव्यात, हा एक छोटासा प्रयत्न आहे.

Hosted Open च्या माध्यमातून प्रवासवर्णनासोबतच एखाद्या ठिकाणाची सविस्तर आणि उपयोगी माहिती देण्यावर माझा भर आहे. काय पाहावे, ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे, कसे पोहोचावे, भेट देण्याची योग्य वेळ कोणती, जवळपास काय पाहता येईल आणि संपूर्ण ट्रिपचे नियोजन कसे करावे याबद्दल शक्य तितकी अचूक आणि अनुभवाधारित माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो. माझ्या प्रवासाच्या आठवणी शब्दबद्ध करून जपता याव्यात, नवीन ठिकाणे शोधण्याची प्रेरणा इतरांनाही मिळावी आणि तुमचा पुढचा प्रवास अधिक आनंददायी व माहितीपूर्ण व्हावा, हीच Hosted Open मागची माझी छोटीशी भूमिका आहे.

भटकंतीची आमची व्याख्या

The Philosophy Behind Our Wanderlust


Explore

नवीन ठिकाणे, ऐतिहासिक स्थळे, प्राचीन मंदिरे आणि off-beat destinations शोधणे आणि त्यामागची वैशिष्ट्ये जाणून घेणे.

Experience

एखाद्या ठिकाणाला फक्त भेट न देता तेथील संस्कृती, निसर्ग, वातावरण आणि प्रवासातील छोटे-छोटे क्षण मनापासून अनुभवणे.

Learn

भेट दिलेल्या प्रत्येक ठिकाणामागचा इतिहास, परंपरा आणि कथा जाणून घेणे आणि प्रत्येक प्रवासातून काहीतरी नवीन शिकणे.

Share

प्रवासातून मिळालेले चांगले तसेच वाईट अनुभव, योग्य माहिती, फोटो आणि practical travel tips इतरांसोबत शेअर करणे.

मागे वळून पाहताना उमटलेल्या पाऊलखुणा

नव्या ठिकाणांचा शोध, इतिहासाची ओढ आणि प्रवासातील अनुभवांची सांगड घालत Hosted Open ने आजवरचा हा सुंदर प्रवास केला आहे.

10 + States

भारतातील विविध राज्यांतील अप्रतिम
ठिकाणांचा शोध.

60+ Districts

60+ जिल्ह्यांमधील संस्कृती, इतिहास
आणि निसर्गाचा अनुभव.

160+ Travel Blogs

इतिहास, किल्ले, मंदिरे, निसर्ग, ट्रेक्स
आणि रोड ट्रिप्सवरील लेख.

32K+ Annual Readers

दरवर्षी 32,000+ वाचकांचा Hosted Open
वरील विश्वास.

या वेबसाईटवर तुम्हाला काय मिळेल?

ऐतिहासिक स्थळांबद्दल विस्तृत माहिती

किल्ले, राजवाडे आणि ऐतिहासिक वारशाची सविस्तर, अनुभवाधारित माहिती जाणून घ्या.

प्राचीन मंदिरे आणि त्यांचा इतिहास

प्राचीन मंदिरे, त्यांचा इतिहास, स्थापत्यकला आणि धार्मिक महत्त्वाची माहिती मिळवा.

आडवाटेवर लपलेली पर्यटनस्थळे

गर्दीपासून दूर असलेली सुंदर, अनोखी आणि आडवाटेवरची पर्यटनस्थळे शोधा आणि फिरा.

रोड ट्रिप प्लॅनिंगसाठी उपयुक्त मार्गदर्शन

कुठे थांबायचे, काय पाहायचे आणि किती खर्च येईल यासह रोड ट्रिपचे नियोजन करा.

प्रवासातील फोटो आणि अनुभव

प्रवासातील सुंदर क्षण, प्रत्यक्ष अनुभव आणि खास आठवणी छायाचित्रांसह अनुभवता येतील.

प्रवासाशी संबंधित टिप्स आणि ट्रिक्स

प्रवास अधिक सोपा, सुरक्षित, आनंददायी करण्यासाठी उपयुक्त टिप्स, ट्रिक्स जाणून घ्या

आमचे काही लोकप्रिय Blogs

Sindhudurg road trip plan

सिंधुदुर्ग डायरी: एक प्रवास, अनेक अनुभव

कोल्हापूर पासून जवळ कुठे फिरायचं? या प्रश्नाचे उत्तर आणि शोध येऊन थांबला तो संबंध महाराष्ट्र भर पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यापाशी

Panhalgad te pawankhin mohin

पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम

पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम या वर्षी पावसाळ्यात करायचे नियोजन आखले ते ही जुलै च्या महिन्यात ज्या दिवशी घोडखिंडी मध्ये हा रणसंग्राम झाला त्या पौर्णिमेला.

महाराष्ट्र कोकण कोस्टल रोड ट्रिप प्लॅन

हा प्रवासात मंदिरे, समुद्रकिनारे, पूल, आंबा, नारळ, सुपारी यांच्या बागा, खारफुटीच्या जंगले, डोंगर दऱ्या, किल्ले, नद्या ओढे, सूर्योदय, सूर्यास्त या सर्वानी भरलेला आहे.

one-day-trip-near-pune-with

मुळशी आणि ताम्हिणी घाट Travel Guide

पुण्याच्या आसपास एक दिवसात फिरण्यासाठी खूप ठिकाणं आहेत, ताम्हिणी घाट हा one-day trip साठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. मी स्वतः अनेक वेळा ट्रिप केली आहे.

Off-beat आणि कमी माहित असलेली ठिकाणे

gaganbawada

सह्याद्रीच्या कुशीत हरवलेला स्वर्ग

जंगलं, धबधबे, थंड हवामान यामुळे गगनबावडा हे महाराष्ट्रातील अप्रतिम पर्यटन स्थळ आहे.

keshavraj mandir

केशवराज मंदिर दापोली

केशवराज मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात साधारण ७km आसूद गावात आहे.

Tarapur Beach

तारापूर बीच हे एक रमणीय ठिकाण

तारापूर बीच मुंबईच्या उत्तरेस 120 km असून शांत आणि सुंदर आहे.

aaravi beach

मनाला मोहून टाकणारा आरावी बीच

सुपारीच्या आणि नारळीच्या झाडांमुळे इथला परिसर आणखी हिरवागार आणि रमणीय वाटतो

satyamangalam forest

सत्यमंगलम जंगलातील थरारक अनुभव

रस्त्याच्या डाव्या बाजूला बांबूच्या बेटाच्या बाजूलाच चार हत्ती एकदम शांतपणे उभे होते.

Coorga forest

पुष्पगिरी जंगलातून मंगलोर ते म्हैसूर

दोन्ही बाजूंने जंगल, कॉफीचे मळे, मधून रस्ता, सुरक्षेसाठी गार्ड आणि 12 फूट उंचीचे कुंपण.

तुमच्या प्रवासाचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा!

महाराष्ट्राच्या अप्रतिम भटकंतीचा आणि रोड ट्रिपचा अनुभव देणारे मराठी व्यासपीठ.
तुमच्या प्रवासाचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा.