आज रविवार होता. कोणताही मोठा प्लॅन नव्हता, कोणतीही धावपळ नव्हती. फक्त कुटुंबासोबत थोडा वेळ शांत निसर्गात घालवायचा आणि संध्याकाळपर्यंत परत यायचं. इतकंच साधं ठरवलं होतं. पण कधी कधी असेच साधे प्लॅन आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणी देऊन जातात. पुण्यात राहणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न नक्कीच पडतो, “एक दिवसात कुठे फिरायला जावं?” असा पर्याय हवा असतो जो family friendly असेल, फारसा थकवणारा नसेल, ट्रॅफिकचा त्रास नसेल आणि शेवटी “worth it” वाटेल.
पुण्याच्या आसपास एक दिवसात फिरण्यासाठी खूप ठिकाणं आहेत, पण वैयक्तिक अनुभवातून सांगायचं झालं तर मुळशी आणि ताम्हिणी घाट हा one-day trip साठी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. मी स्वतः अनेक वेळा इथे ट्रिप केली आहे, आणि प्रत्येक वेळी हा प्रवास काहीतरी नवीन देऊन जातो.
पुणे शहर सोडल्यानंतर काही वेळातच निसर्गाचा खरा खेळ सुरू होतो. उंच हिरवेगार डोंगर, अथांग पसरलेलं मुळशी धरणाचं पाणी, वळणदार आणि शांत घाट रस्ते, आजूबाजूला दाट झाडी, आणि मध्येच लागणाऱ्या छोट्या-छोट्या खाऊच्या टपऱ्या. हे सगळं अनुभवताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. पुण्याच्या इतक्या जवळ असा निसर्ग अनुभवायला मिळणं हीच या ट्रिपची खरी खासियत आहे.
या प्लॅनचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो सर्वांसाठी योग्य आहे. ड्रायविंग खूप आरामदायी आहे, त्यामुळे लांब प्रवासाचा ताण येत नाही. कुटुंबातील सिनिअर लोकांसाठीही हा प्रवास सोयीचा आहे, आणि लहान मुलांसाठी तर हा एक वेगळाच आनंददायी अनुभव ठरतो. निसर्ग, रस्ते आणि छोट्या छोट्या थांब्यांमुळे. म्हणूनच, जर तुम्ही “simple पण memorable” असा एक दिवसाचा प्लॅन शोधत असाल, तर मुळशी + ताम्हिणी घाट हा पर्याय नक्कीच ट्राय करण्यासारखा आहे.
ट्रिपचा संपूर्ण आढावा पुढीलप्रमाणे:
रूट: पुणे – मुळशी डॅम – ताम्हिणी घाट – पुणे
एकूण अंतर: 130 किमी
वेळ: ९-१० तास (निवांत ट्रिप साठी)
Ideal departure: सकाळी 6 ते 7
परत येणे: संध्याकाळी 6-7
प्रवासाची सुरुवात: पुणे ते मुळशी
सकाळी 6:15 ला आम्ही पुण्यातून निघालो. रविवारी असल्यामुळे शहर अजून झोपेतच होतं. रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती, आणि तोच या ट्रिपचा पहिला plus point ठरला. आमचा रूट ठरलेला होता कारण मी बऱ्याच वेळा त्याच रस्त्याने प्रवास केलाय. तो म्हणजे चांदणी चौक – पिरंगुट – मुळशी. मला तर चांदणी चौक मार्गे ताम्हिणी ला गेल्याशिवाय मजाच येत नाही. NH४ सोडून जेंव्हा चांदणी चौकातून आपण पिरंगुट कडे गाडी वळवतो, तो फील च वेगळा आहे. अचानक शहराची धावपळ मागे पडते. मोठे flyovers, traffic आणि horn यांचं जग संपतं. आणि समोर सुरू होतो शांत, हिरवा, आणि थोडासा धुक्यात हरवलेला रस्ता.
सकाळी लवकर निघाल्यामुळे traffic almost नव्हता, हवामान थंड आणि fresh होतं. drive खूप smooth वाटली. रस्त्याची स्थिती पिरंगुट पर्यंत normal city road आहे, आणि तिथून पुढे घाट सुरू होतो. रस्ता पूर्ण पाने सुंदर आणि मस्त आहे. पिरंगुटनंतर लगेचच city vibe संपतो आणि निसर्ग सुरू होतो, हा transition खूप छान वाटतो.
- Start Time: सकाळी 6:00-7:00 best (traffic almost नाही)
- Route: चांदणी चौक – पिरंगुट – मुळशी (scenic + smooth)
- Distance & Time: ~45 किमी | 1.5–2 तास relaxed drive
- Best Part: चांदणी चौकानंतर लगेच city ते nature transition
- Road Condition: पिरंगुटपर्यंत normal road, पुढे घाट + हलके turns
- Weather Feel: थंड, fresh हवा + सकाळचं हलकं धुकं
- Traffic Tip: 9 नंतर tourist vehicles वाढतात
- Driving Tip: घाटात slow drive + overtaking टाळा
मुळशी धरण – शांततेचा सुंदर अनुभव
सुमारे 7:30-8 च्या दरम्यान आम्ही मुळशीला पोहोचलो. तिथे गेल्यावर जाणवलं कि हे तर पुण्याच्या इतका ज्वाला आहे आणि आपण वरचेवर इकडे यायला हवं. मुळशीला धरणाचे अथांग बॅकवॉटर आहे, आणि सकाळचा सूर्योदय इथून मस्त अनुभवता येतो. आजूबाजूला लहान लहान टेकड्या, पूर्ण शांत वातावरण, पाणी हे सगळं इतकं भारी वाटत होत कि आम्ही कितीतरी वेळ शांत बसून बघत होतो. त्या नंतर एका छोट्या tapri वर चहा घेतला, फोटो काढले, कुटुंबासोबत असल्यामुळे घाई केली नाही आरामात enjoy केलं. इथे सकाळी 8 आधी पोहोचलं तर best आहे. weekend ला 10 नंतर crowd वाढतो.
- Arrival Time: सकाळी 7:30–8 ला पोहोचलो (perfect timing)
- Distance Advantage: पुण्याजवळच असल्यामुळे quick getaway feel
- Highlight: धरणाचे अथांग backwaters + सकाळचा सुंदर view
- Environment: शांत वातावरण + लहान टेकड्या + fresh हवा
- Experience: काही वेळ शांत बसून nature enjoy केला
- Activity: tapri वर चहा + फोटो + relaxed family time
- Best Time: सकाळी 8 आधी पोहोचणं ideal
- Crowd Tip: weekend ला 10 नंतर गर्दी वाढते
मुळशी ते ताम्हिणी घाट – ट्रिपची खरी मजा
मुळशी सोडल्यानंतर 15–20 मिनिटांत ताम्हिणी घाट सुरू होतो. आणि खरंच सांगतो असा वाटत कि आत्तापर्यंत जे मागितले ते तर फक्त ट्रेलर होता, खरा पिक्चर तर इकडे आहे. इथून ट्रिप worth it वाटायला लागते. उंच डोंगर, छोटे छोटे ओढे, पाण्याची लहान लहान डबकी/तळी धबधबे सगळं एकदम कडक आहे. घाटातला अनुभव Real Feel देणारा ठरतो, वळणदार रस्ते, दोन्ही बाजूला दाट जंगल, पावसाळ्यात धुकं + धबधबे अर्रर्रर्र हे सगळं बघितल्यावर कोणीही ताम्हिणीच्या प्रेमात पडेल. माझे कित्येक ऑफिस मधील मित्र जे उत्तर भारतातील आहेत त्यांनी स्वतः ताम्हिणी बघितल्यावर म्हणालेत कि हिमालया पेक्षा ताम्हिणी, आणि सह्याद्री सुंदर आहे.
आम्ही गेलो तेव्हा हलकं धुकं होतं, visibility ठीक होती, Driving करताना महत्वाचं कि काही turns sharp आहेत, काही ठिकाणी road narrow आहे, trucks कमी पण tourist vehicles जास्त असतात तर शांत आणि सावकाश ड्राईव्ह करा. उगाचच गरज नसताना ओव्हरटेक करणे टाळा.
- Distance from Mulshi: 15–20 मिनिटांत Tamhini Ghat सुरू
- Main Highlight: इथूनच ट्रिप “worth it” वाटायला लागते
- Scenery: उंच डोंगर, ओढे, लहान तळी, धबधबे + दाट जंगल
- Best Season Feel: पावसाळ्यात धुकं + waterfalls = peak experience
- Driving Experience: वळणदार रस्ते → real घाट feel
- Visibility: सकाळी हलकं धुकं, पण manageable
- Traffic Pattern: trucks कमी, tourist vehicles जास्त
- Driving Tip: sharp turns + narrow road → slow drive, overtaking टाळा
परफेक्ट स्टॉप:
१. मुळशी धरण
२. ताम्हिणी घाट
३. धबधबे
४. जंगलाचे एरिया
जेवणाचा अनुभव:
लोकल हॉटेल मध्ये साधं घरगुती जेवण जेवलो, जेवण मस्त होते. आणि दर सुद्धा कमी होते. १४० रुपये मानसी खर्च जेवणाचा आला. त्याच बरोबर इतर हि मोठे रेस्टोरंट आहेत तिथे हि तुम्ही जाऊ शकता.
पूर्ण खर्च:
| खर्च प्रकार | अंदाजे रक्कम |
|---|---|
| पेट्रोल | ₹600-₹900 |
| नाश्ता + चहा | ₹200-₹300 |
| जेवण | ₹600-₹1000 |
| इतर | ₹200 |
फॅमिली साठी खास Tips:
१. सकाळी लवकर निघा.
२. आरामदायी चप्पल किंवा बूट घाला.
३. किरकोळ खाद्यपदार्थ आणि पाणी सोबत ठेवा.
४. इंटरनेट नीट चालत नाही त्यामुळे ऑफलाईन मॅप डाउनलोड करा.
५. कॅश सोबत ठेवा.
६. गाडीचे सर्व डॉक्युमेंट ठेवा.
७. पार्किंग करताना जमीन घट्ट आहे कि नाही हे तपास.
८. फोटो काढायच्या नादात रिस्क घेऊ नका.
९. मुळशी धरणाच्या पाण्यात पोहायला उतरू नका.
१०. धबधब्यात जाताना काळजी घ्या.
पुण्याजवळ १ दिवसात कुटुंबासोबत फिरण्यासाठी मुळशी + ताम्हिणी घाट हा सर्वात balanced, safe आणि सुंदर पर्याय आहे. तर मग तुम्ही सुद्धा कुटुंबासोबत फिरायचा प्लॅन करत असाल तर एकदा तरी ताम्हिणी ला जाऊन नक्की या.

