धर्मवीर बलिदान मास – श्लोक क्रमांक ७ – छत्रपती संभाजीमहाराज बलिदान मास श्लोक व संपूर्ण माहिती

Hosted Open
1 Min Read
धर्मवीर बलिदान मास - श्लोक क्रमांक 7

धर्मवीर बलिदान मास –  श्लोक क्रमांक क्र.

श्री संभाजीसुर्यहृदय

संभाजीजाळ तदवत् शिवसूर्यजाळ ।

निर्मूनी हिन्दूहृदयीं बनू म्लेंच्छकाळ ॥

हे हिन्दूराष्ट्र करूनी यवनांतकांचे ।

संकल्प पूर्ण करूं या शिवभूपतींचे ॥७॥

आमच्या या सातव्या श्लोकाचा अर्थ:-

प्रत्येक भारतीयाने शिवछत्रपती व शंभूछत्रपती रुपी धगधगणारा लाव्हा, ज्वलंज्वलंतेजस अग्नी, विचारांची मशाल आपल्या हृदयात साठवली पाहिजे, ज्या प्रमाणे शिवछत्रपतींचा आदर्श समोर ठेवून शंभूराजांनी अनेक म्लेंच्छ शत्रूंचा नाश करून शिवछत्रपतींचे स्वराज्य रक्षण्याचे अतुलनीय कार्य केले आणि शेवटपर्यंत या कार्यात जराही तडजोड केली नाही.

त्याचप्रमाणे आपण आज शिवशंभूराजांचा आदर्श समोर ठेवून आपल्या देव, देश आणि धर्मापुढील शत्रूंचा काळ ठरुन हा आपला हिंदुस्थान हा पूर्णतः यवनमुक्त (शत्रूमुक्त ) करून शिवशंभूभूपतींचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पुन्हा एकदा साकार करू आणि शिवशंभूराजांना आपल्या मावळ्यांचा अभिमान वाटावा असे कार्य करु.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *