धर्मवीर बलिदान मास – श्लोक क्रमांक क्र. १०
श्री संभाजीसुर्यहृदय
विध्ये असंख्य जरी हि पथ चालताना ।घालून भीक कधीं हि यमयातनांना।।धर्मार्थ आयी बलिदान करूं सहर्ष ।संभाजी, बाजी, शिवबा रविवत् आदर्श ।।१०।।
आजच्या या दहाव्या श्लोकाचा अर्थ:-
आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही काटेरी पथावर चालणे कधीही सोपे नसते परंतु शिवछत्रपतीनीव त्यांच्या बाजी , तान्हाजी, येसाजी ,कोंडाजी यांसारख्या मावळ्यांच्या साथीने या पथावरुन मार्गक्रमन करत असंख्य विघ्नांचा सामना करून हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, आणि ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत रक्षण्याचे अतुलनीय कार्य छत्रपती संभाजी महाराजांनी केले, स्वराज्य रक्षणासाठी शंभूराजांनी अतोनात, ऐकून ही अंगावर शहारे उभे राहतील अशा यमयातना सोसल्या पण त्या औरंगजेबाच्या जुलमी राजवटीसमोर त्यांनी भिक घातली नाही.
आपले आयुष्य जणू त्यांनी आपल्या पित्याच्या स्वप्ना साठी अक्षरशः वाहवून टाकले होते अशाच प्रकारे आपणही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करताना सूर्यालाही फिके पाडतील अशा शिवछत्रपती , शंभूछत्रपती आणि छत्रपतींसाठी , स्वराज्यासाठी मृत्यूला व शत्रूला आव्हान देऊन शत्रूला व मृत्यूला घाम फोडणाऱ्या बाजी, तान्हाजी, येसाजी, हंसाजी, कुडतोजी, कोंडाजी, कान्होजी यांसारख्या अनेक मावळ्यांना आपले आदर्श मानून न घाबरता , न मागे फिरता अविरतपणे आपल्या स्वप्नासाठी, देव, देश व धर्माच्या रक्षणासाठी आपण झुंझत राहिले पाहिजे.