॥ धर्मवीर बलिदान मास ॥ श्लोक क्रमांक.११
झुंझार जात आमुची शिवशार्दुलांची ।अंत्येष्टी निश्चित करे रणीं पाकतेची ।।मारुनी शत्रू अवघे समरांत ठार ।दुर्दांत हिन्दु कुळ हें जग जिंकणार ।। ११ ।।
अकराव्या श्लोकाचा अर्थ –
आपण स्वतःला कधीच कमी लेखले नाही पाहिजे, कारण आपण त्या शिवछत्रपती आणि शंभूछत्रपतींचे नरवीर, झुंजार मावळे आहोत, ज्याप्रमाणे शिवछत्रपतींनी मुघल, आदिलशाही, निजामशाही, बरिदशाही, कुतुबशाही या पाच पातशाह्यांचा सर्वनाश केला.
स्वराज्य उभारणीच्या कार्यात आडव्या येणाऱ्या परकीय व स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केला, आणि हे स्वराज्य रक्षण्यासाठी छत्रपती शिवशार्दुल संभाजीराजांनी मुघल, सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रज व आपल्यातीलच अनेक फितूरांना कडक शासन करून सर्वत्र स्वराज्याची जरब बसवली, आणि शिवछत्रपतींचे स्वप्न टिकवण्यासाठी, देव, देश आणि स्वराज्यधर्माच्या रक्षणासाठी त्यांनी औरंग्याचे अनेक अत्याचार सहन केले, त्यांच्याकडून आपण ही प्रेरणा घेऊन आज आपल्या हिंदुस्थानाला विळखा घालू पाहणाऱ्या पाकिस्तान, बांगलादेश रुपी अजगरांचा आपण अंत करुन या जगाला पुन्हा दाखवून देउ की आम्ही त्या शिवछत्रपतींचे, शंभूछत्रपतींचे मावळे आहोत ज्यांनी एकेकाळी पाचपातशाय्यांच्या नाश करून संपूर्ण हिंदुस्थान आपल्या मायेने, शौर्याने जिंकून घेऊन आपले रयतेचे राज्य निर्माण केले होते आणि आजही आम्ही त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.