॥ धर्मवीर बलिदान मास ॥ श्लोक क्रमांक. १२
श्रीसंभाजीसुर्यहृदय
शस्त्रास तहान आमुच्या अरिशोणिताची ।
शमणार प्राशुनी कुळी रणीं म्लेंच्छतेची ॥
खड्गात नित्य वसते “तुळजाभवानी” ।
हे दिव्य सत्य कथिले शिवभूपतींनी ॥ १२ ॥
या बाराव्या श्लोकाचा अर्थ:
शिवशंभूराजे व त्यांच्या मावळ्याप्रमाणे आपले शस्त्र नेहमी स्वराज्य कार्यात अडथळा आणणाऱ्या, रयतेला त्रास देणाऱ्या, देशाविरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या म्लेंच्छ शत्रूंच्या मूळाचा नाश करण्यासाठीच ते उगारले गेले पाहिजे, आणि त्यांचा नितःपात करुनच ते म्यानबंद केले पाहिजे.
शिवछत्रपतींची एक शिकवण होती हि शिकवण आपण नेहमी लक्षात ठेली पाहिजे ती म्हणजे, आपल्या शस्त्रात (खडगात ) नेहमी आई तुळजाभवानी वास करत असते, आणि ती नेहमी म्हैशासूर रुपी दैत्यांचा सर्वनाश करण्यासाठी वीजेच्या लखलखाटा सारखी त्या दैत्यांवर तुटून पडते.
हे एक अतिशय दिव्य सत्य आहे जे कधीही बदलू शकत नाही, म्हणून आपण नेहमी शस्त्रांचा, शास्त्रांचा आदर केला पाहिजे, शिवछत्रपती आणि शंभूराजे आपल्या मावळ्यांचा मनात प्रेरणा, जोश निर्माण करण्यासाठी हि शिकवण त्यांना सांगत असत जेणे करुन मावळ्यांचा मनात श्रद्धा ही निर्माण होईल आणि गनिमांचा नाश ही होईल. आणि हिच शिकवण आज आपण आपल्या मनात साठवून देव, देश व स्वराज्यधर्मा विरुद्ध कार्य करणाऱ्या गिधाडांचा नाश करण्यासाठी या शिकवणीचा उपयोग केला पाहिजे.