धर्मवीर बलिदानमास – श्लोक क्रमांक – ४
श्री संभाजीसुर्यहृदय
हिन्दू म्हणुनी जगण्या तव वृत्ती देई ।
सिंहासमान जगण्या तव तेज देई ॥
शिवपुत्र !द्याल उरीचे जरी धैर्यमर्म ।
मारुनी म्लेंच्छ अवधे रणीं रक्षू धर्म ॥४॥
या श्लोकाचा अर्थ –
शंभूराजे तुम्ही ज्या प्रमाणे हिंदू धर्म जगला व ज्या प्रमाणे तुम्ही हिंदू धर्मासाठी बलिदान दिले , तुमची हि हिंदूधर्माप्रतिची वृत्ती तुम्ही आम्हास ही द्या जेणेकरून आम्ही हि देव ,देश , धर्मासाठी तुमच्या सारखे प्रसंगी बलिदान ही देऊ , राजे तुम्ही आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत शिवछत्रपतीसारख्या सिंहाचे छावे म्हणून ज्या तेजाने , ज्या निष्ठेने जगलात ते तेज पाहून त्या औरंगजेबाचे देखील डोळे दिपले.
ते तेज ही आम्हाला द्या राजे! शिवपुत्र नावाचे धैर्य जर प्रत्येक मराठी माणसाच्या उरात सामावले तर तुम्ही ज्याप्रमाणे मोघम, इंग्रज, पोर्तुगीज यांसारख्या त्याकाळातील म्लेंच्छ शत्रूंचा नाश केला त्याचप्रमाणे आजच्या काळातील पाकिस्तान, बांगलादेश, चीन यांसारख्या म्लेंच्छ शत्रूंचा आम्ही सर्वनाश तुमच्या आणि शिवछत्रपतींच्या आशिर्वादाने करु.