धर्मवीर बलिदानमास – श्लोक क्रमांक – ५
श्री संभाजीसुर्यहृदय
प्राणांतीं हि न फिरणें कधीं मार्गी मागें ।
रविवत् बना पथीं तुम्ही शिवसूत सांगे ॥
उध्वस्त तोडुनी करा रणीं म्लेंच्छपाश ।
संपूर्ण हिन्दवी करा आपुला स्वदेश ॥५॥
आजच्या या पाचवा श्लोकाचा अर्थ
ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज देव, देश आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी बलिदानाच्या मार्गातून समोर साक्षात मरण दिसत असताना सुद्धा मागे हटले नाही, त्याच प्रमाणे आपण आजच्या काळात आपल्या कोणत्याही कार्यात एकनिष्ठ राहून प्रसंगी त्या कर्या आपला प्राण गेला तरी मागे हटायचे नाही, ज्या प्रमाणे तळपता रवी (सूर्य) जसे उगवायचा थांबत नाही तो रोज नित्य नियम उगवतो व मावळतो त्या सूर्याच्या पथावर चालून आपण त्याच्याकडून आदर्श घेऊन आपल्या कार्यात नियमितपणा आणला पाहिजे असे आपल्याला शिवसूत (शिवपुत्र) सांगताहेत.
ज्याप्रमाणे शंभूराजांनी मोघल, इंग्रज पोर्तुगीज यांसारख्या शत्रूनी रयतेच्या आणि देशाच्या गळ्याशी गुंडाळलेला जाचक पाश आपल्या तेजाने, शौर्याने तोडून टाकला त्याचप्रमाणे आपण आज आपल्या देशाच्या गळ्याशी गुंडाळलेला पाकिस्तान, चीन, बांगलादेश रुपी शत्रूंचा जाचक पाश शिवशंभूछत्रपतीच्या विचारांनी तोडून पुन्हा एकदा शिवशंभूछत्रपतींच्या स्वप्नातलां आपला हिंदुस्थान निर्माण करु.