धर्मवीर बलिदान मास – श्लोक क्रमांक क्र. ६
श्रीसंभाजीसूर्यह्रदय
जाळून राख करण्या जगीं म्लेंच्छसत्ता ।
हिंदुमनास_शिकवू_शिवपुत्रकित्ता ।।
राष्ट्रातलें न उखडू जरी म्लेंच्छवीष ।
टिकणार नाही कधीं हि जगीं हिंदुदेश ।।६।।
अर्थ:- ज्याप्रमाणे शंभूछत्रपतींनी मोघल, इंग्रज, सिद्दी व पोर्तुगीज यांसारख्या म्लेंच्छशत्रूंना आपल्या पराक्रमाने , शौर्याने जाळून राख केले त्याचप्रमाणे आपल्याला जर आज आपल्या आयुष्यातील शत्रूंना तसेच देशाचा नाश करु पाहणाऱ्या पाकिस्तान, चीन,बांगलादेश यांसारख्या शत्रूंना जर धडा शिकवायचा असेल तर प्रत्येक भारतीयांच्या मनात शिवपुत्र शंभूराजे नावाची ज्वाला प्रज्वलित करणे गरजेचे आहे.
जर आपण हे म्लेंच्छवीष वेळीच उखडून फेकले नाही तर आपला हिंदुस्थान जगी कधीही टिकू शकणार नाही जर आपल्याला हिंदुस्थान टिकवायचा असेल तर केवळ शिवशंभूराजे यांच्या विचारांनीच तो टिकवू शकतो.