धर्मवीर बलिदान मास – श्लोक क्रमांक क्र. ९
श्री संभाजीसुर्यहृदय
मृत्यूजिभेवरीं जिणें जगले अखंड ।
उध्वस्त नष्ट करण्या रणीं म्लेंच्छबंड ।।
शिवसिंहसदृश्य करूं अवघा स्वदेश ।
हिन्दुत्व शत्रू सगळे करूं नामशेष ||९||
आजच्या या नवव्या श्लोकाचा अर्थ:-
बोले तैसा चाले, तयाची वंदावी पाऊले “हि म्हण संभाजी राजांनी खरी करुन दाखवली” आबासाहेबांचे जे संकल्पित, तेच करणे आम्हास अगत्य! ” हि शंभूराजांनी घेतलेली शपथ आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य शत्रूंचा, स्वराज्य द्रोह्यांना उध्वस्त करण्यासाठी अखंडीतपणे पाळली, शंभूराजांनी असा निश्चय केला होता की हा अवघा स्वदेश शिवछत्रपतींच्या सिंहाचा म्हणजेच शूरवीरांचा करुन, देव, देश आणि स्वराज्य धर्माविरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या रयतेला त्रास देणऱ्या म्लेंच्छ शत्रूंचे या जगातून नामोनिशाण मिटवून टाकायचे.
आपण शंभूराजांकडून हे शिकले पाहिजे, कि आपण जे बोलतो, तसेच आपले आचरण असले पाहिजे, आपण जर एखादे वचन आपल्या गाठीशी बांधले की ते पूर्ण होण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंजत राहिले पाहिजे, आणि शंभूराजांचे जे स्वप्न होते की हा अवघा स्वदेश शिवछत्रपतींच्या सिंहांचा म्हणजेच शूरवीरांचा असला पाहिजे, देव, देश व स्वराज्य धर्माविरुद्ध कार्य करणाऱ्या म्लेंच्छ शत्रूंचे नामोनिशाण मिटवले पाहिजे, हे त्यांचे स्वप्न, इच्छा आजच्या काळात पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आपली आहे, आणि ती आपण शेवटच्या श्वासापर्यंत पाळली पाहिजे.