गोव्याला चाललाय सावधान!!
आमचे बंधू अविनाश शेलार आणि त्यांच्या मित्रांसोबत घडलेली हि जीवघेणी सत्य घटना. अश्या घटना अनुभवून आणि ऐकून एखाद्याला मदत करायची कि नाही, असा प्रश्न उभा राहतो. पुढील घटना त्यांच्याच शब्दात…
बरेच दिवस मित्रान सोबत गोव्याला जायचा प्लॅन चालू होता, रविवारी रात्री जायचं ठरलं, पण अचानक रविवारी मला समजल की ऑफिसच्या कामासाठी सोमवारी पुणे GST ऑफिसला जायचं आहे. मग माझ्या मुळे सगळा प्लॅन सोमवार वर गेला, मित्र पण अशे भेटलेतना की बसच…
मी बोललो तुम्ही जा रविवारी रात्रीच मी नाही येत. मला नाही जमणार, तर त्यांचं एकच उत्तर, तू नाही आला तर आम्ही पण नाही जाणार सगळा प्लॅन माझ्या मुळे सोमवार वर गेला, मी माझ पुण्याचं काम उरकलं आणि सोमवारी रात्री 8 वाजेपर्यंत भुईंजला आलो.
रात्री 12 ला निघायचं हे आधीच ठरलं होतं, आम्ही 2 गाड्या घेतल्या होत्या. माझ्या गाडीत नारायण शेट बाबर, प्रणित शिंदे, आदित्य जाधव आणि मी अशे 4 जणं बसलो होतो. आणि दुसऱ्या गाडीत रसाळ साहेब,अमोल चव्हाण, शैलेश बाबर हे सगळे होते. हे सगळे माझे लहानपणीचे मित्र नाहीत कामा निमित्त आमची ओळख झाली. आणि ओळखीचं रूपांतर कधी मैत्रीत झालं हे समजलच नाही.
गोव्याला जायला गाड्या भुईंज मधून निघाल्या आणि कोल्हापूरच्या दिशेने निघालो. कोल्हापूर मध्ये शेवटचा टोलनाका आम्ही क्रॉस केला आणि पुढे एका छोट्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलो. टपरीवर एक म्हातारा माणूस बसला होता, कदाचित त्याचा नुकताच डूलका लागला असावा आणि आम्ही पोचलो होतो, जांभळ्या देत त्याने विचारलं काय पाहिजे, 8 चहा आणि 2 क्रीमरोल द्या ऑर्डर मी त्याला दिली.
मस्त गप्पा मारत मारत आम्ही चहा घेतला. नुकत्याच झालेल्या दिल्लीत हत्याकांडावर आमची चर्चा चालू होती. तिकडे चहा घेऊन आम्ही आता कर्नाटका राज्यात जाण्यासाठी निघालो, गोव्याला जाताना महाराष्ट्रातून कर्नाटकची सीमा पार करत गोव्या कडे जायचं असतं कदाचित हे बरच लोकांना माहीत नसेल, म्हणून सांगितलं.
कर्नाटकात पर्यन्त 2 ते 3 वाजले होते, आमची दुसरी गाडी आमच्या गाडीच्या पुढे होती, आमच्या गाडीत मी पुढे ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसून आदित्यशी गप्पा मारत होतो, आदित्य गाडी चालवत होता, मागे नारायण आणि प्रणित डाराडुर झोपले होते, मला कधीच प्रवासात झोप लागत नाही, म्हणून मी पुढे बसून आदित्यशी गप्पा मारत मस्त गाणी ऐकत आमचा प्रवास चालू होता, आणखी पुढे गेल्यावर थोडा जंगली भाग सुरु झाला.
भयानक अंधार, पुढे एक आमचीच गाडी आणि त्यांच्या मागे मागे दुसरी गाडी त्या भयाण अंधारात फक्त आमच्याच गाड्यांचा उजेड होता. जंगल सुरू झाले आणि घाट लागला.
आदित्यच्या आणि माझ्या गप्पा सुरूच होत्या आणि अचानक एक तीव्र वळन आलं, आदित्यने गाडी वळवली, आणि समोर बघतो तर काय रस्त्याच्या कडेला एक two-wheeler पडलेली आणि शेजारी एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडललेला दिसला.
तसा मी ओरडलो आद्या पुढं बग, तसा त्याने कचकन ब्रेक मारला आणि गाडी बाजूला ओढली, आमच्या पुढच्या गाडीला कदाचित तो माणूस दिसला नसवा. हे सगळं एवढ्या लवकर झालं काही सुचलं नाही आदित्यने गाडी बाजूला ओढली आणि क्षणाचाही विलंबन करता मी माझ्या बाजूचे दार उघडलं आणि प्रणित जो माझ्या ओरडण्याने जागा झाला होता त्यांनी त्याच्यासाईडच दार उघडल.
आम्ही दोघं गाडीतून खाली उतरलो गाडीतून खाली उतरताच माझा मोबाईल वाजू लागला. माझ्या मोबाईलवर मी बघितलं तर पुढच्या गाडीतून शैलेशचा फोन येत होता. फोन उचलला तसा शैल्या डायरेक ओरडला आणि विण्या गाडीतून उतरून नकोस ट्रॅप ट्रॅप आहे, पळा गाडी का थांबवली चल चल.
तसा मी प्रणित वर ओरडलो थांब पुढे जाऊ नको पुढे जाऊ नको जसा माझा आवाज ऐकला तस कदाचित प्रणित च्या लक्षात आलं की काय तरी वेगळाच मॅटर आहे प्रणित गाडी जवळ आला. आणि स्पीड मध्ये प्रणित गाडीत बसला. मी पण गाडीत बसेपर्यंत दहा ते पंधरा जणांची टोळी आमच्या गाडीच्या दिशेने आलीच.
दहा ते पंधरा जणांची टोळी गाडीच्या दिशेने येताना हत्यार बंद येताना मला दिसली होती. प्रणित आणि माझ्या लक्षात आले की पण चांगलेच फसलोय ती माणस आमच्याकडे येत होती, मी मोठ्याने ओरडलो आद्या गाडी स्टार्ट कर, एक सेकंदात आदित्यने गाडी स्टार्ट केली.
मागे झोपलेल्या नारायणच्या तर लक्षातच नाही आल की काय झालय. आमच्या मागे ती माणसं पळायचा प्रयत्न करत होती पण आमचं नशीब एवढं की आद्याने गाडी स्टार्ट केली आणि फुल्ल स्पीड मध्ये आम्ही तिकडून निसटलो.
गाडी 50 ते 60 मीटरवर आल्यानंतर अजून एक रक्तात माखलेला माणूस आमच्या गाडीला आडवा आला जो की पूर्ण रक्ताने माखलेला होता. आम्हाला काहीच कळत नव्हतं की काय होतय तो आमच्या गाडीच्या जवळ आल्यावर आमच्या लक्षात आले कि ते रक्त नाहीये त्यांनी त्यांच्या अंगाला पूर्ण लाल रंग फसला होता जो की रक्तासारखा दिसत होता. आणि हा ट्रॅप होता.
पुढच्या गाडीत असणाऱ्या शैलेशच्या लक्षात आलं होतं की हा ट्रॅप आहे, कारण शैलेशचा स्वतःचा गाडी व्यवसाय आहे. शैलेश त्या एरियात सारखा फिरत असतो शैलेशला पहिल्या माणसाला सुद्धा पडलेला बघितला होता. पण शैलेशनि गाडी थांबवली नाही.जर त्यावेळी शैलाचा फोन आला नसता तर आमचा गेम फिक्स होता.
दहा ते पंधरा लोकांना हत्यार घेऊन गाडीकडे पळत येताना आम्ही स्वतः बगितल होत. शैलेश चा कॉल हेच आमचे जीवदान ठरलं होतं. एवढ्या स्पीड मध्ये झालो होतो की गाडी पूर्ण वेगाने चालू होती आणि शरीर पूर्ण थंड पडलं तर डोक्यात एकच विचार होता..
जर का आपण त्यांच्या तावडीत सापडलो असतो तर…..?
दहा ते पंधरा किलोमीटर पुढे आल्यानंतर आमच्या दोन्ही गाड्या थांबल्या, एका पेट्रोल पंपावर, पेट्रोल पंप बंद होता एक छोटासा दिवा पेट्रोल पंप लागलेला होता. पेट्रोल पंपवर आम्ही जाऊन दोन मिनिटं बसलो आम्हाला हे लक्षात आलं होतं की आज जर का आपण त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जवळ जात होतो तर त्या व्यक्तीच्या ऐवजी आपला कार्यक्रम होत होता.
तो व्यक्ती त्यांचाच माणूस होता त्याला अंगाला कलर लावून तिथे टू व्हीलर खाली पाडून त्याला झोपवण्यात आलं होतं की येणारे जाणारे प्रवाशांना असं वाटावं की माणूस एक्सीडेंट होऊन पडला आहे. भयानक जंगल असल्यामुळे तिकडे घाटात खूपच कमी गाड्या होत्या मी घड्याळात बघितलं 3 वाजून 45 सकाळची वाजले होते पेट्रोल पंपच्या शेजारी एक माणूस पंक्चरच्या दुकानाच्या बाहेर खुर्ची टाकून बसला होता. मी माणसाच्या जवळ गेलो झालेला सगळा प्रकार त्याला सांगितला तो म्हणला मी गेली 25 वर्ष या भागात काम करतोय असे तर कधीच काय झालं नाही म्हणून..
पण आम्ही हे स्वतः अनुभवलं होतं त्यामुळे मी त्या माणसावर न विश्वास ठेवता परत माझ्या गाडी जवळ आलो. मित्रांशी चर्चा झाल्यानंतर आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि पुढचा प्रवास सुरू केला.
गाडीतून पुढे प्रवास करताना डोक्यात एकच विचार होता की आपण त्या माणसाला रक्तात माखलेला बघून क्षणाचाही विलंब न करता जंगलात रात्रीची गाडी थांबवली त्याला वाचवण्यासाठी आपण खाली उतरणारच होतो पण नशीब आपल्याला शैलेशचा फोन आला जर का शैलीचा फोन येत नव्हता तर? त्या दिवशी काय अनर्थ झाला असता!!! याचा विचार करूनही आजही अंगावर काटा येतो. जरी आम्हाला लुटले असते मोबाईल काढून घेतले असते पैसे काढून घेतले असते पोरांच्या गळ्यातल्या चैन,सोन्याच्या अंगठया काढून घेतल्या असत्या तरी त्यांन काहीच फरक पडणार नव्हता, पण जर का एखाद्याला लागलं असतं दुःखापत झाली असती मारहाणीत तर त्याची किंमत किती मोठी चुकवायला लागली असती. याचा विचार करूच अंगाचा थरकाप उडतोय.
आत्ताच जी आमच्यासोबत ती गोष्ट घडली मी थोडा घाबरलोच होतो कारण अशा गोष्टींची काही आपल्याला सवय नसते. तिथून मग दोन्ही गाड्यांमध्ये शांतता पसरली. माझ्या डोक्यात एकच विचार चालू होता की जरी आपल्याला लुटलं असतं आपली पैसे मोबाईल काढून जरी घेतला असता तरी फरक पडला नसता, पण जर का कोणाला लागल असता किंवा एखाद्याला हत्याराचा वार झाला असता तर ही ट्रीप किती महागात पडली असती? गोव्यात पोचेपर्यंत डोक्यात हाच विचार चालू होता की इथून पुढे जरा का रस्त्याला एकाद्याचा खरंच एक्सीडेंट झाला असेल तर त्याला वाचवायला जावं की नाही? प्रणित अश्या गोष्टीन मध्ये पुढे असतो, तो गोरक्षक आहे त्याने अशी खूप कामे केली आहेत. त्या दिवशी सुद्धा तोच पुढे चालला होता पण सुदैवाने आम्ही वाचलो.
काय सुचत नव्हतं आम्ही बरोबर होतो का मूर्ख होतो? हेच मला समजत नव्हतं.
जे कोणीही हे वाचत आहे त्यांना माझी एकच विनंती आहे की जर तुम्हाला कुठे प्रवास करायचा असेल आणि रस्ता सेफ नसेल किंवा घाट सेक्शन असेल तर तुम्ही रात्रीचा प्रवास करणे टाळावे. शैलेशचा आलेला कॉल आणि आदित्यची गाडी चालवण्याची तत्परता कदाचित ह्या दोन गोष्टींमुळे आमचे जीव वाचला होता….