“रतनगड” किल्ला आणि “अमृत-वाहिनी” चा इतिहास माहित आहे का?

Hosted Open
3 Min Read
रतनगड किल्ला आणि अमृत वाहिनी

रतनगड किल्ला आणि अमृत वाहिनी चा इतिहास: Do you know the history of Ratangad Fort and Amrit Vahini?

इ.स.1630 – मोघल आक्रमण शहाजी राजे ,महादेव कोळी सरदार आणि इतर मराठा सरदार यांच्या मदतीने निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न झाला. पुढे मोघल विजयी आणि माहुलीच्या तहात किल्ला मोघलांना स्वाधीन केला.

इ.स.1660 – छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्तर मोहीम मोरोपंतांच्या आणि स्थानिक महादेव कोळी लोकांच्या मदतीने किल्ला स्वराज्यात घेतला आणि किल्ल्यावर पुन्हा स्थानिक महादेव कोळी यांची नेमणूक केली.

इ.स.1664 – सुरतेच्या स्वारीहून परतताना राजांनी किल्ल्याचा आश्रय घेतला हा किल्ला भौगोलिक दृष्टीने महत्वाचा होता.

इ.स.1688 – मोघलांची दक्षिण स्वारी, नाशिक आणि कल्याण मुघल सुभेदारांनी जव्हारच्या राजांच्या मदतीने किल्ला ताब्यात घेतला.

इ.स.1720 – छत्रपती शाहूराजांबरोबर किल्ला मराठा साम्राज्यात आला.

इ.स.1750 – पेशवे यांनी राजूर प्रांत तयार केला.प्रांताचे मुखयालय रतनगड करून सुभेदार म्हणून महादेव कोळी जावजी हिराजी बांबळे यांची नियुक्ती केली.

इ.स.1750-1790 – सुभेदार जावजी बांबळे यांच्या काळात किल्ल्याचा विकास झाला.राजूर प्रांत संपन्न झाला आणि रतनगड किल्ल्याचे महत्त्व आणखी वाढले.

हा किल्ला(१६००-१७०० शतकात) मौल्यावण वस्तू,दागिने,रत्न, ठेवण्याचे एक ठिकाण होते.आणि १८२० नंतर ब्रिटीशांनी हा गड ताब्यात घतल्यानंतर गडावरील या वस्तु ताब्यात घेतल्या. गड पूर्ण दारुगोळा लावून नष्ट केला.तसेच पश्चिम घाटातील ज्या काही औषधी,जडीबुटी,शोधण्याचे ठिकाण या गडाकडे पाहिले जायचं.

पुराणात असा ऊललेख आहे समुद्र मंथन झाल्या वर देव आणि दानव यांच्या मध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन कले त्याच पंक्ती मधे राहू नावाचा एक दानव असून त्याने अमृत प्राशन केलेले आहेस असे समजताच विषणुने मोहीनी रुप धारण करून त्या दानवाचा शिरछेद केला त्याचे धड राहूरी या ठीकाणी पडले तर शीर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरुन वाहू लागली त्या काळा पासून त्या धारेचे नदी मध्ये रुपांतर झाले व नदीस अमृत वाहीनी असे नाव पडले.

रतनगड किल्ल्यापर्यंत कसे जावे: How to reach Ratangad Fort:

रतनवाडीपासून ६ किलोमीटर अंतरावर, भंडारदऱ्यापासून २३ किमी, पुण्यापासून १८३ किमी आणि मुंबईपासून १९७ किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावात हा प्राचीन किल्ला आहे.

रतनगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारादरा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. किल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते डिसेंबर हा आहे.

हा किल्ला समुद्रसपाटीपासून ४२५० फूट उंचीवर आहे. रतनगडचा किल्ला शिवाजी महाराज यांनी वापरला होता.

किल्ल्याला पुणे, साम्रद, कोकण आणि त्र्यंबक ही चार प्रवेशद्वारे आहेत. (हि नावे दरवाजा ज्या विभागाकडे म्हणजे किल्लेदाराच्या राज्याच्या चारी दिशांना असणाऱ्या भागांवरून दिली आहेत)

अहमदनगर जिल्ह्यातील सामरद या गावातून पुढे दीड ते दोन किमी अंतरावर, भंडारदरा भागाच्या पश्चिम बाजूला सांदन दरी आहे. पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर इथे गर्दी असते.

संदन दरीतली वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही. समोर आजोबा पर्वत, रतन गड आणि मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसूबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही संदन दरीची सैर करणे एक स्मरणीय अनुभव आहे .

आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी असा या दरीचा लौकिक असल्याचे सांगितले जाते.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *