कावळे बावळे खिंडीची शौर्य गाथा:
हिंदूस्तानातील एक प्राचीन आणि भव्य डोंगर रांग म्हणजे ” सह्याद्री ” .सुमारे साडे सहाशे कोटि वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेखातून निर्माण झालेली ही डोंगर रांग. याच सहयाद्रितील एक डोंगर म्हणजे किल्ले कोकणदिवा. कोकणाला आणि देशाला जोडणारा हा पर्वत. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड च्या पुर्वेला हा किल्ला स्तिथ आहे. कोकणदिव्याच्या
पायथ्याला गाव सांदोशी वसले आहे. डोंगरच्या वरती(थोडे मध्य भागी) म्हणजेच घाटावरती, घोळ आणि गारजाई अशी दोन गावे आहेत. कोकणदिव्याच्या माथ्यावर सात पाण्याच्या टाक्या स्तिथ आहेत(पाणी आज ही पिण्यालायक आहे). इथेच लागून एक लेणी (डोंगरात कोरलेली राहण्यास खोली )आहे. याच किल्ले कोकणदिवा पर्वता मध्ये कोकणाला आणि घाटाला जोडणारी एक खिंड लागते ,ती म्हणजे कावळ्या बावळ्या खिंड.
शिवकाळात किल्ले कोकणदिवा हा सर्वात महत्वाचा टेहळणी बुरुज . जणू बाले किल्लाच्. शिवकाळापासून ” नाईक सर्कले ” घराण्याकड़े याच्या देकरेखीचे व् रक्षणाची जवाबदारी छत्रपती घराण्याकडून दिली गेली होती. मावळे येथे कायम असत. जर रात्री च्या वेळी, कोण शत्रु घाटावरुन फौज घेऊन आलाच तर , कोकणदिव्याच्या माथ्यावर मावळे मशाल पेटवून रायगडाला संकेत देत. दिवसा (चाऱ्याचा)गवताचा धूर करुन रायगडाला इशारा दिला जाईल.सांदोशी गाव म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक सुंदर गाव.
किल्ले रायगड पासून १५ की.मी अंतरावर हे गाव आहे. किल्ले कोकणदिव्याच्या पायथ्याशी वसलेल् हे गाव. गावात जीवाजी सर्कले नाईक यांच्या अतुलनीय युद्ध पराक्रमाची साक्ष असलेल्या विरगळी गावात जतन करुन ठेवल्या आहेत.महाराष्ट्रातील एकमेव उंच अशी सर्कले घराण्याची विरगळ आहे.
शिवकाळात सर्कले घण्याच्या व इतर शहिद झालेल्या विरांच्या स्त्रिया जिथे सती गेल्या , तो सतिचा माळ नदिला लागून आहे. शिवकाळात सांदोशी गाव म्हणजे मोठी बाजारपेठ.. एक मोठ् वरदळीच् मुख्य ठिकाण. हा त्याकाळचा एक व्यापारी मार्ग होता. समुद्रातून खाड़ी पट्या मार्गे जो माल आणला जाई ,तो या कोकणच्या सांदोशीत न्हेवून कावळ्या घाट मार्गे तो देशावर म्हणजेच पुणे , सातारा या ठिकाणी पुढे पाठवला जाई. छत्रपती संभाजी महाराज यांनी, याच सर्कले नाईकांच्या सांदोशी गावच्या जंगलात वाघ फाडला होता.अशी ही छत्रपतींच्या पराक्रमाने पावन झालेली भूमि.या कोकणदिव्याच्या गर्भात एक खिंड आहे. या खिंडीच् नाव कावळे बावळे खिंड असे आहे. शिवकाळात हि खिंड जागती होतीच् ,याचाच पुरावा म्हणजे इथे असलेली चौकी. सध्या तिचे अवशेष दिसतात, पडक्या अवस्तेत असलेली ताल दिसून येते. ही चौकी सर्कले घराण्याच्या आधिपत्या खाली होती. जीवाजी नाईक सर्कले यांच्या हाताखाली नऊ पाईक देऊन त्यांच्या वरचे प्रमुख नाईक म्हणून जीवाजी सर्कले होते. खिंडीत झालेल्या युद्धा नंतर इथे जीवाजी नाईक सर्कले यांची एक मोठी मूर्ति कोरली आहे (३५० वर्षांपूर्वी ही मूर्ति कोरली गेली आहे).
कावल्या घाटानी खिंडीतून वर गेल् कि घोळ आणि गारजाईवाड़ी ही दोन गांव लागतात. याचा ऐतिहासिक संबंध असा की पूर्वी कावल्या खिंडीच्या युद्धाच्या आगमनाच्या वेळी घाटावरुन येणाऱ्या शत्रुने या गावांमध्ये मध्ये तळ ठोकला होता.
सध्याच्या पुराव्या व् माहिती अनूसार सर्कले यांचा इतिहास शिवकाळापासून थोड़ा आधी सुरु होतो. “सरखेल”(नौसेनाप्रमुख) (Infantry Head) या पदावर सर्कले घराणं होतं.
पुढे “सरखेल” या पद्वीचा अपब्व्रनश् होऊन हे सर्कले नाम पावलं. अस ही म्हणतात जस शिर्के पाटील यांच काही इतिहासिक कारणाने पुढे शिवले पाटील झाले तस आधीचे हे (सरकाळे) होते जे किल्ले सर करण्यात पटाईत होते(सरकिल्ले) , म्हणून पुढे त्यांचे सर्कले असे आडनाव झाले.
त्या नंतर काही काळ सरला. सिद्दीच्या काळात त्यांचे दिवस उलटले. किनार्यावर सिद्दीच् हळु हळु सिद्दि चे वर्चस्व वढायला लागले. यातच् दरम्यान ” सरखेल सर्कले ” याचं निधन झालं. त्यांची पत्नी त्यांच्या निधनानंतर आपल्या लहांग्या मुलाला घेऊन रायगडच्या पायथ्याला असलेले सांदोशी या गावी आश्रयाला आली. म्हणतात शिवछत्रपतिंनि सर्कले यांना सांदोशी हे इनामी दिलेल् हे वतन(गांव)होतं. या गावात ही माता आपल्या लहान मुलाला घेऊन राहिली. सांदोशी गावाने सर्कले कुटुंबाला आपल्यात सामावून घेतल्.
इथे हे लहान मूल ( जीवा सर्कले नाईक) हळू हळू वाढू लागल्. काळ सरला. लहान मुलान् बघता बघता तरुणाईत पदार्पण केल्. कडेकपाऱ्यात राहून दगडासारखा सक्त तयार झालेला हा तरणा गड़ी. शरीराने ते कणखर होते. रक्ताने शौर्याचा मिळालेला वारसा हा गावातील लोकांना दिसून होता.
सध्याच्या पुराव्या व् माहिती अनूसार सर्कले यांचा इतिहास शिवकाळापासून थोड़ा आधी सुरु होतो. “सरखेल”(नौसेनाप्रमुख) (Infantry Head) या पदावर सर्कले घराणं होतं.
पुढे “सरखेल” या पद्वीचा अपब्व्रनश् होऊन हे सर्कले नाम पावलं. अस ही म्हणतात जस शिर्के पाटील यांच काही इतिहासिक कारणाने पुढे शिवले पाटील झाले तस आधीचे हे (सरकाळे) होते जे किल्ले सर करण्यात पटाईत होते(सरकिल्ले) , म्हणून पुढे त्यांचे सर्कले असे आडनाव झाले.
त्या नंतर काही काळ सरला. सिद्दीच्या काळात त्यांचे दिवस उलटले. किनार्यावर सिद्दीच् हळु हळु सिद्दि चे वर्चस्व वढायला लागले. यातच् दरम्यान ” सरखेल सर्कले ” याचं निधन झालं. त्यांची पत्नी त्यांच्या निधनानंतर आपल्या लहांग्या मुलाला घेऊन रायगडच्या पायथ्याला असलेले सांदोशी या गावी आश्रयाला आली. म्हणतात शिवछत्रपतिंनि सर्कले यांना सांदोशी हे इनामी दिलेल् हे वतन(गांव)होतं. या गावात ही माता आपल्या लहान मुलाला घेऊन राहिली. सांदोशी गावाने सर्कले कुटुंबाला आपल्यात सामावून घेतल्.
इथे हे लहान मूल ( जीवा सर्कले नाईक) हळू हळू वाढू लागल्. काळ सरला. लहान मुलान् बघता बघता तरुणाईत पदार्पण केल्. कडेकपाऱ्यात राहून दगडासारखा सक्त तयार झालेला हा तरणा गड़ी. शरीराने ते कणखर होते. रक्ताने शौर्याचा मिळालेला वारसा हा गावातील लोकांना दिसून होता.दुसरीकडे आपल्या छत्रपतींचे स्वराज्य वाढायला लागले . शिवाजीराजे शहाजीराजे भोसले हे आता छत्रपति होणार होते. छत्रपति शिवाजी महाराजांनी अखंड स्वराज्य निर्माण केल्. तख़्तासाठी किल्ले रायगड आता मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून निवड़ण्यात आला. त्यावेळी स्वराजयचे प्रधानमंत्री मोरोपंत पेशवे होते. या रायगडची पाहणी करण्यासाठी मोरोपंत स्वतः किल्यावर आले. त्यांनी जातीने सर्व किल्याची पाहणी केली. किल्याची आसमंता बघितली. त्यांनी गडाच्या आजुबाजूची चौकशी करायला सुरुवात केली, कारण स्वराज्याची राजधानी ही चोहोअंगानी सुरक्षित असली पाहिजे.
यासाठीच मोरोपंत जातीने निघाले. ते आले सांदोशी या गावी. सांदोशी वरील असलेला कोकणदिवा पर्वत आणि त्यात असलेली कावळे बावळे खिंड त्यांना थोड़ी चिंताचूर करत होती. हा वाहता मार्ग होता,एक मुख्य वाहतुकीचे ठिकाण. त्यामुळे इथून शत्रू येण्याची भिती होती. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी सांदोशी गावातील ग्रामस्थांना गोळा केले.
ग्रामस्थ जमले आणि चर्चा सुरु झाली . सर्व ग्रामस्थानी “जीवाजी सर्कले नाईक” हे नाव मोरोपंतांना सांगितले. जीवाजी सर्कले यांना तुम्ही रायगडच्या रक्षणासाठी नेमा अस सांगितल् गेलं. ग्रामस्थांनच्या म्हणन्या प्रमाणे मोरोपंत जीवाजी सर्कले यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांच्या कुळाची चौकशी केली.कारण रायगडच्या रक्षणासाठी ज्याला ठेवायचे आहे तो तेवढ़ाच मातबगार असला पाहिजे. त्याच कुळ आपल्याला बोलतं करुन देतं की तो स्वाभिमानाचा इतिहास कसा जपतोय. सर्कले कुळाची संपूर्ण माहिती मिळाली. सर्कले कुटुंबाचा पूर्वीचा इतिहास आणि सरखेल यांनी केलेले पराक्रम हा इतिहास मोरोपंतांन कळाला. ते गेले जीवाजी सर्कले नाईक यांच्या निवासस्तानि.
वडिलांप्रमाणे मुलामध्ये , तेच शौर्य. म्हणून याचीच शहानिशा म्हणजेच त्यांच्या शौर्याची परीक्षा घेण्यासाठी ते स्वतः आले.
मोरोपंतांनी त्यांच्या सर्व शौर्याच्या परीक्षा घेण्यास सुरवात केली. बघता बघता सर्व परीक्षा, तिरंदाजीच् कौशल्य, तलवारबाजी अश्या अनेक गोष्टींमध्ये ते सरस ठरले. सर्व अपेक्षा निकाळजी पणे पार पडल्या. आता जीवाजी सर्कले नाईक रायगडच्या रक्षणासाठी सज्ज होते. *कोकणदिव्या मध्ये असणारी कावले बावले खिंडीत चौकी बसवण्यात आली. या चौकीत नऊ पाईक आणि त्यांच्या वरचा प्रमुख म्हणून नाईक असे दहा जण इथे तैनात केले. जीवा सर्कले नाईक हे दहावे आणि इथले प्रमुख़ होय.* किल्ले कोकणदिवा , कावळ्या खिंड, सांदोशी गाव आणि आजुबाजू चा सर्व परिसर त्यांच्या देखरेखी खाली देण्यात आला. आता किल्ले रायगड च्या रक्षणासाठी जीवाजी नाईक सर्कले खिंडीत सज्ज होते.
सर्कले घराण्याची मनसबदारी (पदवी) – सरखेल (नौसेनाप्रमुख) , नाईक , सरदार-
सर्कले घराण्याला पालकीचा मान प्राप्त होता.
शिवाजीराजे शहाजीराजे भोसले हे आता छत्रपति होणार होते. छत्रपति शिवाजी महाराजांनी अखंड स्वराज्य निर्माण केल्. तख़्तासाठी किल्ले रायगड आता मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून निवड़ण्यात आला. त्यावेळी स्वराजयचे प्रधानमंत्री मोरोपंत पेशवे होते. या रायगडची पाहणी करण्यासाठी मोरोपंत स्वतः किल्यावर आले. त्यांनी जातीने सर्व किल्याची पाहणी केली. किल्याची आसमंता बघितली. त्यांनी गडाच्या आजुबाजूची चौकशी करायला सुरुवात केली, कारण स्वराज्याची राजधानी ही चोहोअंगानी सुरक्षित असली पाहिजे.
यासाठीच मोरोपंत जातीने निघाले. ते आले सांदोशी या गावी. सांदोशी वरील असलेला कोकणदिवा पर्वत आणि त्यात असलेली कावळे बावळे खिंड त्यांना थोड़ी चिंताचूर करत होती. हा वाहता मार्ग होता,एक मुख्य वाहतुकीचे ठिकाण. त्यामुळे इथून शत्रू येण्याची भिती होती. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी सांदोशी गावातील ग्रामस्थांना गोळा केले.
ग्रामस्थ जमले आणि चर्चा सुरु झाली . सर्व ग्रामस्थानी “जीवाजी सर्कले नाईक” हे नाव मोरोपंतांना सांगितले. जीवाजी सर्कले यांना तुम्ही रायगडच्या रक्षणासाठी नेमा अस सांगितल् गेलं. ग्रामस्थांनच्या म्हणन्या प्रमाणे मोरोपंत जीवाजी सर्कले यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांच्या कुळाची चौकशी केली.कारण रायगडच्या रक्षणासाठी ज्याला ठेवायचे आहे तो तेवढ़ाच मातबगार असला पाहिजे. त्याच कुळ आपल्याला बोलतं करुन देतं की तो स्वाभिमानाचा इतिहास कसा जपतोय. सर्कले कुळाची संपूर्ण माहिती मिळाली. सर्कले कुटुंबाचा पूर्वीचा इतिहास आणि सरखेल यांनी केलेले पराक्रम हा इतिहास मोरोपंतांन कळाला. ते गेले जीवाजी सर्कले नाईक यांच्या निवाससस्थानी वडिलांप्रमाणे मुलामध्ये , तेच शौर्य. म्हणून याचीच शहानिशा म्हणजेच त्यांच्या शौर्याची परीक्षा घेण्यासाठी ते स्वतः आले.
मोरोपंतांनी त्यांच्या सर्व शौर्याच्या परीक्षा घेण्यास सुरवात केली. बघता बघता सर्व परीक्षा, तिरंदाजीच् कौशल्य, तलवारबाजी अश्या अनेक गोष्टींमध्ये ते सरस ठरले. सर्व अपेक्षा निकाळजी पणे पार पडल्या. आता जीवाजी सर्कले नाईक रायगडच्या रक्षणासाठी सज्ज होते. कोकणदिव्या मध्ये असणारी कावले बावले खिंडीत चौकी बसवण्यात आली. या चौकीत नऊ पाईक आणि त्यांच्या वरचा प्रमुख म्हणून नाईक असे दहा जण इथे तैनात केले. जीवा सर्कले नाईक हे दहावे आणि इथले प्रमुख़ होय.किल्ले कोकणदिवा , कावळ्या खिंड, सांदोशी गाव आणि आजुबाजू चा सर्व परिसर त्यांच्या देखरेखी खाली देण्यात आला. आता किल्ले रायगड च्या रक्षणासाठी जीवाजी नाईक सर्कले खिंडीत सज्ज होते.
सर्कले घराण्याची मनसबदारी (पदवी) –
सरखेल (नौसेनाप्रमुख) , नाईक , सरदार .
– महाड रायगड माझं गाव माझा अभिमान official Mahad