सह्याद्री रांगेत कुठेही पाण्याचे स्त्रोत नसताना या कडयाच्या भेगेमधून अखंड पाणी कसे येते!!!
महाड तालुक्यातील पाने गाव खोंड्यात सापडले सातवाहन कालीन जिवंत पाण्याचे टाके
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी खोदले असल्याच्या इतिहास करांचा अंदाज
नमस्कार मित्रांनो दुर्गे दुर्गेश्र्वर किल्ले रायगड आणि लिंगाण्याच्या परिसरातील सह्याद्रीच्या रांगेत अनेक अपरिचित स्थळे, पाणवठे, विरगळी, अनेक छुप्या गुहा आढळून येत आहेत. कारणही तसेच आहे हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गे दुर्गेश्र्वर किल्ले रायगड असताना शत्रू पासून स्वराज्याचे रक्षण व्हावे म्हणून अनेक या रायगड घेरा परिसरात खूपच अद्भुत अपरिचित ठेवा दडलेला आहे. अतिदुर्गम भाग आणि घनदाट जंगल यामुळे स्थानिक लोक व काही ठरविक भटकंती करणारे प्रेमी यांच्या शिवाय बर्याच जणांना माहीत नसते. पण आता गूगल मॅप व सोशल नेटवर्किंग च्या माध्यमातून खुप जण शोध घेत असतात.
पाने गावच्या उत्तर बाजूला जो शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाणता राजा सह्याद्री डोंगरात दिसणार्या प्रतिमा डोंगराच्या रांगेत घाटमाथ्यावर पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या टेकपोळे व चांदर गाव दुर्गम पायवाट असणार्या आता खडतर पायवाटेवर एका कातळ कड्याला एक इंचाच्या भेगे मधून कायम वर्षानुवर्ष एका धारेत हे शुद्ध आणि चविष्ट पाणी वाहत असते.
शिवकाळात व सातवाहन काळात बहुतेक हा व्यापारी मार्ग असावा कारण हे पाणी साठवून ठेवण्यासाठी त्याच कातळ कड्याला कोरून एक दोन मीटर खोल व एक मीटर रुंद असे टाके कोरले आहे. आणि त्या टाक्यामध्ये हे पाणी साठवणूक करायचे रचना आहे.
याच सह्यद्री रांगेत कुठेही पाण्याचे स्तोस्त्र नसताना या कडयाच्या भेगेमधून अखन्ड पाणी येतेय यांचे खूप आश्चर्य वाटते . म्ह्णून या वाटेवर यात्रेकरू व्यापारी लोकांना पाणी पिण्यासाठी वाटेवर हे टाके खोदले असावे असा अंदाज आहे.
पाने गावामध्ये चौकशी केली असता गावातील पूर्वी लोक शिकारीला पारधीला गेले कि या ठिकाणी सोबत आणलेल्या भाकरी खाण्यासाठी बसत असतं.आणि येथील थंडगार पाण्याचा आस्वाद घेत असत. म्हणून टाक्याच्या कोणावर शिकारी लोकांनी भाले पाजवत असत म्ह्णून तीन चार रेषा पडल्या आहेत .
याच टाक्याच्या बाजूला एक मोठ्या घराच्या आकारची एक दगड आहे अजूनही तशीच तग धरून आहे. बाजूला एक भले मोठे झाड असल्याने झाडाची पाने या टाक्यात पडत असतात तरीही पाणी एखाद्या फिल्टर सारखे शुद्ध आहे . पूर्वी पाने गावातील पोट्याचा वाडा व खाली उपांडा मार्गे येथे जाण्यासाठी दोन्हीकडून वाटा होत्या पण आता झालेल्या भुस्कक्लनामुळे वसरा येऊन पोट्याच्या वाडा मार्ग सध्या तरी बंद आहे उपांड्या मार्गे जाऊ शकतात.
येथे पोचल्यावर एक निरव शांतात मिळते आणि एक सुखद अनुभव मिळतो . येथूनच पुणे जिल्यात घाट माथ्यावर पायवाट जाते पण योग्य माहितीशिवाय कोणीही जाऊ नये. येथूनच समोर डोंगरात एक दोन गुहा आहेत पण जुन्या जाणत्या लोकांच्या माहिती नुसार सात शिकारी त्या गुहेत गेले आणि लागोपाठ आत पडून कुठे गायब झाले ते समजले नाही. तेथ पासून त्या गुहेच्या ठिकाणी कोणीही आजपर्यँत फिरकले नाही. असे स्थानिक सांगतात.
पण जर हे टाके साफ करून त्याला पुन्हा खाली एक बांध घातला तर नक्कीच रानातील जनावरांना पाणी मिळू शकेल . जर या ठिकाणी जायचे झाल्यास स्थानिक गावकऱ्यांना विचारूनच जा..
लवकरच साद सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे येथे शिलालेख नक्की काय आहेत किती साल व कोणी टाके खोदले आहे याचा अभ्यास करून येथे एक संवर्धन मोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती साद सह्याद्री प्रतिष्ठान चे मुख्य सल्लागार श्री केतन फुलपगारे यांनी सांगितले.
राकट सह्याद्रीच्या कड्यांच्या मधून थंड मधुर पाणी कसे काय येते याचे एक कोडेच आहे आणि महत्त्वाचे म्हणजे येथे जनावर टाक्या मध्ये पाणी पीत नाहीत असे बरेच जण सांगतात हे पण एक आश्चर्य आहे. येथे अजून शोध मोहीम घेतल्यास बर्याच बाबी उलगडू शकतात.
धन्यवाद
Pandav take पांडव टाके Google Map link
– महाड रायगड माझं गाव माझा अभिमान