Pune to Aaravi beach trip planning | पुणे ते अरवी चा समुद्रकिनाऱ्याचा प्रवास आणि माहिती

Hosted Open
5 Min Read
aaravi-beach

Pune to Aaravi beach trip (distance from pune: 170 km)

रोजच्या धावपळीच्या रुटीन मधून सर्वानाच कधी ना कधी एक ब्रेक हवा असतो. आणि सर्वजण मग सुट्टीची वाट पाहत असतात. त्यात मुलांना शाळेला सुट्ट्या पड्ल्याकी काही बोलायलाच नको. बाहेर कितीही तीव्र वातावरण असो. सर्वजण फक्त फिरायला जाण्याचे निमित्त शोधात असतात. आणि आजकाल सोशल मीडिया मुळे अनेक चांगली पर्यटन स्थळे गर्दीने ओसंडून वाहत असतात. त्यामुळेच ज्यांना रोजच्या धावपळीच्या रुटीन मधून थोडा निवांतपणा हवा असतो ते थोडं ऑफबीट डेस्टिनेशन च्या सतत शोधात असतात. आज आपण पुण्यापासून जवळ असणाऱ्या अश्याच एका निवांत, शांत, स्वच्छ आणि सुंदर, समुद्रकिनाऱ्याबद्दल माहिती सांगत आहोत. ज्याचे नाव आहे “अरवी समुद्रकिनारा”.

अरवी बीच ला का जावे? Why go to Aaravi Beach?

aaravi beach

पुण्यापासून १७० km अंतरावर असलेल्या, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन (Shrivardhan) शहरापासून जवळ असलेला हा अरवी बीच आपल्या मनाला मोहून टाकणारा आहे. स्वच्छ, पांढऱ्या वाळूचा किनारा आणि निळाशार समुद्र यांचे मनमोहक दृश्य पाहून डोळे आणि मन भरून येते.

किनारपट्टीवर असलेल्या सुपारीच्या आणि नारळीच्या झाडांमुळे इथला परिसर आणखी हिरवागार आणि रमणीय वाटतो. शांत वातावरणात लाटांचा आवाज ऐकत येथे वेळ घालवणे म्हणजे निव्वळ स्वर्गसुख.

पण हा अरवी बीच जास्त लोकांना माहित नाही. कारण पुण्याहून कोकणात समुद्राचा आनंद घेण्यासाठी पर्यटक जास्त करून दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, हर्णे, दापोली, इत्यादी ठिकाणी जातात. अरवी बीच तसा थोडासा आडमार्गावर असल्यामुळे इथे पर्यटक जात नाहीत.

पण ज्यांना शांतता, समाधान, एकांत आणि निसर्ग हवा आहे त्यांनी या समुद्रकिनाऱ्याला आवर्जून भेट दिली पाहिजे. इथली प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रेमात पाडते. पंढरीशुभ्र वाळू, निळेशार पाणी, थंड हवा, उंच उंच नारळ आणि सुपारीच्या बागा तुम्हाला वेगळाच आनंद देऊन जातात.

अरावी समुद्रकिनारा तुलनेने कमी गर्दीचा असल्याने इथे तुम्हाला खेळायचे वॉटर स्पोर्ट्स मिळणार नाहीत. बीच वर पर्यटकांची गर्दी कमी असेल, इथून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही बघू शकता. हा समुद्रकिनारा अजूनतरी फार कमर्शियल झाला नाही. पण उत्तम होम स्टे ची राहण्याची सोया आहे. त्याच सोबत घरगुती जेवण हि चांगले मिळू शकते.

अरवी बीच ला कसे पोचावे? How to reach Aaravi Beach?

पुण्याहून निघाल्यानंतर ताम्हिणीमार्गे माणगाव आणि तिथून राईट घेऊन म्हसळा वरून सरळ तुम्ही श्रीवर्धनमार्गे अरवी बीच ला पोचू शकता. पुणे ते अरवी बीच यानंतर साधारण १७० km आहे. ४ ते ५ तास पूर्ण प्रवासाला लागू शकतात. रस्ते उत्तम झाले आहेत, त्यामुळे प्रवासाचा कंटाळा येणार नाही.

Pune – Tamhini – Mangaon – Mhasala – Shrivardhan – Aaravi

अरवी बीच ची ट्रिप कशी प्लॅन करावी? How to plan a trip to Aaravi Beach?

अरवी बीच हा रायगड जिल्ह्यातील सुंदर समुद्रकिनारा आहे. इथे तुम्ही सहलीसाठी गेल्यानंतर याच्या आसपास अजूनही बऱ्याच गोष्टी आणि ठिकाणे, मंदिरे आहेत जी तुम्ही पाहू शकता.

  • दिवेआगर: अरवी बीच पासून जवळच असलेल्या दिवेआगर या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. इथे तुम्ही बीच पाहू शकता, त्याचबरोबर सुवर्ण गणेश मंदिराला भेट देऊ शकता. त्यानंतर येतेच असणाऱ्या रुपनारायण मंदिराला देखील भेट देऊ शकता.
  • श्रीवर्धन: अरवी बीच पासून श्रीवर्धन हे सुद्धा जवळच्या अंतरावर असून हे तालुक्याचे ठिकाण आहे. इथे सुद्धा तुम्हाला बीच पाहायला मिळेल. इथे प्राचीन स्वयंभू जीवनेश्वर मंदिराला देखील भेट देऊ शकता. त्याचसोबत श्रीवर्धन येथे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्मस्थळ आहे ते देखील पाहू शकता.
  • हरिहरेश्वर: अरवी बीच पासून हरिहरेश्वर हे साधारण एक तासाच्या अंतरावर आहे. इथे सुंदर समुद्रकिनारा तर आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे इथे असणारे हरिहरेश्वराचे मंदिर.

हरिहरेश्वर हे कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान आहे. हरिहरेश्वर हे ठिकाण “दक्षिण काशी” म्हणुन ओळखले जाते, समुद्र किनार्‍यावरच श्री शंकराचे भव्य मंदिर आहे, मंदिराचे बांधकाम लाकडी आणि दगडी कोरीव आहे. असे म्हणले जाते कि पहिल्या बाजिराव पेशव्यांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केला आहे.

मंदिरामध्ये ब्रम्हा, विष्णु, महेश व देवी पार्वती च्या मुर्ती आहेत, त्याच प्रमाणे श्री काळभैरव व योगेश्वरी यांच्या देखील मुर्ती आहेत. मंदिर जरी समुद्र किनार्‍यावर असले तरी प्रदक्षिणा मार्ग थोडा मोठा आहे. एक डोंगर आणि त्याची गणेश खिंड पार करून पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर उतरून डोंगराला वळसा घालून परत मंदिरात यावे लागते.

तर अश्या पद्धतीने तुम्ही आरावी बीच ची ट्रिप प्लॅन करू शकता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *