SS राजामौली Movie List:
नेहमी आपण नवीन आलेला मूवी त्यात कोणते अक्टर्स आहेत, त्याची स्टोरी काय आहे, ट्रेलर कसा आहे, यांसारख्या गोष्टींचा अंदाज घेऊन आपण चित्रपट थिएटरमध्ये पहायचा की घरी OTT वर हे ठरवतो. पण या सर्व गोष्टी बाजूला सारून प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यासाठी राजामौली SS Rajamouli हे नावच पुरेसं आहे.
10 ऑक्टोबर 1973 रोजी जन्म झालेल्या एस एस राजमौली यांच्या कल्पनाशक्ती आणि आणि दिग्दर्शनाच्या कौशल्य बाबत आपण बोलायचे की नाही याचाच विचार करावा लागेल. कारण सामान्य माणसाची विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती जिथे थांबते तिथून पुढे एस एस राजमौली यांची बुद्धिमत्ता, विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती सुरू होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. उदाहरण द्यायचे झाले तर भारतीय चित्रपट सृष्टीत 500 करोड रुपयांचा व्यवसाय, एक हजार करोड रुपयांचा व्यवसाय, दीड हजार करोड रुपयांचा व्यवसाय हे माईलस्टोन फक्त यांनीच सेट केले आहेत, आणि त्याची उदाहरणे म्हणजे बाहुबली चित्रपट.
भारतीय प्रेक्षकांना लार्जर दॅन लाईफ ही कन्सेप्ट काय असते हे फक्त त्यांनीच दाखवून दिली, आणि आणि ती पडद्यावर साकारत असताना अतिशयोक्ती किंवा खोटी वाटू नये याची कशाप्रकारे काळजी घ्यायची हे आजपर्यंत कुणालाही जमले नाही जे फक्त एस एस राजा मुली यांनी करून दाखवले. नुकताच प्रदर्शित झालेला एस एस राजमौली यांचा RRR हा चित्रपट त्याचे जिवंत उदाहरण आहे. चित्रपट पाहत असताना प्रेक्षकांना एका दुसऱ्या जगात घेऊन जाण्याचे कौशल्य हे एस एस राजमौली यांनी साधले आहे स्वतःचे अस्तित्व, विसरून स्वतःचे जग विसरून तीन तास प्रेक्षकांना दुसऱ्या जगात घेऊन जाणे हा काही जोक नाही तर अशा या लीजेंडरी व्यक्तीला आमचा सलाम.
एस एस राजमौली यांनी आजपर्यंत दिग्दर्शित केलेले Blockbuster-Hit चित्रपट आपण खाली पाहू.
1. Student No.1 (2001) – IMDb 7
2. Simhadri (2003) – IMDb 7.6
3. Sye (2004) – IMDb 7.5
4. Chatrapathi (2005) – IMDb 7.7
5. Vikramarkudu (2006) – IMDb 7.7
6. Yamadonga (2007) – IMDb 7.4
7. Magadheera (2009) – IMDb 7.4
8. Maryada Ramanna (2010) – IMDb 7.5
9. Eega (2012) – IMDb 7.8
10. Baahubali: The Beginning (2015) – IMDb 8.1
11. Baahubali 2: The Conclusion (2017) – IMDb 8.3
12. RRR (2022) – IMDb 9.2