“टवळीचे टोक” एक नैसर्गिक पहारेकरी दुर्ग आणि बुरुज

Hosted Open
2 Min Read
दुर्ग-दुर्गेश्वर-रायगड-चा-पहारेकरी
पुनाडेवाडी – टवळीचे टोक: एक नैसर्गिक पहारेकरी दुर्ग आणि बुरुज…
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्ग दुर्गेश्र्वर किल्ले रायगड जसा भक्कम पणे उभा आहे तसेच त्याच्या आजुबाजुला अनेक छोटे पहारेकरी दुर्ग आणि बुरुज निर्मित आणि नैसर्गिक पणे उभे राहून किल्ले रायगडाचे संरक्षण एखाद्या पहारेकरी मावळ्यांप्रमाणे करत उभे आहे.
यामधे सोनगड, चांभारगड, माणगड, लिंगाणा, बावळे गावातील कणा डोंगर, कोकणदिवा असे अनेक दुर्ग उभे आहेत. किंबहुना ही संपूर्ण सह्याद्री रांग स्वराज्याच्या रक्षणासाठी उभी आहे. स्वराज्याचा रक्षणासाठी शत्रु वर नजर ठेवण्यासाठी टेहळणी साठी व छुप्या गनिमी काव्याने शत्रूला मारण्यासाठी यांचा उपयोग होत होता.
यामधे खुद्द छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसणारा डोंगर पण आहे. येथूनच पुणे घाट मार्गे पायी वाटा आहेत त्यातीलच हा एक निसर्ग निर्मिती एखाद्या बुरूजा प्रमाणे भासणारा महाड तालुक्यातील पुनाडेवाडी गावातील
“टवळीचे टोक” निसर्ग निर्मित पहारेकरी बुरुज..
पूर्वी पूनाडेवाडी गाव किल्ले रायगडापासून हाकेच्या अंतरावर असून सुद्धा रायगड खोरे रस्ता नसल्याने लांब वाटत होते पण आता नव्याने झालेल्या माणगाव रायगड महामार्गामुळे हे गाव किल्ले रायगडापासून हाकेच्या अंतरावर आले आहे. पुणे मुंबई मार्गे येणारे बहुतेक शिवभक्त आणि स्थानिक वेळ पैसा आणि इंधन बचत होत असल्याने याच मार्गाने येतात.

त्यामुळे येणार्‍या जाणार्‍या पर्यटकांना राहणे खाणे पिणे या सगळ्या सोयी या गावात उपलब्ध आहेत. गाव अतिशय सुंदर व रमणीय आहे. आजुबाजुला गर्द झाडी आणि सह्याद्री रांगा बाजूला दुर्ग दुर्गेश्र्वर किल्ले रायगड आणि पहारेकरी कोकणदिवा गारजाई गाव तसेच टवळीचे टोक बुरुज आणि एका बाजूला माणगाव खोरे दुसर्‍या बाजूला रायगड खोरे अश्या दोन्ही तालुक्यांतील दुवा असलेले हे गाव आहे.

ह्या डोंगराच्या पायालगत काळभैरव मंदिर आहे ज्यावेळी ह्या मंदिराचं जिर्णोद्धार करत असता तिथे सहा विरगळी सापडल्या त्या शिवकाळीन इतिहासाशी निगडीत आहेत.

जर हा मार्ग रायगड खोरे वाघेरी कींवा बावळे वाळण खोऱ्यात जोडला तर रायगड खोरे अंतर सुमारे दोन तासाने वाचेल शिवाय पैसा आणि वेळ पण वाचेल एवढे माणगाव शहर जवळ आहे भविष्यात हे होईलच.

पण उभ्या स्वराज्याची साक्ष देत अखंडपणे उभा अविरत सेवा करत मोठ्या डौलात राजधानीवर लक्ष ठेवत हा सह्याद्री ताठ मानेने उभा आहे.

धन्यवाद.

-महाड रायगड माझं गाव माझा अभिमान

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *