धर्मवीर बलिदान मास – श्लोक क्रमांक २ – छत्रपती संभाजीमहाराज बलिदान मास श्लोक व संपूर्ण माहिती

Hosted Open
1 Min Read
धर्मवीर बलिदान मास - श्लोक क्रमांक 2

धर्मवीर बलिदानमासश्लोक क्रमांक

श्री संभाजीसुर्यहृदय

मिळण्यास प्राण उठला जरी हि कृतांत
संभाजी धर्म जगले जळत्या रणांत ।
सुर्याहुनी हि अति दाहक धर्मभक्ती
स्फुरण्यास नित्य धरूया शिवपुत्र चित्ती ।।२।।

आजच्या या दुसऱ्या श्लोकाचा अर्थ –

असंख्य संकटे, अत्याचार आपल्याला आजच्या काळातही गिळण्यास तयार आहेत, म्हणजेच आपला नायनाट करण्यासाठी सज्ज आहेत, परंतु या अशा कठीण परिस्थितीत आपण शंभूराजेंना आठवलं पाहिजे त्यांनीही अनेक अन्याय अत्याचार सहन केले मृत्यू त्यांना गिळण्यास मोठ्या ताकदीने सज्ज होता परंतु ते जराही ठगमगले नाहीत, स्वराज्यधर्मासाठी शंभूराजे मृत्यूरुपी जळत्या रणात एखाद्या तलवारी प्रमाणे लखाकले , त्यांच्या सारखे धर्मवीर पुन्हा होऊ शकत नाही.

सूर्यालाही घाम फोडेल अशी दाहक त्यांची धर्मभक्ती होती, जर आपल्याही मनात अशी धर्मभक्ती जागवायची असेल तर या महान शिवपुत्रांना आपण आपल्या चित्तात वसवले पाहिजे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *