निघालो होतो कोकण सफरीवर, पण असं काही होईल वाटलेही न्हवते. अद्भुत! Part 1

Hosted Open
9 Min Read
कोकण-सफर

कोकण सफर…

दिवाळीच्या सुट्टीत नेहमी आम्ही कुठेतरी दुर्ग भ्रमंती करायला बाहेर पडतो. या दिवाळीत कुठे जायचा असा प्रश्न २ दिवसांपासून मनात घोळत होता. शेवटी मित्रांसोबत चर्चा करून कोकण भ्रमंती व जवळील किल्ले बघायचे ठरवले व आम्ही तयारीला लागलो. त्याच प्रवासातील भन्नाट प्रवास आज तुम्ही या लेखात वाचू शकता.

Day 1: Part 1

झाले १ ला दिवस उजाडला सकाळी 6 ला निघायचे ठरले मी पहाटे 4:30 ला उठून तयार झालो आणि रोहन आणि स्वप्नील ला कॉल केला. पण रोहन ने तर कॉलच उचलला नाही आणि स्वप्नील चा तर लागलाच नाही. २ ते ३ वेळ प्रयत्न केला तरी काहीच उत्तर नाही म्हणून मी माझे आवरायला घेतले, 6 वाजता निघायचा होते आणि टाइम निघून गेला आणि म्हंटले निघायलाच जर उशीर झाला तर पुढे पण उशीर होईल.

पुन्हा एकदा कॉल केला आणि नशीब दोघांनी ही कॉल उचलला आणि 10/15 मिनिटात निघतो बोलले मग मी पण बस ने वाकड ला गेलो. तेथे गेल्यावर त्यांना माझे locationपाठवले आणि चहा घेतला. चहा घेत – घेत आसपास बघत थांबलो. खूप जण कामावर चालले होते खूप जण गावाला जाण्यासाठी गाडीची वाट पाहत उभे होते ते पाहत पाहतच काही selfies घेतल्या तेवढ्यात ते दोघे हॉर्न वाजवत शेजारी येऊन थांबले. पाठीवरचे ओझे कमी करत बॅग गाडी मध्ये ठेवली आणि दोघांची भेट घेऊन निघालो.

कोकण सफरी साठी भारतातील कोकण हा प्रदेश भारतातील पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो.

कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगर उतारांवर केलेली भातशेती हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहे.कोकण म्हणजे स्वर्गच आहे.

“कोकणाला संस्कृतमध्ये अपरान्त म्हणतात.”

आमचा route फिक्स होता, जाताना ताम्हिणी घाटातून जायचे, मग चांदणी चौकातून मुळशी मार्गे पुढे प्रवास सुरू केला वाटेत जाताना रोहन बोलला की पिरंगूट फाटा येथे मस्त वडापाव मिळतो मग गाडी डायरेक्ट तिथे नेली आणि मस्त पैकी वडापाव आणि चहा चा आस्वाद घेतला. त्यानंतर गाडी स्टार्ट केली आणि निघालो पुढे..

वातावरण खूपच भारी होते “काय झाडी, काय डोंगर, काय रोड होते”. एकदम जबरदस्त रोड बनवले होते ताम्हिणी घाटातील आणि कोकणात जाणारे ही रोड चांगले केले आहे. फक्त नागमोडी वळणे जास्त असल्यामुळे आम्ही एकदम निवांत चाललो होतो. गाडी एकदम मस्त चालत होती घाटातून. घाटात जाताना Plus valley लागली, देवकुंड secret point पहिला पण लांबूनच, कारण अजून खूप लांब जायचे होते तर वेळ दडवून चालणार नव्हती.

जाताना खूपच प्रसिद्ध असे कुंडलिका व्हॅली चे दर्शन घेतले पावसाळा मध्ये पुनः येऊ म्हणून तिथे 1/2 फोटोस घेऊन पुढे निघालो येथूच शेजारी कमी प्रसिद्ध असलेला किंवा खूप ट्रेकर्स पासून अपरिचित असलेला कैलासगड दिसला या गडाचे खालूनच दर्शन घेऊन पुनः गड भ्रमंती साठी येऊ म्हणून पुढे निघालो.

रोडवर वाटेत वेगवेगळे गाव, वाड्या, वस्त्या पाठीमागे सोडत इंदापूर मार्गे ताळा गावातून पुढे निघालो. वाटेत जाताना तळगड किल्ला पहिला खूपच भक्कम असा हा गड खालून दिसत होता त्याची बऱ्यापैकी तटबंदी शाबूत होती. या ही ठिकाणी लवकरच येऊ म्हणून पुढे निघालो एक दोन ठिकाणी रस्ता चुकलो पण पुनः योग्य वाटेवर आलो. रोहन तर गाडी मध्ये बसल्या बसल्याच झोपला.

आपले destination अजून 60 km होते आणि माझे गाडी मध्ये बसून बसून डोके दुखायला लागले कदाचित रात्री पुरेशी झोप न घेतल्यामुळे दुखत असेल म्हणून मी पण थोडी डुलकी घेतली पण घाट रस्ता काय झोप लागू देत नव्हता एक वळण झाले की लगेच दुसरे वळण येत होते त्यामुळे झोप काय पूर्ण करता नाही आली, तेवढ्यात पुढे डोंगर फोडून एक रस्ता बनवलेला भाग दिसला बाजुला दोन हिरवेगार डोंगर आणि मधून जाणारा रस्ता खूपच सुखदायक वाटत होता याचे काही फोटो ही घेतले आणि पुढे निघालो आणि शेवटी आम्ही आमच्या destination वर पोहचलोच..

रोड वरूनच 4 बाजूंनी समुद्रातील पाण्याने वेढलेला भव्य दिव्य असा जंजीरा किल्ल्याचे दर्शन लांबूनच झाले आणि आम्ही या ठिकाणी ज्या गोष्टी साठी आलो होतो ते दुरून पाहूनच मन तृप्त झाले. किल्ला फिरायला पुनः येऊ म्हणून एक हॉटेल/रूम बघून लवकर check in करायचे होते, म्हणून मुरुड गावात आलो. Pre booking करून आलो नव्हतो पण काही ठिकाणी online available दाखवत होते म्हणून on the spot booking करू म्हणून आम्ही येथे direct आलो एका ठिकाणी गेलो पण ते काही एवढे खास वाटले नाही म्हणून अजून 3/4 ठिकाणी जाऊन चौकशी केली काही हॉटेल Alredy booked होते तर काही beach पासून लांब होते आम्ही sea Facing view मिळवा म्हणून भरपूर ठिकाणी फिरलो पण पाहिजे तसे हॉटेल/रूम्स मिळत नव्हते.

पण आमचे नशीब एवढे भारी की Resorts मधील एक जन त्याच रस्त्याने चालले होते, त्यांनी आम्हाला सहज विचारले रूम पाहिजे का? मी लगेच हो पाहिजे बोललो त्यानी लगेच कॉल करून आम्हाला तिकडे घेऊन गेले आणि रूम दाखवली तेव्हा रूम Cleaning सुरू होती, म्हणून आम्ही आस पास फिरून पहिले तर पाठीमागून beach वर जाण्यासाठी रस्ता होता आम्हाला ठिकाण आवडले.

बॅग रूम मध्ये टाकल्यानंतर फ्रेश झालो, आणि बीच वर जाऊन आलो पण भूक खूप लागली होती साधारणतः 3 वाजले होते आम्ही 1 वाजता check in केले. त्यांचा check in – check out timming 12 pm ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 am पर्यंत होता पण आम्ही त्यांना request करून 12 पर्यंत timming वाढवून घेतला. रूम मालकना विचारले त्यांच्याकडे जेवणाची काही सोय आहे ते बोलले त्यांच्या येथे काहीच सोय नाही, पण त्यांनी आम्हाला पाटील खानावळ म्हणून एक हॉटेल suggest केले आणि आम्ही चालत जाऊन ते शोधले आणि जाऊन बसलो.

हॉटेल चा परिसर सर्व बाजूंनी नाराळाच्या झाडांनी वेढलेला होता एकदम मस्त वाटत होते तेथे 15/20 मिनिटे तिथे बसलो तेव्हा कुठे आमची ऑर्डर घेण्यासाठी एक जन आला तो खूपच co-oprative होता तो. त्याचे नाव गणेश होते त्याने आम्हाला खूप चांगले treat केले. जेवण करून बाहेर आलो गाडी गेट च्या बाहेर उभी केली होती ती आत मध्ये घेतली आणि फ्रेश होऊन रूम च्या मागे छोटे गार्डन होते तिथे थोडा वेळ बसून बीच वर गेलो. मनसोक्त बीच पहिला परत रूम वर आलो गाडी काढली आणि थेट जंजीरा किनारा गाठला पण वेळ झाली होती म्हणून बोट किल्ल्यावर सोडत नव्हते भरती – ओहोटी असते म्हणून 5 नंतर बोट किल्ल्यावर सोडत नाही असे तेथील तिकिट देणाऱ्या चाचा नि सांगितले पण निराश न होता पुनः उद्या सकाळी लवकर येऊ म्हणून तिथेच थोडा वेळ समुद्र किनारी बसून लाटांचा खळखळ आवाज ऐकत आणि सूर्यास्त बघत बसलो आणि थोडा वेळानंतर रूम वर परत आलो फ्रेश झालो कपडे बदलले आणि थेट beach गाठले. बीच वर काही मुले cricket खेळत होते आम्ही पण त्यांच्या मध्ये सामील झालो आणि मनसोक्त खेळलो खूप वर्षा नंतर cricket खेळत होतो.

तिथून समोरच पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला अप्रतिम दिसत होता छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जंजीरा किल्ला जिंकण्यासाठी समुद्र मध्ये बांधला होता. आता तिथे जास्त कोणी जात नाही पण private बोट करून जाऊ शकतो. असे तेथील लोक बोलले. पण आम्ही येथेही दुसऱ्या दिवशी जाऊ म्हणून आम्ही beach वरच enjoy करत 2/3 तास बीच वरच टाइम पास केला आणि फ्रेश होऊन घरून दिवाळीचे काही फराळ घेऊन गेलो होतो ते खाल्ले आणि पुनः गार्डन मध्ये येऊन गप्पा मारत बसलो.

सूर्यास्त झाला, तिथेच एक मुंबई वरुण एक ग्रुप आला होता त्यांच्या पैकी एकाचा बर्थडे होता म्हणून त्यांनी आणलेला cake आम्हाला ही देऊ केला, आम्ही त्यांना बर्थडे wish केला आणि रात्रीचे टीमटीमते चांदणे पाहत बसलो साधारणतः 11 वाजता झोपायला गेलो. थोडा वेळ गप्पा मारल्या आणि सकाळी लवकर उठून जंजीरा किल्ला पाहायला जाऊ म्हणून झोपी गेलो. कारण सकाळी 9 वाजता गडावर जाणारी पहिली बोट जाते असे एका जनाने आम्हाला सांगितले होते. आणि आम्हाला सकाळी 12 वाजता check out करायचे होते आणि पुढे पुणे ला परत जायचे होते म्हणून सकाळ – सकाळ गड explore करून येऊ म्हणून लवकरच झोपलो.

उर्वरित Story दुसऱ्या भागात

क्रमश …………

Thank you…
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *