१६ कॅम्पिंग टिप्स 2022: जर पहिल्यांदा कॅम्पिंग ला जात असाल तर या चुका करू नका.

Hosted Open
4 Min Read
कॅम्पिंग टिप्स

आजकाल अनेक लोक आपल्या रोजच्या दैनदिन कामातून वेळात वेळ काढून हमखास फिरायला जातात. त्यामध्ये काही कुटुंबासोबत तर काही एकटे किंवा मित्र-मैत्रिनिंसोबत फिरायला जातात. आता प्रवास किंवा पर्यटन हे का आणि कसे गरजेचे आहे याचा डोस मी तुम्हाला देणार नाही कारण तो अस्खलितपणे या आधीही तुम्हाला कुणीतरी दिला असेलच. त्यामुळे आपण थेट मुद्यावर येऊ.

फिरण्याचे किंवा पर्यटनाचे खूप प्रकार आहेत. पण आजकालच्या तरुण रक्ताला नेहमी काहीतरी वेगळे हवे असते. ते सतत याच्या शोधात असतात. आणि त्यामुळेच हल्ली ग्रुप ने अज्ञात आणि थोड्या लांब जंगली ठिकाणी एखाद्या धरणाच्या पाण्याजवळ जाणे आणि तिथे जेवण बनवून फुल्ल मज्जा मारणे अशी पद्धत रूढ होताना दिसत आहे. यालाच “कॅम्पिंग” म्हणतात.

पण हे करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे. कारण सर्व मजा आणि आनंद घेऊन तुम्ही सुखरूप घरी परत यावे असे आम्हाला मनापासून वाटते.

आता आपण खालील गोष्टी विचारात घेऊ…

१) तुम्ही निवडलेली जागा हि जास्त दूर आणि आत मध्ये नसावी. कारण गाडी थांबवून जर जास्त अंतर आत मध्ये चालत जावे लागले तर परत येताना रात्रीचे भान न राहिल्यामुळे अंधारात रास्ता चुकू शकतो.

२) तुम्ही निवडलेल्या ठिकाणचे ऑफलाईन गुगल मॅप्स फोन मध्ये डाउनलोड करावा.

३) फोन ची बॅटरी साठी जास्तीचा बॅकअप असणे गरजेचे आहे. कारण फोटो आणि विडिओ काढताना मोबाइल लवकर डीस-चार्ज होतो.

४) तुम्ही सोबत नेत असलेल्या सामानासोबत एखादा छोटा चाकू, दोरी, अँटिसेप्टिक क्रीम, ग्लुकोज पाकिटे, खडीसाखर या गोष्टी पण सोबत ठेवाव्यात.

तुम्ही तुमच्या स्पॉट वर पोहचल्यानंतर तिथे काय काळजी घ्यावी?

१) जेवण करण्यासाठी अशी जागा शोध जी थोडी उंच आणि जमीन घट्ट असेल. यामुळे किडे, आणि सरपटणारे प्राणी यांच्या पासून सुरक्षित राहाल.

२) त्यानंतर तुमचे सर्व सामान खाली ठेऊन द्या पण श्यकतो जर मांसाहारी सामान असेल तर ते उंच झाडावर अडकवून ठेवा.

३) जिथे धरणाचे पाणी आहे तिथून कमीत कमी ८० ते १०० फूट दूर तुमचा कॅम्प असावा. जेणेकरून रात्रीच्यावेळी इतर कोणतेही प्राणी आले तरी तुम्ही त्याना पाहू शकाल.

४) तुम्हाला कितीही चांगले पोहता येत असले तरी पाण्यात जाताना थोडी काळजी घ्या. कारण पाण्यात खूप धोके असतात.

५) शक्य होईल तितके लवकर अंधार पडायच्या आधी तिथून निघा, किंवा जर तिथेच रात्र घालवणार असाल तर अंधार पडायच्या आधी शेकोटी किंवा जेवणासाठी आग तयार करा.

६) एक लक्ष्यात ठेवा जंगलामध्ये लवकर अंधार होत असतो आणि त्या नंतर अंधारात वावरणारे निशाचर किंवा वन्य प्राणी हे त्यांच्या खाद्य शोधण्यासाठी बाहेर पडतात.

७) शक्य होईल तेवढे लवकर जेवण आवरून घ्या, आणि उरलेले जेवण तुमच्या कॅम्प पासून १००-१५० फूट लांब ठेवा.

८) तेथे वाहणारे पाणी किंवा साठलेले पाणी स्वछ दिसते म्हणून सरळ पिऊ नका. कारण त्यात मृत जनावर किंवा प्राणी यांचे बॅक्टरीया मिसळले असतील तर तुम्ही आजारी पडू शकता.

९) जर तिथं पाणी प्यायची वेळ आली तर ते उकळून घ्या आणि मग प्या.

१०) रात्री झोपताना सर्वानी एकावेळी न झोपता २ जण जागे राहू शकत असतील तर खूप चांगले. थोड्या वेळाने त्यांनी झोपून दुसरे दोनजण जागे राहतील.

११) यामुळे येणाऱ्या संकटाची आधीच चाहूल लागली तर ते सर्वाना जागे करतील.

१२) सर्वात महत्वाचे.. आपला कचरा तेथेच न टाकता येताना सोबत घेऊन यावा.

निसर्गाचा आदर करून आपण पर्यटन केले तर आपल्याला काहीही त्रास किंवा धोका निर्माण होत नाही. त्यामुळे सर्व काळजी घ्या आणि मनमुरादपणे कॅम्पिंग चा आनंद घ्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *