4 days trip from pune outside maharashtra: अनेक लोकांचा प्रश्न असतो कि लॉन्ग विकेंड ला कुठे फिरायला जायचे. मुद्दा असा आहे कि, फिरायला जायचा आपण प्लॅन केला कि अख्या जगानेपण केलेला असतो. आणि नेमका सुट्टीचा आणि डेस्टिनेशन चा आनंद घेण्यापेक्षा जास्त वेळ रस्त्याला ट्रॅफिक मध्ये जातो.
सुट्टीवरून परत आल्यानंतर ५ मिनिटं डोळे बंद केल्यानंतर पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ते ट्रॅफिक जॅम आणि गर्दी. खरंतर सुट्टि म्हणजे रोजच्या कामातून थोडा निवांतपणा अनुभवणे आणि पुन्हा ताजेतवाने होऊन बॅक टू रुटीन. पण काही कारणास्तव असा होत नाही.
त्यामुळेच या ब्लॉग मध्ये मी माझा अनुभव सांगणार आहे आणि ४ दिवसांच्या सुट्टीसाठी पुण्यापासून जवळ असणाऱ्या अभयारण्याला आणि मंदिराला कशी भेट देता येईल त्यावर बोलणार आहे.
४ दिवसांच्या सुट्टीसाठी पुण्याचा जवळ खूप ठिकाणे आहेत, पण सर्वजण तिकडेच जातात त्यामुळे रस्त्याला गर्दी खूप होते. त्याऐवजी तुम्ही दांडेली, गोकर्ण, मुरुडेश्वर या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.
४ दिवसांची पुणे-दांडेली-गोकर्ण-मुरुडेश्वर ट्रिप तुम्ही पुढीलप्रमाणे प्लॅन करू शकता.
दिवस १ – पुणे ते दांडेली (अंतर – ४३७ किलोमीटर)
दांडेली येथे काय कराल: जंगल कॅम्पिंग, ट्रेकिंग, फॉरेस्ट सफारी, मॉर्निंग जंगल वॉक, कॅम्प फायर, रिव्हर राफ्टिंग, ऍडव्हेंचर स्पोर्ट्स, आणि बराच काही.
रस्ता: पुणे – सातारा – कोल्हापूर – बेळगाव – दांडेली
पहिल्या दिवशी तुम्ही पहाटे लवकर निघून दुपारी १ पर्यंत दंडेली येथे पोहोचू शकता. वाटेत कोल्हापूर येथे महालक्ष्मीचे दर्शन घेऊन मिसळ खाऊन पुढे जात येईल. पोहोचल्यानंतर फ्रेश होऊन मस्त जेवण करणे, आणि वेगवेगळे खेळ खेळणे किंवा विश्रांती घेणे, किंवा संध्याकाळच्या जंगल सफरीवर हि जाऊ शकता.
या नंतर संध्याकाळी चहा घेत गप्पा मारणे आणि जंगलातून एक पायी फेरफटका मारणे सुद्धा होऊ शकते. रात्री ८ नंतर जेवणाची तयारीला लागतात आणि ९ पर्यंत जेवण आवरून मस्त कॅम्पफायर करणे.
दिवस २ – दांडेली जंगल सफारी आणि ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी
सकाळी लवकर उठून तुम्ही मॉर्निंग सफारी करू शकता, किंवा तुम्ही स्वतः जंगल ट्रेक किंवा नॉर्मल वॉक ला जाऊ शकता, त्यानंतर रिव्हर राफ्टिंग आणि बाकीचे ऍडव्हेंचर खेळ खेळून झाल्यावर तुम्ही दुपारी थोडी विश्रांती घेऊन पुन्हा संध्याकाळी जंगल सफरीवर जाऊ शकता.
संध्याकाळी पुन्हा रिसॉर्ट वर येऊन जेवण करणे आणि गप्पा मारणे व कॅरम, बुद्धिबळ सारखे खेळ खेळणे हि होऊ शकते.
दिवस ३ – दांडेली – गोकर्ण – मुरुडेश्वर (अंतर – २२० किलोमीटर)
सकाळी नाश्ता करून १०० किमी वरील गोकर्णला जाणे. कारवारच्या घनदाट जंगलातून, वळणदार रस्त्यांवरून, प्रवास कधी संपतो कळत नाही. गोकर्णाला पोचल्यानंतर तुम्ही प्रसिद्ध महाबळेश्वर मंदिराला भेट देऊन भगवान शंकराचे दर्शन घेऊ शकता. त्यानंतर ओम बीच ला भेट देऊन प्रसिद्ध याना गुहा बघायला जात येईल.
त्यानंतर तिथून निघून आजच्या दिवसाचे मुक्कामाचे ठिकाण मुरुडेश्वरला जाताना वाटेतच होन्नावर हे ठिकाण लागते. हे ठिकाण बॅकवॉटर आणि बोटिंग साठी प्रसिद्ध आहे. इथे आल्यानंतर केरळ मध्ये आल्याचा भास होतो. त्यानंतर तुम्ही इथून मुरुडेश्वरला पोहोचून महादेवाचे दर्शन घेऊ शकता. आणि संध्याकाळी इथेच जेवण करून मुक्काम करू शकता.
दिवस ४ – मुरुडेश्वर ते पुणे (अंतर – ६०० किलोमीटर)
या दिवशी तुम्ही पुन्हा पुण्याला रिटर्न जर्नी सुरु करू शकता. पुण्याला जाण्यासाठी २ मार्ग आहेत.
- मुरुडेश्वर – गोकर्ण – गोवा – कोल्हापूर – पुणे
- मुरुडेश्वर – यल्लापूर – बेळगाव – कोल्हापूर – पुणे
या दोन पैकी कोणताही तुमच्या सोयी नुसार मार्ग निवडून परतीचा प्रवास सुरु करू शकता. दोन्ही रस्ते सुंदर आणि छान आहेत, फक्त गोवा मार्गे आलात तर गोव्याचे ट्रॅफिक लागू शकते.
आणि जर दुसरा मार्ग निवडला तर यल्लापूर चा घाट चढून वर आल्यानंतर थोड्या वेळातच तुम्ही नॅशनल हायवे ४८ ला लागता. आणि अश्या पद्धतीनं चोथ्या दिवशी संध्याकाळी पर्यंत तुम्ही पुण्याला पोचू शकाल.
धन्यवाद.
टीप : रस्त्यांच्या कामामुळे आणि ट्रॅफिक मुळे वर दिलेले सर्व नियोजन शक्य होईलच असे नाही. त्यामध्ये गरजेनुसार बदल करावा लागेल.