७ दिवसांचा कोकण ट्रिप प्लॅन
कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अनोखा, सुंदर आणि रमणीय प्रदेश आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा प्रदेश अथांग समुद्र, विशाल उंच पर्वत, वळनदार नद्या, धबधबे आणि घनदाट जंगलांनी परिपूर्ण आहे. कोकणातील नैसर्गिक विविधता आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यामुळे तो पर्यटकांचे आणि पर्यावरणप्रेमींचे आकर्षणकेंद्र आहे. कोकणची शुद्ध आणि निर्मळ हवा, हिरवेगार डोंगर, स्वच्छ समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य वातावरण पाहून मन मोहून जाते.
कोकणातील समुद्रकिनारे हे विशेष आकर्षण आहे. गणपतीपुळे, हरिहरेश्वर, अलिबाग, मुरुड-जंजिरा, तारकर्ली इत्यादी अनेक सुंदर किनारे या भागात आहेत. स्वच्छ पांढरी वाळू, निळाशार समुद्र आणि तिथला शांतपणा हा किनार्यांवर येणाऱ्या पर्यटकांना आल्हाददायक अनुभव देतो. समुद्र किनाऱ्यांवरून सूर्यास्त पाहताना क्षणभरासाठी मन थांबून जाते आणि निसर्गाच्या या अद्वितीय कलेचा अनुभव घेता येतो.
कोकणातील खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे. येथे मिळणारे नारळ, काजू, आंबा, फणस, आणि कोकम यासारख्या स्थानिक पदार्थांचा स्वाद आगळावेगळा असतो. खासकरून कोकणचा हापूस आंबा तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. कोकणातील मच्छीप्रेमींसाठीही येथील समुद्री मासे, कोळंबी, सुके मासे आणि इतर सागरी खाद्यपदार्थ एक खास मेजवानी ठरते. कोकणाचे सांस्कृतिक महत्त्वदेखील खूप मोठे आहे. येथे अनेक ऐतिहासिक किल्ले, मंदिरे, जत्रा, आणि लोककला कार्यक्रम होत असतात. रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे किल्ले शिवकालीन इतिहासाची साक्ष देतात. तसेच गणेशोत्सव, नवरात्र, होळी या सणांचा कोकणात विशेष उत्साहाने साजरा केला जातो. कोकणातील लोकांच्या साधेपणात एक प्रकारचे सौंदर्य आहे, जे त्यांच्या आदरातिथ्य आणि प्रेमळ वर्तनातून अनुभवायला मिळते.
कोकणाचा विकास हा पर्यावरण आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. जैवविविधता आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक प्रयत्न सुरू आहेत. कोकणातील पर्यटन वाढल्याने स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, आणि त्यामुळे या भागाचा आर्थिक विकासही होत आहे.
निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी आणि खाद्यप्रेमी सर्वांसाठी कोकण हा एक परिपूर्ण पर्यटनस्थळ आहे. कोकणचे अद्वितीय सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि येथील शांत वातावरण यामुळे तो महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे स्थान निर्माण करतो.
महाराष्ट्राला एकूण ७२० km लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे हे आपण शाळेत असतानाच शिकलोय. पन त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि पाहणे हा एक विलक्षण अनुभव आहे, आणि अश्याच या सुंदर कोकणाची आयुष्यात एकदातरी सफर करणे गरजेचे आहे. तर अशी हि कोकणची सफर कश्या पद्धतीने करता येईल ते आपण पुढे पाहू.
महाराष्ट्रातील ७२० km लांबीच्या कोकण ट्रिपचा 7 दिवसांचा प्लॅन येथे आहे, ज्यात समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे आणि अजूनही बरीच ठिकाणे आहेत. तुम्ही कोकण ट्रिप जर प्लॅन करत असाल तर नक्की हा ब्लॉग वाचा, यातून तुम्हाला नक्की फायदा होईल. या मध्ये आम्ही सर्व उत्तम पर्यटन स्थळे नमूद केली आहेत जिथे तुम्ही सहजपणे जाऊ शकता.
दिवस १: अलिबाग पासून सुरुवात
सकाळी अलिबाग बीचवर शांततेत फिरण्याचा अनुभव घ्या आणि कमी भरतीच्या वेळी कोलाबा किल्ल्याला भेट द्या. त्यानंतर वरसोली बीचला जा, जो अधिक शांत आणि विश्रांतीसाठी उत्तम ठिकाण आहे. दुपारी उन्हाच्या वेळी कनकेश्वर मंदिराची भेट घ्या, हे उंच टेकडीवर वसलेले सुंदर शिवमंदिर आहे. संध्याकाळी नागाव बीच एक्सप्लोर करा, जेथे पॅरासेलिंग आणि जेट स्कीइंगसारख्या जलक्रीडांचा आनंद घेता येतो आणि ते कमी गर्दीचे ठिकाण आहे.
अलिबाग जवळील ८ पर्यटन स्थळे (७ दिवसांचा कोकण ट्रिप प्लॅन)
१) सागरगड किल्ला
२) सिद्धेश्वर धबधबा
३) रामदरने किल्ला
४) कार्ले धबधबा
५) रामधरणेश्वर धबधबा आणि धरण
६) अक्षी बीच
७) रायवाडी बीच
८) रामधरणेश्वर धबधबा
दिवस २: अलिबाग ते मुरुड-जंजिरा (६० किमी)
हा रास्ता अत्यंत सुंदर असून तुम्हाला अनेक वळणदार रस्त्यावरून प्रवास करावा लागेल. या प्रवासाची एकूण लांबी ६० KM असली तरीही तुम्ही थांबत थांबत जाणार तर वेळ लागू शकतो. जाताना वाटेत चौल हे गाव लागेल तेथील मंदिरे नक्की पहा. या रस्त्यावर लोकल ट्रान्सपोर्टेशन उपलब्ध आहे.
अलिबाग ते मुरुड-जंजिरा कोकण रूट वरील १३ पर्यटन स्थळे (७ दिवसांचा कोकण ट्रिप प्लॅन)
१) रेवदंडा बीच आणि किल्ला
२) चौल: मंदिर आणि तलाव प्रसिद्ध आहेत, पहिला मराठीतील शिलालेख इथेच सापडला होता.
३) शिवदत्त मंदिर
४) कुंडलिका नदी खाडी
५) कोर्लई किल्ला
६) कोर्लई बीच
७) ताराबंदर रॉक बीच
८) काशिद बीच – स्वच्छ पाण्याचा किनारा, जलक्रीडांसाठी उत्तम ठिकाण.
९) फणसाड वन्यजीव अभयारण्य- निसर्गप्रेमींसाठी जंगल सफारीचा अनुभव.
१०) नांदगाव बीच
११) मुरुड बीच – समुद्रकिनारा आणि आसपासची शांतता उत्तम आहे.
१२) जंजिरा किल्ला – भव्य सागरी किल्ला, बोटीद्वारे प्रवेशकरावा लागतो.
१३) पदमदुर्ग किल्ला – एक अनोखा सागरी किल्ला.
दिवस ३: मुरुड ते दिवेआगर आणि हरिहरेश्वर (४० किमी)
या ४० KM च्या प्रवासात तुम्हाला जेट्टी घ्यावी लागेल. जेट्टीचे टाइम आधीच बघून घ्या, राजापुरी ते दिघी किंवा अगरदांडा ते दिघी अशी फेरी बोट घेऊ शकता. सकाळी दिवेआगर बीचला भेट द्या आणि सुवर्ण गणेश मंदिर पहा, जेथे गणपतीची सोन्याची मूर्ती आहे. दुपारी ‘दक्षिणेची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरेश्वरकडे जा आणि भगवान शिवाला समर्पित हरिहरेश्वर मंदिराला भेट द्या. जाताना वाटे ऐतिहासिक ठिकाण लागेल त्याचे नाव आहे श्रीवर्धन. इथेही अनेक मंदिरे, आणि सुंदर बीच आहे. संध्याकाळी हरिहरेश्वर मंदिरात दर्शन घेऊन गणेश खिंड पहा आणि बीच एक्सप्लोर करा आणि मनमोहक सूर्यास्ताचा अनुभव घ्या.
मुरुड ते दिवेआगर ते हरिहरेश्वर या रूट वरील १२ पर्यटन स्थळे (७ दिवसांचा कोकण ट्रिप प्लॅन)
१) नेव्हल लाइट हाऊस
२) दिवेआगर बीच
३) सुवर्ण गणेश मंदिर, दिवेआगर
४) सूर्य नारायण मंदिर, दिवेआगर
५) मदगड किल्ला
६) कार्ले धरण
७) भरडखोल बीच
८) अरवी बीच
९) श्रीवर्धन – इथे अनेक मंदिरे, बीच, बाजारपेठ तुम्ही पाहू शकता.
१०) हरिहरेश्वर – इथे प्रसिद्ध गणेश खिंड आहे ती नक्की बघा.
११) बाणकोट किल्ला
१२) सावित्री नदी खाडी
दिवस ४: हरिहरेश्वर ते हर्णै आणि आंजर्ले (८० किमी)
सकाळी हर्णै कडे जा आणि हर्णै किल्ला फिरून एक्सप्लोर करा. त्यानंतर हिरवाईने वेढलेले आंजर्ले बीच या निर्मल किनाऱ्याला भेट द्या. जर ऑक्टोबर ते मार्च दरम्यान भेट देत असाल, तर आंजर्ले कासव संवर्धन स्थळावर कासव संवर्धन उपक्रमांचे साक्षीदार होण्याची संधी चुकवू नका. दुपारी आंजर्लेतील सुप्रसिद्ध कड्यावरचा गणपती मंदिराला भेट द्या, जे कड्यावर वसलेले आहे. संध्याकाळी पलांडे बीचवर आराम करा, जो एक ऑफबीट बीच आहे, आणि येथे तुम्ही शांत वातावरणाचा आनंद घेऊ शकता.
हरिहरेश्वर ते हर्णै ते आंजर्ले मार्गावरील ९ पर्यटन स्थळे (७ दिवसांचा कोकण ट्रिप प्लॅन)
१) मंडणगड किल्ला
२) वेळास बीच – इथे कासव महोत्सव असतो
३) केळशी बीच
४) आंजर्ले बीच – कासव संवर्धनाचे काम इथे केले जाते.
५) पाज पांढरी सनसेट पॉईंट
६) गोवा किल्ला
७) फत्तेहगड किल्ला
८) कनकदुर्ग किल्ला
९) सुवर्णदुर्ग किल्ला
दिवस ५वा: हर्णै ते रत्नागिरी (१५० किमी)
पाचव्या दिवशी प्रवासाला सुरुवात करताना Map update करून घ्या, कारण तुम्हाला google नेहमी मेन रोड ने घेऊन जाईल. तर आपल्याला नेहमी समुद्रकिनारीच राहून ट्रॅव्हल करायचे आहे. हर्णै ते रत्नागिरी प्रवासात अनेक मंदिरे, बीच तुम्हाला पाहायला मिळतील. या प्रवासात एकूण ३८ पर्यटन स्थळे असून वेळेनुसार जितकी शक्य असतील तेवढी पाहून घ्यावीत.
या प्रवासात २ वेळा फेरी बोट घ्यावी लागेल. वशिष्टी नदी पार करायला तुम्हाला फेरी बोट घ्यावी लागणार. त्याचबरोबर जयगड नदी पार करायला सुद्धा फेरीबोट घ्यावी लागेल. दोन्ही ठिकाणचे वेळेचे नियोजन सकाळीच करून बाहेर पडावे.
हर्णै ते रत्नागिरी मार्गावरील ३८ पर्यटन स्थळे (७ दिवसांचा कोकण ट्रिप प्लॅन)
१) पलांडे बीच
२) मुरुड बीच
३) कर्डे बीच
४) श्री केशवराज मंदिर – दापोली, इथं नक्की जाऊन या. खूप सुंदर मंदिर आहे.
५) बोरघार धबधबा
६) लाडघर बीच
७) तामस्तीथ बीच
८) वेळणेश्वर मंदिर आणि बीच
९) सावरदेव मंदिर
१०) श्री भगवान परशुराम हिल
११) कोळथरे बीच
१२) उन्हवरे गरम पाण्याचे झरे
१३) भिवबंदर बीच
१४) दाभोळ किल्ला
१५) वाशिष्टी नदी खाडी
१६) गोपाळगड
१७) अंजनवेल लाइट हाऊस
१८) गुहागर बीच
१९) श्री व्याडेश्वर मंदिर गुहागर
२०) पालशेत बीच
२१) बुढाल बीच
२२) वेळणेश्वर बीच व मंदिर
२३) हेदवी बीच आणि गणपती मंदिर
२४) नवलाई धबधबा
२५) श्री व्याघ्राम्बरी देवी मंदिर
२६) विजयगड किल्ला
२७) तवसाळ बीच
२८) जयगड किल्ला
२९) नांदिवडे बीच
३०) जय विनायक मंदिर
३१) मालगुंड बीच
३२) गणपतीपुळे – इथून रत्नागिरी १४ km असून तुम्ही इथे मुक्काम करू शकता. इथले वातावरण खूप धार्मिक आणि प्रसन्न आहे.
३३) भंडारपुळे बीच
३४) अद्विका बीच
३५) आरेवारे बीच – अत्यंत देखणा समुद्रकिनारा. (गणपतीपुळेहून येताना डोंगरावरून एकदा थांबून पाहावा)
३६) श्री स्वयंभू सप्तेश्वर मंदिर
३७) मिऱ्या बीच
३८) थिबा पॅलेस
दिवस 6: रत्नागिरी ते मालवण (110 किमी)
रत्नागिरी ते मालवण हा टप्पाही बराच मोठा असून मुख्य ठिकाणे पाहत जाणे योग्य राहील, अन्यथा सर्व ठिकाणी जायचे असेल तर जास्तीचा वेळ काढावा लागेल. कारण बरीच ठिकाणे रस्त्यापासून आतमध्ये आहेत. तर आधीच स्थानिक लोकांशी बोलून आणि google च्या मदतीने अंदाज घेऊन प्रवास करावा.
रत्नागिरी ते मालवण मार्गावरील ४४ पर्यटन स्थळे (७ दिवसांचा कोकण ट्रिप प्लॅन)
१) भाट्ये बीच
२) टायटॅनिक पॉईंट
३) टेबल पॉईंट
४) कुर्ली बीच
५) वायंगीनी बीच
६) रत्नागिरी कातळ शिल्प
७) पावस देवस्थान
८) गणेशगुळे मंदिर आणि बीच
९) पूर्णगड किल्ला
१०) गावखडी विहीर
११) ताड धबधबा
१२) कशेळी बीच
१३) लक्ष्मीनारायण मंदिर
१४) कनकादित्य मंदिर
१५) महाकाली मंदिर, आडिवरे
१६) देवघळी बीच
१७) सावरेवाडी धरण
१८) आंबोळगड बीच आणि किल्ला
१९) यशवंतगड
२०) नाटेश्वर मंदिर
२१) जैतापूर कातळशिल्प
२२) विजयदुर्ग किल्ला
२३) रामेश्वर मंदिर व बीच
२४) गिर्ये बीच
२५) रिद्धी सिद्धी गणपती मंदिर, हर्षी
२६) श्री विमलेश्वर मंदिर
२७) देवगड बीच
२८) देवगड विंडमिल गार्डन
२९) मिठमुंबरी बीच
३०) कुणकेश्वर मंदिर व बीच
३१) तांबळडेग बीच
३२) मिठबाव बीच
३३) श्री रामेश्वर मंदिर, मिठबाव
३४) आचरा बीच
३५) रामेश्वर संस्थान, आचरा
३६) तोंडिवली बीच
३७) तळाशील बीच
३८) भरतगड किल्ला
३९) सर्जेकोट
४०) मालवण
४१) सिंधुदुर्ग किल्ला
४२) चिवला बीच
४३) कोलम बीच
४४) धुतपापेश्र्वर मंदिर
दिवस ७: मालवण ते शिरोडा (४५ किमी)
सिंधुदुर्ग तालुका हा समुद्र पर्यटन आणि निसर्ग सौन्दर्य या साठी ओळखला जातो. सिंधुदुर्ग इतके स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे तुम्हाला भारतात इतर कुठे मिळणे कठीण आहे.
मालवण ते शिरोडा रस्त्यावरील पर्यटन स्थळे (७ दिवसांचा कोकण ट्रिप प्लॅन)
१) तारकर्ली बीच
२) देवबाग बीच
३) निवती बीच
४) निवती किल्ला
५) वेताळगड किल्ला
६) खवणे बीच
७) कोंडुरा बीच
८) वेंगुर्ला बीच
९) वेतोबा मंदिर, अरावली
१०) शिरोडा बीच
११) रेडी गणपती मंदिर
१२) रेडी किल्ला
हा आपल्या ७ दिवसांच्या कोकण ट्रिप मधील शेवटचा ७ व दिवस आहे. तर मग हे कोकणातील निसर्ग सौन्दर्य डोळ्यात साठवून घ्या आणि या ट्रिप च्या आठवणी मनात भरून घ्या. घरी परतत असताना ७ दिवसात पहिलीली अनेक मंदिरे, घाट, रस्ते, समुद्रकिनारे हे सर्व आयुष्यभर एक आठवण आणि असंख्य गोष्टी तुम्हाला देऊन जातात.
टीप: या लेखामध्ये कोकणातील अनेक सुंदर पर्यटन स्थळे नमूद केली आहेत. जर आमच्या कढून काही राहिली असतील तर आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर ७ दिवसात हे सर्व पाहणे प्रत्येकाला शक्य नाही. त्याला रस्त्यांची कंडिशन, निसर्ग, गाडी चालवण्याची क्षमता इत्यादी अनेक गोष्टी कारणीभूत आहे. तरी सर्वानी आपापल्या कम्फर्टनुसार यामधील जितकी ठिकाणे पाहता येतील तेवढी जास्त पाहण्याचा पुरातन करावा, सर्व च पूर्ण केले तर उत्तमच.
धन्यवाद.