महाड शहरातील ज्ञानसंपदेचे भांडार – मु रा करवा वाचनालय
सन 1914 साली पहिले महायुद्ध सुरू झाले व त्यानंतर काही दिवसांनीच ब्रिटिश सरकारने लोकमान्य टिळक यांची मंडालेहून सुटका केली आणि अगदी अचानकपणे एका मध्यरात्री त्यांना गायकवाड वाड्यात आणून सोडले .लोकमान्य टिळक परत आल्यानंतर महाराष्ट्रात नवचैतन्य उतरले या परिस्थितीचा परिणाम माळशरावरही झाल्याशिवाय राहिला नाही.
कुलाबा जिल्ह्यातील बंद पडलेले गणपती उत्सव पुन्हा 1916 साली सुरू झाले. मेळ्यांना उत आला देशातील राजकीय परिस्थिती जाणीव जनतेला करून देण्यासाठी सभा भरू लागल्या.
महायुद्धाच्या बातम्या आणि जगात देशातील घडामोडी आपणास कळवाव्यात अशी जिज्ञासा जनतेस निर्माण झाली ही जिज्ञासा भागवण्यासाठी वाचनालय व ग्रंथालय यांची आवश्यकता वाटू लागली व या आवश्यकतेनुसार 1918 मध्ये महाड येथे श्रीकृष्ण वाचनालयास जन्म दिला.
पण श्रीकृष्ण वाचनालयाच्या स्थापनेपूर्वीची महाड गावातील वाचनालय व ग्रंथालय यांची माहिती या ठिकाणी देणे अप्रस्तुत होणार नाही सन.1874 साली महाडच्या नागरिकांनी स्वयं स्फूर्तीनेच एक वाचनालय सुरू केले होते .या वाचनालयाच्या स्थापनेला श्रीधर केशव चांदे यांचे प्रयत्न कारणीभूत झाले अशी माहिती मिळते.
1898 चे सुमारास त्या वेळच्या काही तरुणांनी एक वाचनालय चवदार तळ्यावर सुरू केले पुढे त्याचे स्थानांतर विरेश्वर नाक्यावरील एका घरात झाले पण सन. १९१० मध्ये रात्री एका सहीने या वाचनालयाचा बळी घेतला. त्या काळात वाचनालय तालमी वगैरे गोष्टींकडे सरकार फारच संशय दृष्टीने पाहत असे हे वाचनालय अर्थात बंद पडले नंतर काही गोविंद गोपाळ टिपणीस यांनी तांबट आळीत एक वाचनालय सुरू केले पण तेही अल्पजीवी ठरले 1918 मध्ये वाचनालय संस्थेचा हा इतिहास खाली दिला आहे त्या श्रीकृष्ण वाचनालयाची स्थापना झाली.
अशोक गोपाळशेठ कंपनीचे जे दुकान आहे ते घर पूर्वीच्या काळी कृष्णा महादू शेठ यांच्या मालकीचे होते त्या घराच्या पुढील पडवी त्या वेळचे 25 येथील तरुण मंडळी म्हणजे पितांबर भिकूदास गांधी , मेथा नारायण बुटाला ,श्री गोपाळ रामचंद्र गाडगीळ ,श्री वासुदेव श्रीधर चांदे वगैरे मंडळींनी वाचनालय सुरू केले.
वाचणाऱ्याची जागा शहरातील हमरस्त्यावर भर बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे सदर वाचनालयाचा फायदा घेण्यासाठी वाचकांची गर्दी फार होत असे.हेच श्रीकृष्ण वाचनालय म्हणजे आजचे आपले नामांतरित मूळचंद रामनारायण शेठ करवा वाचनालय होय.
सन १९१० मध्ये सम्राट सप्तम एडवर्ड यांचे निधन झाले त्यानंतर त्यांचे काळात काहीतरी स्मारक व्हावे अशी तून निघाली हा एडवर्ड्स स्मारक निधी जमवण्याचे काम शहरातील काही नेते आणि सरकारी अधिकारी यांनी केले हा स्मारक निधी 700 ते 800 रुपये पर्यंत जमला एवढ्याशा रकमेस सम्राटाचे स्मारक कसे होणार म्हणून हा जमलेला निधी शहरात महाड शहरातील प्रमुख व्यापारी पेढी भिकू तुळशीदास गांधी यांच्याकडे जमा ठेवण्यात आला.
बरीच वर्षे हा निधी पडून होता सदर निधी असा आपणाकडे पडून राहावा अशी सदर पेढी ची इच्छा नव्हती म्हणून निधी आपणाकडून उचलावा अशी इच्छा पेढी च्या मालकांनी प्रगट केली त्यानुसार 1921 साली अगर त्या सुमारास या निधीची रक्कम सदरपेढीवरून काढून घेऊन श्रीकृष्ण वाचनालयास एडवर्ड वाचनालय असे नाव देण्याच्या अटीवर ती रक्कम वाचनालयाचे स्वाधीन करण्यात आले सदर अटीप्रमाणे श्रीकृष्ण वाचनालयाचे एडवर्ड वाचनालय असे नामांतर झाले.
सन १९४६ चे पावसाळ्याच्या आरंभीची गोष्ट त्यावेळी श्रीमती राधाबाई मुळचंद सेट करवा यांनी आपले दिवंगत पती मूळचंदशेट करवा यांचे नावे व त्यांच्या नाव वाचनालयास द्यावे या अटीवर पंचवीसशे एक रुपये ची देणगी वाचनालयास देण्याचा आपला मनोदय त्या वेळचे सप्लाय ऑफिसर श्री हेगडे साहेब यांचे जवळ बोलून दाखवला.
श्री हेगडे यांनी ही गोष्ट त्या वेळचे महाडचे सबजज श्री गोविंदराव राज्याध्यक्ष यांचे कानावर घातली त्यांनी व उपाध्यक्ष श्री सुंदर भाई बुटाला यांनी वाचनालयाचे अध्यक्ष श्री दत्तोपंत वैद्य वकील श्रीराजाध्यक्ष व श्रीमती राधाबाई कारवा यांची बैठक करवा यांचेच घरी घडून आणली तेथे वाटाघाटी होऊन मूळचंद रामनारायणशेठ करवा यांचे नाव वाचनालयास देण्याच्या अटीवर पण रुपये 2500 श्रीमती राधाबाईंनी देऊ केलेली देणगी वाचनालयास घेण्याचे ठरले.
सदर देणगी व्यक्ती रुपये 875 पुस्तकांसाठी व रुपये 625 कपाटे वगैरे खर्च करायचे असेही ठरले होते त्याप्रमाणे पुढे श्री राज्याध्यक्ष सब् जज अध्यक्ष खाली झालेले दिनांक 18/8/1946 चे ज्यादा सर्वसाधारण सभेत जरूर ते ठराव होऊन वाचनालयाने सदर देणगी सर्व अटींवर स्वीकारली व एडवर्ड वाचनालयाचे मूळचंद रामनारायण शेठ करवा वाचनालय असे नाव सुरू झाले.
नामांतराप्रमाणेच वाचनालयाची स्थलांतरेही झाली आहेत प्रथम मूळ वाचनालयाची स्थापना पेठेतील पिंपळपाराजवळच्या कृष्णा शेठ यांच्या पडवीत झाली हे वर सांगितलेलेच आहे .आज वाचनालय कोटेश्वरी तळ्यावर स्वमालकीच्या जागेत स्थित आहे.
वाचनालयाच्या स्थापनेपासून वाचनालयाचे ग्रंथपाल असलेले श्री तुकाराम रामजी कदम हे सन 1930 साली वारले त्यानंतर वाचनालय बंद पडल्यासारखेच झाले संस्था चालू काम बंद अशी स्थिती होती त्यासाठी श्री शिवाजी महाराजांच्या चरित्र विषयक संशोधन पर असे तीन ग्रंथ भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पुरस्काराने प्रसिद्ध झाले हे दहा अकरा रुपये किमतीचे तीन ग्रंथ एकेक रुपया वर्गणी जमून घ्यावे लागले या शौचनीय आर्थिक परिस्थितीत त्यावेळचे चिटणीस काही अनंत मोरेश्वर पिंगळे यांनी रुपये 80 आपणाजवळचे खर्च करून वाचनालय चालू ठेवावे लागले पुढे आर्थिक स्थिती सुधारल्यावर हे 80 रुपये त्यांना परत देण्यात आले या दोन उदाहरणावरूनच वाचनालयाची त्यावेळची शोचनीय आर्थिक परिस्थिती ध्यानी येईल.
सन १९३४ मध्ये वासुदेवराव चांदे, श्री शांताराम जाधव वगैरेंच्या मनात वाचनालय पूर्ववत सुरू करण्याचे घडू लागले ते त्यांनी पितांबर गोकुळदास मेहता, अनंत मोरेश्वर पिंगळे, बाळकृष्ण बल्लाळ जोशी, श्री सुंदर भाई बुटाला श्री डॉक्टर बाबुराव मेहता, वसंतराव पाटील वगैरे मंडळींशी व्यक्त केले आणि सन १९३४ पासून वाचनालयाचे काम नव्याने चालू झाले ते महादेव बजाजी विरकर, अध्यक्ष श्री डॉक्टर वसंतराव भाटे, बाबुराव मेहता हे दोघे तसेच चिटणीस पितांबर गोकुळदास मेहता, बुटाला पुरुषोत्तम, प्रभाकर जोशी आणखीन दोन-तीन गृहस्थ सामान्य सभासद असे तात्पुरते कार्यकारी मंडळ सिद्ध झाली.
या कार्यकारी मंडळांनी श्री सुंदर भाई बुटाला यांच्याकडे वाचनालयाची घटना तयार करण्याचे काम दिले त्याप्रमाणे त्यांनी तयार केलेली घटना योग्य त्या फेरफारासह 38 च्या कार्यकारी मंडळाच्या सभेत पुढे चालू 19/ 6 /38 चा जादा सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आली या घटनेचा अंमल एक एक 39 पासून होणार होता त्याप्रमाणे तारीख 1/6/ 39 वार्षिक सर्वसाधारण सभेचे काम या घटनेतील नियमानुसार झाले.
सन 1946 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर श्री बाळासाहेब खेर मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांना राज्यात वाचणाऱ्यांची संघटना निर्माण करायची होती त्यातील एक भाग म्हणजे तालुक्याच्या गावी असलेल्या वाचनालयांना तालुका वाचनालय दर्जा देणे किंवा त्यांचे कडे तालुका वाचनाचे काम देणे त्यानुसार त्यावेळी मुंबई राज्याच्या वाचनालयाचे कुरेतर श्री कर्वे हे महाडास मुद्दाम आले होते सन 1948 नोव्हेंबर मध्ये महाड येथे आपल्या वाचनालयातर्फेच कुलाबा जिल्ह्याचे साहित्य संमेलन व वाचनालय संमेलन पनवेलचे ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य निळकंठ शंकरराव यांच्या अध्यक्षतेखाली भरले.
पुढे वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाच्या ते 17 नोव्हेंबर 1948 रोजी ठराव होऊन त्या ठरावानुसार आपल्या वाचनालयाने तालुका वाचनालयाचे काम काज केले व लगेच त्या वेळच्या सरकारी नियमानुसार वाचनालयात दरसाल चारशे रुपये सरकारी अनुदान मिळू लागले वाचनालयाच्या वाढीच्या दृष्टीने ही एक मोठी महत्त्वाची गोष्ट घडून आलीआपण वाचनालयाचा इतिहास जाणून घेतला.
आज वर्तमान स्थिती बघूया:
या वाचनालयाचे वैशिष्ट्य म्हणजे या वाचनालयामध्ये दुर्मिळ ग्रंथ विभाग आहे यामध्ये सन १८७७ पासून ग्रंथसंपदा उपलब्ध आहे तसेच बाल विभाग, महिला विभाग पर्यावरण विभाग आणि काळाबरोबरच जात असताना विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा एमपीएससी, यूपीएससी यासाठी आवश्यक असणारी पुस्तके उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच वाचनालय पूर्णपणे संगणकीय करण करण्यात आलेला आहे बारकोड सिस्टम वाचकांसाठी डिजिटल आयडेंटी कार्ड उपलब्ध करून देताना आनंद होत आहे वाचनालय मध्ये आज 40 हजार पुस्तक ग्रंथ संपदा आहे.
रायगड जिल्ह्यातील एक अग्रगण्य वाचनालय म्हणून ओळखले जाते अशा या वाचनालयाचा 1/1/2023 रोजी 105 वा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला, सर्व वाचकांना विनंती आहे की सर्वांनी वाचन चळवळ सुरू ठेवण्यासाठी वाचनालयात असलेल्या विविध विषयांवरील पुस्तके, अंक व निरनिराळे ग्रंथ यांचे वाचन करून ह्या चळवळीत सक्रिय सहभागी व्हावे.