Goa Itinerary for 3 day trip – पहिल्यांदा मी २०२१ साली गोव्याला फॅमिली सोबत गेलो होतो, आणि त्यानंतर २०२३ साली पुन्हा एकदा जाण्याचा योग आला. गोव्याला जाण्याची कारणे व्यक्तिसापेक्ष वेगवेगळी असू शकतात. कारण प्रत्येक वयोगटातल्या माणसांना आपलासा करणारा गोवा हा अद्भुतच म्हणावा लागेल.
मावळतीकडे झुकलेला सूर्य, आकाशाचा बदलणारा आणि गडद होत जाणारा रंग, सोनेरी वाळूचा बदलणारा रंग, समुद्राच्या पाण्याचा बदलणारा आवाज आणि लाटांची उंची, वातावरणातील वाढत जाणारा गारवा हे सर्व तिथे बसून अनुभवणे म्हणजेच स्वतःला शोधणे होय.
गोवा भारतातील एक सुंदर राज्य आहे. गोव्यातील स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारे, सांस्कृतिक ठिकाणे आणि स्वादिष्ट गोवन खाद्यपदार्थ यांमुळे जगभरातील पर्यटकांना गोवा नेहमीच आपल्याकडे खेचत असते.
गोवा मध्ये अनेक समुद्रकिनारे आहेत, जसे की अंजुना, वागाटर, कॅंडोलिम आणि पालोलेम. या समुद्रकिनार्यांवर आपण पाण्यात खेळू शकता आणि वॉटर स्पोर्टझ पण खेळू शकता. आणि त्याच समुद्रकिनार्यावरील रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट सीफूडचा आनंद सुद्धा घेऊ शकता. गोवामध्ये अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणे देखील आहेत, जसे की चापोरा किल्ला, आंबोली किल्ला आणि फोर्ट कोरोज. जर तुम्हाला इतिहास आणि संस्कृतीबद्दल आवड असेल तर या ठिकाणांवर तुम्ही गोव्याचा इतिहास आणि संस्कृती जाणून घेऊ शकता.
गोवा त्याच्या पब आणि पार्टी culture साठीही प्रसिद्ध आहे. गोव्यामध्ये अनेक लोकप्रिय पब आणि क्लब आहेत, जे रात्रीच्या वेळी संगीत, नृत्य आणि धमाल करण्यासाठी ओळखले जातात. त्याचबरोबर गोवा मध्ये अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणे आहेत, जसे की मंदिरे आणि चर्च.
गोवामध्ये अनेक मंदिरे आहेत, जसे की श्री मंगेशी मंदिर, श्री रामनाथ मंदिर आणि श्री शांतादुर्गा मंदिर इत्यादी. सर्व मंदिरे खूप सुंदर तर आहेतच पण त्यांचा स्थापत्यशैली, कलाकुसर, इतिहास आणि संस्कृती सुद्धा प्रभावशाली आहे. गोवा मध्ये अनेक चर्च देखील आहेत, जसे की से कॅथेड्रल, बेसिलिका ऑफ बॉम जीसस आणि चर्च ऑफ सेंट फ्रांसिस असीसी.
तर अश्या या अतिशय सुंदर टुरिस्ट प्लेस GOA ला भेट दिल्यानंतर नक्की काय काय पाहायचे ते पुढे पाहू.
गोव्याचे मुख्य २ भाग आहेत. एक उत्तर गोवा आणि दुसरा म्हणजे दक्षिण गोवा. दोन्ही आपल्याला वेगवेगळे अनुभव देतात. उत्तर गोवा हे मानवनिर्मित आनंदी वातावरण, गजबजलेले समुद्रकिनारे आणि उत्साही नाइटलाइफ यासाठी प्रसिद्ध आहे, तर याउलट दक्षिण गोवा हा मंदिरे, नैसर्गिक वातावरण, शांत किनारे, आणि लक्झरी रिसॉर्ट्ससाठी ओळखले जाते.
गोव्यात आवर्जून भेट द्यावी अशी ५ ठिकाणे:
1. गोव्यातील समुद्र किनारे:
उत्तर गोवा – अंजुना, बागा, कळंगुट, वागतोर, आरंबोल
दक्षिण गोवा – कोल्वा, माजोर्डा, पालोलेम, कॅव्हेलोसिम
2. गोव्यातील किल्ले आणि चर्च:
बेसिलिका ऑफ बॉम जीसस: 1605 मध्ये बांधलेल्या, यात सेंट फ्रान्सिस झेवियरची कबर आणि अवशेष आहेत
चर्च ऑफ अवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन: गोव्यात चित्रित झालेल्या अनेक चित्रपटांमध्ये हे दाखवण्यात आले आहे.
चापोरा किल्ला: हा किल्ला दिल चाहता है या पिक्चर मध्ये दाखवलेला आहे.
3. गोव्यातील कॅसिनो:
गोव्यात तुम्हाला अनेक कॅसिनो मिळतील. तुमच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार तुम्ही गुगळे वरून त्या बद्दलची ताजी माहिती घेऊ शकता.
4. गोव्यातील स्कूबा डायव्हिंग:
बोगमलो बीचच्या किनाऱ्यापासून 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर सेंट जॉर्जेस बेट आहे, इथून गोताखोर हवामान आणि समुद्राच्या परिस्थितीनुसार 2-15 मीटर खोलीपर्यंत डुबकी मारतात. हे नवशिक्यांसाठी सुरक्षित असून एक चांगले ठिकाण आहे.
5. दूधसागर फॉल्स ट्रेक:
हा ट्रेक गोव्यापासून थोड्या अंतरावर असून त्यासाठी संपूर्ण दिवस आवश्यक आहे, त्यामुळे जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर तिथे जाणे योग्य आहे.
५ गोष्टी ज्या गोव्याला जाऊन केल्याचं पाहिजेत:
१) वॉटर स्पोर्ट्स:
गोव्यात सुट्टी घालवणे आणि वॉटर स्पोर्ट्स न करणे त्या पेक्षा गोव्याला न गेलेलं बरं असं मला वाटतंय. सर्फिंग, नी बोर्डिंग, व्हाईट वॉटर राफ्टिंग आणि कयाकिंगपासून ते स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, पॅरासेलिंग आणि जेट स्कीइंगपर्यंत, अनेक गोष्टी आहेत. ज्या तुम्ही तुमच्या 3 दिवसांच्या गोवा टूर प्लॅनमध्ये केल्या पाहिजेत. गोव्यातील कलंगुट, बागा, कोलवा, कँडोलिम आणि वॅगेटर सारख्या जवळपास सर्व प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांवर तुम्ही हे वॉटर स्पोर्ट्स करू शकता.
२) मांडोवी नदी – क्रूझ चा प्रवास:
विविध टूर ऑपरेटर मांडोवी नदीवर संध्याकाळच्या पर्यटनांचे आयोजन करतात ज्याचा तुम्ही गोव्यातील 3 दिवसांच्या सुट्टीत आनंद नक्कीच घ्यावा. हे प्रामुख्याने सूर्यास्त नदी / समुद्रपर्यटन आहेत, जेथे लोक सुंदर सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकतात. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात, पारंपारिक गोवानी नृत्य आणि संगीताचे प्रदर्शन होते, त्यानंतर रात्रीचे जेवण. काही खास डिनर क्रूझ देखील आहेत, जे रात्री 8:30 ते रात्री 10:30 पर्यंत चालतात आणि अतिथींना भव्य गोवन डिनरवर ताव मारता येतो.
३) गोव्यातील डॉल्फिन बघणे:
गोव्याची किनारपट्टी सुंदर डॉल्फिन आणि इतर सागरी प्राण्यांचे हक्काचे घर आहे. तुम्ही डॉल्फिन बोट फेरफटका एकदातरी नक्कीच मारा.
४) गोव्यातील मंदिर आणि त्यांचा वारसा:
गोव्यामध्ये अनेक जुनी मंदिरे आहेत, ज्यांना आपण पाहता क्षणी प्रेमात पडतो. अत्यंत सुबक आणि सुंदर, निसर्गाच्या कुशीतील हि मंदिरे पाहून तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल.
५) गोव्याची Night Life:
गोव्याची night life खूपच धमाल असते, मोठे वाजणारे music, पार्टी, क्लब वगैरे. तर गोव्याला गेलाच आहेत तर एकदा हे पण अनुभवायला काही हरकत नाही.
साऊथ गोव्याचा ३ दिवसांचा प्लॅन – South Goa trip plan for 3 days:
दिवस 1:
१) अगोंडा बीच
पालोलेमच्या उत्तरेस सुमारे 20 मिनिटांच्या अंतरावर अगोंडा आणि कोला बीच हे गोव्यातील सर्वात नयनरम्य समुद्रकिनारे असून, शांत, स्वच्छ पाणी आणि सोनेरी वाळू इथे आहे.
२) गालगीबागा (टर्टल) बीच:
एक शांत समुद्रकिनारा, पर्यटक आणि कचऱ्यापासून मुक्त आहे.
३) बटरफ्लाय बीच:
बटरफ्लाय बीच हा गोव्यातील सर्वात मनमोहक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. इथे पोहोचण्याचा मार्ग म्हणजे पालोलेम येथून बोट घेऊन किंवा जंगलातील आव्हानात्मक प्रवास करणे. भरभराटीचे सागरी जीवन आणि सूर्यास्ताच्या सुंदर दृश्यांसह फुलपाखरे मुबलक प्रमाणात पाहण्याची इथे करा.
दिवस २:
दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर बाहेर पडून सौथ गोव्यातील मंदिरांना भेट देऊ शकता. हि सर्व मंदिरे निसर्गाच्या सानिध्यात वसलेली असून इथे मनाला प्रसन्नता मिळते. त्याच सोबत अनेक सह्याद्री मधील धबधबे, जंगले, पाहू शकता.
दिवस ३:
ट्रिप च्या तिसऱ्या दिवशी तुम्ही विलक्षण सुंदर आणि भव्य असलेली चर्च पाहू शकता, त्याच सोबत इथे गॅरी पासून दूर असलेले समुद्र किनारे आहेत. तिथे अस्सल गोवन संस्कृती जपानी गवे आहेत, त्या गावांमध्ये जाऊन तिथल्या इकोसिस्टिम चा एक भाग बनून अनुभव घेऊ शकता.
नॉर्थ गोव्याचा ३ दिवसांचा प्लॅन दिवस १:
दिवस १:
पहिल्या दिवशी तुम्ही गोव्यात पोचल्यानंतर हॉटेल ला चेक इन करून थोडा पेटपूजा झाल्यावर जवळच असणारे बागा बीच, अजून बीच इत्यादी पाहायला आणि अनुभवायला बाहेर पडू शकता. जाताना वाटेत तुम्हाला अनेक टॅटू, सुका मेवा, ड्रायफ्रूट्स, यांची होलसेल विक्रीची दुकाने लागतील. बीच वर अनेक वॉटर स्पोर्ट्स आहेत, तर त्याचा हि आनंद घेऊ शकता. आणि रात्री night life पाहू शकता. निवांत समुद्रकिनारी गप्पा मारत बसू शकता.
दिवस २:
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ओल्ड गोव्याचा आस्वाद घेऊन चापोरा किल्ला पाहायला जाऊन शकता. त्यानंतर तिथून उतरल्यानंतर ग्रँड आयलंड पाहायला जाऊ शकता.
दिवस ३:
तिसऱ्या दिवशी आगोडा किल्ला पाहायला जाऊन त्यानंतर मोरजीम बीच पाहू शकता. त्यानंतर मस्त पैकी शॉपिंग स्ट्रीट वर मनसोक्त खरेदी करू शकता.
अनुभवाचे बोल:
१) गोव्यात पावसाळ्यात जाणार असाल तर हवामानाचा अंदाज घेऊन जावे. मुसळधार पाऊसामुळे बऱ्यापैकी सर्व बंद असते. विमानेही रद्द होतात.
२) गोवा समुद्रकिनारी असल्याने पाउसाळ्याव्यतिरिक्त इतर दिवशी दिवसभर गरम होत असते. तर किल्ले बघणार असाल तर सकाळी लवकर उठून जाणे योग्य.
३) ज्यांना पार्टी, पब, यामध्ये इंटरेस्ट नाही त्यांनी सरळ साऊथ गोव्यातच मुक्काम करावा.
४) लहान मुले आणि वयस्कर लोक असतील तर दिवस त्यांना घेऊन फिरणे त्यांच्या साठी थोडे त्रासाचे आहे.
५) गोव्यात रेंट वर सहज गाड्या मिळतात तर ड्रायविंग लायसन्स न चुकता घेऊन जाणे.
६) जे लोक स्वतःची गाडी घेऊन जातात त्यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट, मुक्कामाचे ठिकाण निवडताना असे निवड जेणेकरून गाडीचा वापर कमी करावा लागेल. कारण नॉर्थ गोव्यात बऱ्याच ठिकाणी अरुंद रस्ते आहेत.