दक्षिण भारतातील रोड ट्रिपचा पहिला दिवस:
जुलैच्या पहिल्या वीक मध्ये मी लदाख ला जायचा प्लांनिंग करत होतो. पण आमच्या ऑफिस मध्ये बरेच जण आहेत त्यांना हि माझ्या सोबत ट्रिप ला यायचं होत, पण माझे प्लांनिंग बाईक ने पुणे ते लडाख असे होते. त्यातही जम्मू सर्किट पूर्ण करणे. आणि हे प्लँनिंग बाकीच्यांना पेलवणारे न्हवते म्हणून त्यांनी मला दुसरा प्लॅन करायला इमोशनल ब्लॅकमेल करणे सुरु केले. आणि त्यातच उत्तर भारतात आलेला महापूर आणि वाहून गेलेले रस्ते हे पाहून मीही थोडा वेगळा विचार करायला सुरुवात केली. आणि प्लॅन बी ठरला. रामेश्वरम… ३ जण तयार हि झाले…
मी, अमित सर, दीपक सर आणि सचिन सर आम्ही चौघांनी दक्षिण भारतात फिरायला जायच प्लॅन केला, आणि पुढच्याच वीक मध्ये निघायचा नियोजन झाले. बेसिकली आम्ही मुख्यतः मदुराई आणि रामेश्वरम येथे जायचा प्लॅन केला होता, पण सचिन सर नि नुकतीच नवीन अल्ट्रोज कार घेतली होती त्यामुळे आम्ही ठरवले कि आपण रोड ट्रिप च करू.
आता रोड ने एवढ्या लांब जायचे तर येता जाता अजून हि काहीतरी नवीन पाहता येत असा मला वाटलं आणि मी एक प्लॅन बनवला तो असा.
पुणे-गोकर्ण-मुरुडेश्वर-उडुपी-मंगलोर-म्हैसूर-उटी-कोडाईलकनाल-कोची-अल्लेपी-तिरुअनंतपुरम-कन्याकुमारी-रामेश्वरम-धनुष्कोडी-मदुराई-बेंगलोर-पुणे
हा प्लॅन ९ दिवसात बसवला होता, थोडी झोप कॉम्प्रोमाइझ करावी लागणार होती आणि कंफर्ट काहीवेळा बाजूला ठेवावा लागणार होता. पण मजा मात्र भरपूर येणार होती. आणि देवाची कृपा कि बाकी तिघांनी हि हा प्लॅन कोणतीही शंका न घेता OK केला. कारण ट्रिप प्लांनिंग मध्ये मला बऱ्यापैकी चांगला अनुभव आहे, त्यामुळे कोणी जास्त टेन्शन घेत नाही.
जुलै २१ हा दिवस निघायचा फिक्स केला. त्या रात्री ऑफिस चे काम आवरून जेऊन १० वाजता पुणे सोडायचं आहे असा ठरवलं होते पण म्हणतात ना, नेहमीच निघताना अचानक काही काम येतात. आणि नेमका आज पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. पाऊसाची तीव्रता पाहून घरचेही थोडे धास्तावले होते. पण आम्ही जायचंच हे निश्चित केला होता त्यामुळे कोणी जास्त काही बोलले नाही.
“जो होता है अच्छे के लिये होता है” म्हणत आम्ही एकदाचे रात्री ११.३० ला पुणे सोडले, निघायच्या आधीच डिझेल हवा वगैरे सगळं भरून घेतला आणि NH ४ ला लागलो. मी पुणे – कोल्हापूर ट्रॅव्हल नेहमी करतो त्यामुळे मला माहित होत कि, सातारा नंतर जेवायला होटल मिळणार नाहीत. म्हणून खंबाटकी घाटाच्या अलीकडे आम्ही जेवायला थांबलो.
जेवण करून आम्ही पुढे मार्गस्त झालो. मध्यरात्री आम्ही कोल्हापूर पास केले आणि थांबलो, पाऊस इतका प्रचंड पडत होता कि गाडी ६० ते ७० च्या स्पीड नेच जात होती. त्यात दिवसभराचे काम करून सर्वानाच कंटाळा आला होता, त्यामुळे आंबोली मार्गे गोव्याला जाऊन झोपण्याचा निर्णय घेतला.
माझे ड्रायविंग बऱ्यापैकी सेन्सिबल असल्यामुळे (असे बाकीचे लोक म्हणतात.. मी नाही) आणि बऱ्याच रोड टीप चा अनुभव असल्यामुळे सर्वानीच कोल्हापूर ते गोवा हा घाटांचा आणि जंगलांचा टप्पा मला ड्राईव्ह करायला सांगितलं.
आम्ही आंबोली मार्गे सावंतवाडीत उतरण्याचा निर्णय घेतला. आणि निपाणीमार्गे आजरा – आंबोली – सावंतवाडी – गोवा असा प्लॅन झाला.
प्रचंड कोसळत असलेला पाऊस, सह्याद्रीतील घाट रस्त्यांवरून जाताना अजूनच भयानक जाणवत होता. त्यात रस्त्यांवरील खड्यांची सुद्धा काळजी घेऊन गाडी चालवावी लागत होती. सतत गियर बदलावे लागत होते. धुके आणि पाऊस यामुळे गाडीचा लाईट रस्त्यावर दिसतच न्हवता. त्यात डोळ्यात तेल घालून गाडी चालवावी लागत होती, जरा रोड चुकला आणि एक चाक डायरेक्ट खोल खड्यात किंवा बाजूच्या पाण्याच्या चरीत, अशी परिस्थिती होती. त्यात रात्रींचे दरोडेखोर आणि जंगली प्राणी ह्याची जाणीव मधून मधून मनाला अस्वस्थ करत होती.
मस्त शांत गाणी लावून मी या ड्रायविंग चा आनंद घेत चाललो होतो. गप्पा मारून मारून बाकी ३ जण थोडे झोपले होते, साधारण १ ते दीड तास नंतर त्यांना जाग यायला लागली, आणि एव्हाना आम्ही आंबोलीच्या घाटात पोचलो होतो.
पाऊस अजूनही सुरूच होता. धबधब्यांचे पाणी रस्त्यांवरून वाहत होते. निसर्गाचे रोद्ररूप पाहून अंगाचा थरकाप उडाला होता. मी आंबोली घाट आयुष्यात कधीही इतका भयानक बघितला न्हवता. घाटात थांबायचा विचारच करू नका असा मी सर्वाना सांगितले, कारण कधी दरड पडेल आणि रास्ता बंद होईल सांगता येत नाही, म्हणून हळू हळू मी जसा रास्ता दिसेल तशी गाडी चालवत होतो. एव्हाना गाणी बंद झाली होती आणि फक्त फक्त गाडीवर कोसळणाऱ्या पाऊसाचा आवाज येत होता.
पुढे एका ठिकाणी रस्त्यावर चिखल वाहून आला होता, हळू हळू दरीकडच्या बाजूने एक चाक खाली घालून गाडी पुढे काढली. हा माझा काही पहिलाच अनुभव न्हवता पण सर्वात भीतीदायक अनुभव होत चालला होता. देवाचे नाव घेऊन आम्ही कसे बसे सावंतवाडीत पोचलो. तिथे थोडा चहा घेऊन थेट गोव्याला रूम वर जाऊन झोपलो.
पुणे ते गोवा व्हाया आंबोली तेही प्रचंड पाऊसात… हा अनुभव खरंच विलक्षणीय होता. आंबोलीतील पावसाच्या रोद्ररूपाच्या आणि दरड कोसळीच्या बातम्या tv वर बघून आमच्या घरच्यांचे फोन यायला लागले. पण आम्ही सुखरूप पोचलो होतो त्यामुळे सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला.
क्रमश: