कल्पनाशक्ती ते कोट्यवधींचा व्यवसाय | SS राजामौलींच्या सिनेमांचा प्रवास

Hosted Open
4 Min Read
SS rajamouli information

SS राजामौली यांचे अजरामर चित्रपट – एक कल्पकतेचा महापर्व

भारतीय सिनेसृष्टीत अनेक दिग्दर्शक आले आणि गेले, पण काही मोजक्याच नावांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचा ठसा उमटवला. त्यात सर्वांत वरच्या क्रमांकावर नाव घेतलं जातं ते म्हणजे, एस. एस. राजामौली. कारण हा माणूस केवळ सिनेमा बनवत नाही, तो एक अनुभव घडवतो. असं अनुभव जे प्रेक्षकांना त्यांच्या जागेवरून उचलून एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं!

राजामौली – नावातच वजन:
आजकाल नवा सिनेमा येतो तेव्हा त्यातले स्टार कोण आहेत, स्टोरी काय आहे, ट्रेलर कसा आहे, यावरून आपण ठरवतो की सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा की OTT वर. पण जेव्हा सिनेमावर SS Rajamouli यांचं नाव असतं, तेव्हा या सगळ्या चर्चा फोल वाटतात. कारण राजामौली हे नावच प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्यासाठी पुरेसं असतं.

10 ऑक्टोबर 1973 रोजी जन्मलेल्या राजामौली यांनी केवळ तंत्रज्ञानाचा नव्हे तर कल्पनाशक्तीचा वापर करून भारतीय सिनेमा कुठल्या उंचीवर जाऊ शकतो याचं उदाहरण जगाला दिलं.

कल्पनाशक्ती जिथे संपते, तिथून यांची सुरूवात होते:
जेव्हा सामान्य माणूस “हे शक्यच नाही!” असं म्हणतो, तिथून राजामौलींची स्टोरी सुरू होते. त्यांनी 500, 1000, आणि अगदी 1500 कोटींचा बॉक्स ऑफिस बिझनेस करणारे माइलस्टोन भारतात निर्माण केले. त्यांच्या “बाहुबली” सिरीजने जेव्हा ग्लोबल मार्केटमध्ये खळबळ माजवली, तेव्हा संपूर्ण जगाने भारतीय सिनेमाची ताकद ओळखली.

Larger Than Life – पण तरीही वास्तवदर्शी:
“लार्जर दॅन लाईफ” असं म्हणणं सोपं आहे, पण ती अनुभूती प्रेक्षकांना खरंच द्यायची म्हणजे ते काही सोपं काम नाही. पण राजामौलीचं खास कौशल्य असं आहे की त्यांच्या सिनेमांमधील भव्यता ही कधीही खोटी वाटत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर, RRR हा सिनेमा पाहताना प्रेक्षक अक्षरशः आपल्या जागेवरून दुसऱ्या विश्वात जातात. हा अनुभव इतका ताकदवान असतो की तो फक्त थिएटरमध्येच साजरा होतो.

एस. एस. राजामौली यांच्या दिग्दर्शित चित्रपटांची यादी खाली आहे:
प्रत्येक सिनेमा त्यांच्या कारकिर्दीतील एक माईलस्टोन आहे:

Student No.1 (2001) – IMDb 7
राजामौलींच्या करिअरची धमाकेदार सुरुवात – विद्यार्थी जीवनावर आधारित युथफुल ड्रामा.

Simhadri (2003) – IMDb 7.6
निव्वळ अॅक्शन आणि इमोशनचा जबरदस्त मेळ.

Sye (2004) – IMDb 7.5
रग्बी स्पोर्टच्या पार्श्वभूमीवर आधारित एक हटके विषय.

Chatrapathi (2005) – IMDb 7.7
प्रवास, संघर्ष आणि स्वाभिमानाची कथा.

Vikramarkudu (2006) – IMDb 7.7
पोलीस आणि गुन्हेगारी यांच्यातील खेळ – नंतर बॉलिवूडमध्ये “Rowdy Rathore” म्हणूनही प्रसिद्ध.

Yamadonga (2007) – IMDb 7.4
कॉमेडी आणि पौराणिक तत्वांचा भन्नाट मिक्स.

Magadheera (2009) – IMDb 7.4
पुनर्जन्माची भव्य गाथा – या मुव्हीमुळे भारतीय सिनेमा एका नव्या उंचीवर गेला.

Maryada Ramanna (2010) – IMDb 7.5
एक हलकाफुलका पण अत्यंत दिलखुलास सिनेमा.

Eega (2012) – IMDb 7.8
जगात कोणालाही सुचणार नाही अशी कल्पना – एका माशीचा सूड

Baahubali: The Beginning (2015) – IMDb 8.1
“कटप्पाने बाहुबलीला का मारलं?” – एक वाक्य देशभरात चर्चेचा विषय.

Baahubali 2: The Conclusion (2017) – IMDb 8.3
इतिहास घडवणारा सिनेमा – भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट.

RRR (2022) – IMDb 9.2
अभूतपूर्व अॅक्शन, संगीत, देशप्रेम, आणि सिनेमा कसा असावा याचा परफेक्ट आदर्श.

शेवटी काय?
SS राजामौली हे केवळ एक दिग्दर्शक नाहीत, ते एक कलात्मक व्यक्ती सुद्धा आहेत. त्यांचे सिनेमे म्हणजे भारतीय सिनेमा जिथे पोहचू शकतो याचं साक्षात रूप.

जर तुम्ही त्यांच्या सर्व चित्रपटांचे चाहते असाल, तर ही यादी तुम्हाला पुन्हा एकदा त्या आठवणींमध्ये घेऊन जाईल. आणि जर अजून काही चित्रपट राहिले असतील, तर ते लवकरात लवकर पाहणं गरजेचं आहे.

 

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *