काय काळ होता खरच मजेशीर वातावरण असायचं

Hosted Open
3 Min Read
village memories

काय काळ होता खरच मजेशीर वातावरण असायचं…

राॅकेल भरायला नरसाळे, पत्र्याची नळी असलेला पंप, पुढे काही वर्षांनी प्लॅस्टिकचा फुग्याचा व काॅक असलेला पंप आल्यावरचा आनंद विसरणे शक्य आहे का?

जमीनीवर थोडेफार सांडलेल्या राॅकेलचा वास अजूनही चांगला आठवतो आहे.
स्वयंपाक करताना अन्नाला राॅकेलचा वास येऊ नये म्हणून घेतलेली काळजी, घरातील गृहिणीचे कुटुंबावर किती प्रेम होते हे आता जाणवते.

स्टोव्ह पेटवण्यासाठी काकडा व तो बुडवणयासाठी दंतमंजनच्या छोट्या रिकाम्या झालेल्या काचेच्या बाटलीत राॅकेल भरून ठेवायचे.

काडेपेटी व ती ठेवण्यासाठी हिंगाची रिकामी झालेली पत्र्याची डबी असा सगळा थाट असायचा.

पीन करणे एक कौशल्याचे काम होते. हात अगदी सरळ धरून, पीन वाकडी होणार नाही याची काळजी घ्यावी लागत असे जर पीन निपलमधे तुटली तर सगळाच खोळंबा व्हायचा.

त्याकरता काही हत्यारेही घरी ठेवलेली असायची. स्टोव्हची टाकी गळत असेल तर तिथे लावण्यासाठी टाटाचा 501नं.चा साबण.

स्टोव्ह बिघडल्यावर घरातली होणारी चिडचिड तर विचारूच नका. आणि दुरूस्त करून आणल्यावर गृहिणीची प्रसन्न मुद्रा, ओसंडून वाहणारा आनंद पाहिला की घरातली माणसे अगदी खूष व्हायची.

स्वयंपाक झाल्यावर गृहिणीने सोडलेला सुस्कार जितका मनाला शांत करतो ना अगदी तसाच शांतपणा स्टोव्हची चावी सोडल्यावर येणारा आवाज हि सर्वांच्या मनाला समाधान देऊन जायचा.

लिहिण्यासारखे भरपूर आहे. …

दिवस बदलत गेले तसेच नवनवीन तंत्रज्ञानाने युक्त बाजारामध्ये शेगड्या आल्या गॅस वरचे स्टोअर आले पण अर्धा अर्धा तास मागे लागून रॉकेल भरून पिन करून स्टोव्ह अगदी व्यवस्थित सुरू करून त्यावर जेवण बनवणे ही मजा फक्त आमच्या पिढीला माहित आहे.

वैयक्तिक रित्या मला असे वाटते की शहरांमध्ये राहणाऱ्या सर्वांनी आपली मुलं दोन ते पाच वर्षाची असताना म्हणजेच त्यांची मूळ शाळेची सुरुवात व्हायच्या आधी त्यांना आपल्या ग्रामीण भागाची पूर्णपणे ओळख करून देणे गरजेचे आहे यामुळे त्यांना आपल्या मूळ मातीशी असलेले नाते हे अजूनही घट्ट करण्यास मदत होईल आणि त्यातून त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास द्विगुणित होईल त्यामुळे ते जेव्हा पाच सहा वर्षानंतर न शहरांमध्ये वाढायला लागते त्यामुळे त्यांच्यामध्ये इतरांपेक्षा एक वेगळाच दृष्टिकोन विकसित झालेला पाहायला मिळेल.

आपण सर्वांनी शहरातून गावाकडे मुलांना घेऊन गेल्यानंतर जे आपण लहानपणी करायचो त्यात सर्व गोष्टी आपल्या मुलांनाही करायला लावल्या पाहिजेत.

उदाहरणार्थ शेती करणे, शेतामधले दगड-गोटे एकत्र करून शेताच्या बाहेर काढणे, माती सरळ करणे, लावण रोपण करणे, झाडांची काळजी घेणे, झाडांना पाणी देणे, खते घालने, मशागत करणे, त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आंब्यांचा आस्वाद घेणे.

स्वतःच्या हाताने झाडावर चढून आंबे काढणे, दगड मारून नारळ पाडणे, विहिरी वरती कठड्यावरून उडी मारण्याचा मध्ये जो कॉन्फिडन्स असतो तो शहरातल्या स्विमिंग पूल मध्ये मिळत नाही.

त्यामुळे त्यांना नदी, विहीरअशा ठिकाणांचा वेगवेगळा अनुभव देणे हे फारच गरजेचे आहे. शेतामध्ये गावाकडं इकडं तिकडं उड्या मारता मारता त्या मुलांचा शारीरिक क्षमतेचा विकास चांगल्या पद्धतीने होतो. त्यामुळे सर्वांनी काळाची गरज आणि मुलांचा बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास म्हणून या गोष्टीकडे पाहणे गरजेचे आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *