काही म्हणा पण टोयोटा च्या गाड्यांचा नाद करायचा नाय!
टोयोटा च्या गाड्या इतक्या मजबूत आणि टिकाऊ कशा काय?
मित्रांनो, नुकतेच तुम्ही एक बातमी पाहिली असेल की एक टोयोटा इनोव्हा ने 13 वर्षात तब्बल दहा लाख किलोमीटर आंतर पूर्ण केले. आपल्या आसपासच्या अशा अनेक टोयोटा च्या गाड्या या नवनवीन रेकॉर्ड बनवत आहेत. 2007 सालची अमेरिकेतील एक टोयोटा गाडी तिने नुकतेच 16 लाख किलोमीटर आंतर पूर्ण केले आहे. आणि एवढे असूनही त्या गाड्या सुस्थितीत आहेत. त्या गाड्यांना फक्त रेग्युलर सर्व्हिस करायची गरज पडते, त्या व्यतिरिक्त इतर कोणताही मेंटेनन्स टोयोटाच्या गाड्यांना लागत नाही. टोयोटाच्या गाड्याना फक्त वेळच्यावेळी रुटीन चेकअप जर केले तर त्या गाड्या काय उत्तम परफॉर्मन्स देतात हे आपण या उदाहरणांवरून पाहू शकतो.
मित्रानो असे म्हंटले जाते कि टोयोटा ची गाडी एकदा घ्यायची आणि बस्स.. ती गाडी कित्येक वर्ष तुमची निस्वार्थपणे सेवा करेल. आणि हे खरे आहे. असा काय आहे जे टोयोटाला इतका मजबूत बनवते?
अजून एक मजेशीर किस्सा सांगतो टोयोटाच्या गाड्यांचा युद्धात देखील हमखास वापर केला जातो. कारण एकच, त्यांचा असणारा मजबुतपणा आणि टिकाऊपणा. ऐंशीच्या दशकात देखील असेच एक युद्ध झाले होते, आणि त्या युद्धाला तर चक्क “THE TOYOTA WAR” असे नावच दिलं होतं कारण त्या युद्धात ४०० टोयोटा पिक अप ट्रक वापरण्यात आले होते.
पण शेवटी प्रश्न असा पडतोच की, अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे टोयोटा च्या गाड्या इतक्या भारी आणि मजबूत आहेत.
चला तर मग जाणून घेऊयात, या ब्लॉगमध्ये आपण पाहूयात की सुरुवातीच्या काळात जगभरातील कार निर्मात्या कंपन्या या कोणत्या प्रकारची प्रोडक्शन लाईन वापरून गाड्या बनवत होते? आणि कालांतराने टोयोटा ने असे कोणते बदल त्यांच्या गाडी बनवणाऱ्या प्रोसेस मध्ये केले आणि त्यांनी इतक्या मजबूत गाड्या बनवायला सुरुवात केली?
खरं तर अठराव्या शतकातच गाड्या बनवण्याचा व्यवसाय हा सुरू झाला होता आणि सुरुवातीला क्राफ्ट प्रोडक्शन सिस्टीम नावाची प्रोडक्शन पद्धत वापरली जायची.
या क्राफ्ट प्रोडक्शन सिस्टीम द्वारे मोठ्या प्रमाणावर गाड्यांचे उत्पादन करता येत नव्हते कारण त्याच्यामध्ये खूप बारकावे आणि खूप मनुष्यबळाचा वापर व्हायचा ते मनुष्यबळ हे कौशल्यपूर्ण असावे लागत, त्यामुळे गाडी बनवणाऱ्या कंपनीला असे कामगार कामावरती ठेवणे हे आर्थिक दृष्ट्या परवडत नव्हते.
यामुळे फोर्ड कंपनीचे मालक हेन्री फोर्ड यांनी एक नवीन क्रांती घडवली आणि एक नवीन तंत्रज्ञान शोधून काढले ज्याला असेंबली लाईन प्रोडक्शन सिस्टीम असे म्हटले जाते. या सिस्टिमद्वारे कमी वेळात भरपूर गाड्यांचे उत्पादन अगदी सहज आणि सोपे झाले. आणि क्राफ्ट सिस्टीम मधील क्राफ्टींग साठी लागणारा वेळ, डायरेक्ट मशीनद्वारे शीट प्रेस करून त्यांनी वाचवला. त्यामुळे ते अगदी कमी वेळेत भरपूर गाड्यांचे उत्पादन करू लागले.
इकडे टोयोटा चं उत्पादन मात्र जुन्या पद्धतीनुसारच सुरू होते त्यामुळे टोयोटा ला अधिक दमदार आणि मजबूत गाड्या बनवता येत नसत.
पण 1950 मध्ये टोयोटा घराण्यातील एक इंजिनीयर अमेरिकेतील डेट्रॉईट येथील फोर्ड कंपनीच्या प्रोडक्शन प्लांट मध्ये तीन महिन्यासाठी ट्रेनिंगला गेला. आणि त्याने पाहिलं की तिथे कसे मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन केली जाते. कश्या प्रकारे असेम्बली लाइन वापरले आहे.
पण त्या टोयोटाला कळून चुकले की जापनीज मार्केट हे वेगवेगळ्या कॅटेगरीतील गाड्यांच्या साठी आहे. इथे लोकांना शहरात लहान गाडी, कच्या आणि शेतातील रस्त्यांवर काम करण्यासाठी पिक अप ट्रक, आलिशान गाडी इत्यादी अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या हव्या आहेत. मास प्रोडक्शन सिस्टिमचा जपानमध्ये फारसा उपयोग होणार नाही नाही. त्याऐवजी त्याने मास प्रोडक्शन सिस्टीम मधील ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करून आपण त्या जागी दुसरी प्रोडक्शन सिस्टिम ही वापरू शकतो अशी कल्पना सुचली ज्याला लिन प्रोडक्शन सिस्टिम असे म्हणतात.
या लिन प्रोडक्शन सिस्टिमद्वारे एकच उद्देश ठेवण्यात आला की कमी प्रमाणात प्रोडक्शन झाले तरी चालेल पण जेवढे प्रोडक्शन होईल किंवा जेवढ्या गाड्या तयार होतील त्या अतिशय मजबूत आणि टिकाऊ झाल्या पाहिजेत त्यामध्ये कोणताही दोष नसावा.
आणि हाच उद्देश साध्य करण्यासाठी टोयोटा च्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मध्ये एक नवीन नियम लागू करण्यात आला. तो असा होता की ज्या स्टेशन वरती किंवा ज्या ठिकाणी एखाद्या गोष्टीमध्ये त्रुटी किंवा दोष दिसेल त्या क्षणी सर्व कंपनीची प्रोडक्शन लाईन थांबवून सर्व वर्कर्स ना त्या आलेल्या त्रुटी किंवा प्रॉब्लेम वरती सोल्युशन शोधायला सांगून ते सोलुशन योग्य आहे कि नाही याची खात्री झाल्यानंतरच तो प्रॉब्लेम दूर करून पुढील काम सुरु व्हायचे आणि त्या नंतरच पुन्हा प्रोडक्शन लाईन सुरू व्हायची.
असे केल्यामुळे सुरुवातीला खूप वेळा प्रोडक्शन लाईन बंद पडायची पण हळूहळू सर्व प्रॉब्लेम्स वरचे सोल्युशन मिळत गेल्यामुळे टोयोटाचे कामगार त्यांच्या कामामध्ये मास्टर झाले आणि नंतर हळूहळू प्रोडक्शन मध्ये त्रुटी येणं कमी किंवा बंद झाले असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळेच ग्लोबल रिपोर्ट जर चेक केला तर टोयोटा च्या गाड्या या सर्वात कमी त्रुटी असणार्या किंवा दोषमुक्त गाड्या असतात असं त्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे.
दुसरे कारण असे आहे की टोयोटा काही पार्ट बाहेरून तयार करून घेते, आणि त्यांची क्वालिटी कंट्रोल सिस्टीम ही फारच उत्तम प्रकारची आहे. टोयोटा चे जेवढे जेवढे सप्लायर्स आणि मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्या सर्वांना दोन कॅटेगिरी मध्ये त्यांनी विभागले आहे. A आणि B असे आणि अशा दोन प्रकारच्या क्वालिटी कंट्रोल टेस्ट घेतल्या जातात. एखादा पार्ट जर ऑर्डर करायचा असेल तर त्याच्या प्रोटोटाइप ची पूर्णपणे त्याच्या क्षमतेच्या दुप्पट परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेमध्ये तो पार्ट पास झाल्यानंतरच त्या सप्लायर ला त्या पार्ट ची ऑर्डर दिली जाते. यावरूनच समजते की क्वालिटी कंट्रोल च्या बाबतीत टोयोटा किती जागृत आहे.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उत्तम क्वालिटी ग्राहकांना देणे हेच टोयोटाने सुरुवातीपासून ध्येय ठेवले आहे, त्यामुळे टोयोटाच्या गाड्या ह्या डोळे झाकून घेण्यासारख्या असतात. कधीही कुठेही घेऊन गेलात तरी गाडी कधीही धोका देणार नाही याची खात्री सर्वाना आहे.
धन्यवाद