पावसाळ्यात गोव्याला का जाऊ नये?
Goa त्याच्या सुंदर सागरी किनार्यासाठी आणि प्रसिद्ध वास्तुकलेसाठी जगभर ओळखला जातो. गोवा पूर्वी पोर्तुगालची वसाहत होती. पोर्तुगीजांनी गोव्यावर सुमारे 450 वर्षे राज्य केले आणि ते 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले.
गोवा भारताच्या पश्चिम क्षेत्रांमध्ये स्थित एक लहान राज्य आहे. जे अरबी समुद्राच्या किनार्यावर वसले आहे. गोवा भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. आजच्या काळात याला भारताचा फन कॅपिटल असे सुद्धा म्हणतात.
गोव्यातील समुद्रकिनारे, जिवंत नाईट लाईफ सर्वानाच आकर्षित करतात. दरवर्षी 20 लाखा पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटक येथे येतात. पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्को व पोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत.
आणि अशा या सुंदर आणि सर्वांना आकर्षित करणाऱ्या गोव्यामध्ये एक दिवस मुक्काम करून आम्हाला पश्चाताप झाला. कारण पूर्वीच्या लेखात आपण वाचलेच असाल की आम्ही ऍक्च्युली पुण्याहून साउथ इंडिया ट्रिप प्लॅन केली होती, पण पश्चिम महाराष्ट्रात आणि सह्याद्रीत पडणाऱ्या प्रचंड पावसाच्या तडाख्यामुळे आम्ही कोल्हापूरमध्ये आल्यानंतर गोकर्णला न जाता आजरा मार्गे आंबोलीतून सावंतवाडीला उतरणे आणि तिथून गोव्यामध्ये जाऊन मुक्काम करणे, हे रन टाईम मध्ये प्लॅन बनवला होता त्याप्रमाणे आम्ही गोव्यात सकाळी आलो, रूम बुक केली होती. आम्ही थोडा वेळ झोपलो जेवण खाऊन त्याच्यानंतर संध्याकाळी चार वाजता जे उठलो आणि म्हटलं थोडं पण आता गोवा फिरून घेऊ पण पाऊस इतका म्हणजे इतका प्रचंड कोसळत होता की ती बाहेर फिरायचं म्हणजे अंगावर काटा यायचा.
पण आम्ही कार असल्यामुळे बाहेर निघायचा निर्णय घेतला आणि आम्ही बाहेर पडलो पूर्ण गोवा आमचा फिरून झाला. गोव्याला कोणतेही ट्राफिक नव्हतं, अजिबात पर्यटक नव्हते सर्व सुनसान आणि भकास गोवा वाटत होता. समुद्रकिनारे ओसाड पडले होते. 90% हॉटेल्स बंद होते. सर्रास चालणारे नाईट लाईफ आणि हॅपनिंग स्ट्रीट ची आपण म्हणतो ती अजिबात नव्हती. त्यामुळे असं झालं की गोव्यात येऊन आम्ही चूक केली की काय?
त्याचमुळे मित्रांनो माझं असं तुम्हाला सजेशन असेल की पाऊस पडत असताना गोव्याला येणे हे खरंच योग्य नाहीये तर तुम्हाला गोवा प्रत्यक्षात अनुभवायचा असेल तर थंडीच्या दिवसात या. थंडीच्या दिवसात मस्त गोवा असतो उन्हाळ्यात पण मस्त गोवा असतो आणि तुम्हाला त्याहूनही जर काही वेगळं करायचं असेल तर नक्कीच साउथ गोव्याला भेट द्या, कारण साऊथ गोवा हा निसर्गाचा अस्सल खजाना आणि आहे. त्याचबरोबर तुम्हाला साउथ गोव्यामध्ये नितांत सुंदर धबधबे निसर्ग आणि मंदिर बघायला मिळतील धन्यवाद…