दिवस 2: Day 2
सकाळची सुरुवात अलार्म पासून झाली पहाटे 5 वाजताच खडखडून जाग आली, पण उठू वाटत नव्हते म्हणून पुनः झोपलो आणि 6 वाजता उठून गार पाण्याने आंघोळ करून फ्रेश झालो. मोबाइल घेऊन फोटो काढायला beach वर गेलो. मला वाटले एवढ्या सकाळी beach वर कोणीच नसेल. पण सलग सुट्ट्या असल्यामुळे आणि दिवाळी नंतर लोक कोकणात भरपूर प्रमाणात येत असल्यामुळे गर्दीचे दर्शन घडले. beach वर पहाटेच एवढी गर्दी होती तर नंतर किती असेल याचा विचार करत photos काढत थांबलो. भरती – ओहोटी मुळे समुद्राचे पाणी काही मागे गेले होते म्हणून चालत चालत पाण्या जवळ गेलो समुद्राचे काही विडियो घेतले.
आसपास चे video घेत असताना पाठीमागे वळून पहिले तर मस्त पैकी सूर्य नारायण नारळाच्या झाडा मागून हळूच डोकावत असताना दिसला बघता बघता सूर्य वर आला जस मला म्हणत होता घे काढ माझा फोटो आणि काही फोटोस तिथेही घेतले. काही मासे समुद्राच्या लाटे सोबत किनाऱ्या वर वाहून आले होते त्यांना काही लोक पुनः समुद्रात नेऊन सोडत होते तर कोणी शंख शिंपले गोळा करत होते मी ही 2/4 शंख आणि शिंपले घेऊन आलो.
तिथेच जवळ कोणी घोड्यावर रपेट मारत होते तर कोण समुद्र मध्ये भिजण्याचा आनंद घेत होते, काही लोक cricket खेळत होते, तर काही जण धावत पळत होती ते पाहून मन अगदी प्रसन्न होत होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक लांबून लांबून वेळात वेळ काढून कोकणात आनंद द्विगुणित करायला येतात.
आम्हीही ज्या साठी कोकण मध्ये आलो होतो त्याचे सार्थक झाले. पाहिजे तसे कोकण भटकंती करता येत होती कुठेही कोणाचीही निराशा झाली नाही त्यामुळे आतून एक वेगळाच आनंद वाटत होता. ते सर्व दृश्य पाहून पुनः रूम वर आलो तेव्हा स्वप्नील उठून फ्रेश झाला होता आणि रोहन फ्रेश होण्यासाठी गेला होता, साधारणतः 8:30 वाजता आम्ही नाश्ता केला आणि चहा घेतला आणि निघालो जंजीरा किल्ला भ्रमंती साठी, हा गड कोणालाही जिंकता नाही आला.
गाडीने साधारणतः रूम पासून 10 मिनिटात गडावर जाणाऱ्या बोट जवळ येऊन पोहचलो. तेवढ्यात दिसले की बोट निघणार आहे मी पळतच जाऊन तिकिट घेतले आणि बोट मध्ये बसलो पण मित्रांची ईच्छा बोट च्या टॉप वर बसण्याची झाली, म्हणून बोट च्या लोकांना extra पैसे देऊन टॉप वर बसलो म्हणजे चांगल्या प्रकारे समोरा समोर गड बघता येईल आणि फोटोस आणि videos घेता येईल.
जसे जसे गडाच्या जवळ पोहचत होतो गडाचा प्रचंड विस्तार नजरेस जाणवत होता लांबून गडाचा अंदाज लावणे अशक्यच गडाचे प्रवेशद्वार नेमके कुठे हे ही लांबून कोणीच पहिल्यांदा भेट देणारे अंदाज लावू शकत नव्हते. गडावर जाताना एका मोठ्या बोटीने आम्ही गेलो त्या बोटीचे नाव पुष्पावती होते बोटी मधील सगळे झुकेगा नही साला म्हणत बोटीने प्रवास करत होते.
असो, (movie चा आणि या बोटीचा काही संबंध नाही) मोठ्या बोटीने गडाजवळ आलो साधारणतः गडाच्या सर्व बुरुजाची ऊंची 40/50 फुट च्या आसपास असावी आणि 2 बुरुजमधील एकूण अंतर 90 फुट आहे. मोठ्या बोटीतून आम्हाला बारक्या बोटी मध्ये बसवले कारण मोठी बोट गडाच्या प्रवेश द्वारा जवळ जाऊ शकत नव्हती म्हणून सर्व लहान बोटी मध्ये बसवून एका मागे एक बोटीतून लोकांना मुख्य प्रवेशद्वारा जवळ नेऊन सोडत होते बोटीमध्येच एक जणानी गाइड चे काम करत गडाचा इतिहास सांगितला.
गड साधारणतः 600/700 वर्ष जूना आहे असे त्यांनी सांगितले, तसेच गडाचा घेरा हा 22 एकर चा असून 22 बुरूज या ठिकाणाला आहेत. पूर्वी गडावर मोठा राबता होता तसेच 2 गोड्या पाण्याचे तलाव ही या गडावर आहेत. पडक्या राजवाडयाचे अवशेष आजही पाहायला मिळते राजवाडा 7 मजली होता त्याचे आता 3 मजलेच आत्ता बाकी आहे असे त्यांनी सांगितले तसे गडाचे जे बुरूज आहेत ते साधारणतः 3-3 मजली होते सर्वात खाली दारू गोळा किंवा अजून धान्यसाठा ठेवण्यासाठी या बुरुजाचा वापर होत असे त्याच्या वर छोट्या छोट्या खिडक्या आहेत तिथे सैनिक थांबून गडाची देखरेख करत होते तर सर्वात वर तोफा ठेवल्या जात असे जी शत्रूला लांबूनच भेदत होत्या असे या बुरुजांचे काम आणि बांधणी आम्हाला गाइड ने सांगितली.
तसेच या गडावर जेव्हा राबता होता तेव्हा साधारणतः 592 तोफा या गडावर होता असे त्यांनी सांगितले आणि सध्या या गडावर 300 पेक्षा जास्त तोफा अजूनही या गडावर आहेत. काही तोफावर कमळ चिन्ह कोरलेले होते तर त्याच्याच वर ब्रिटिश crown की कोरलेला दिसला विचार केला की जेव्हा भारतावर ब्रिटिशांचे राज्य असेल कदाचित त्यांनी हा गड ताब्यात घेऊन हे चिन्ह तोफावर बनवले असेल कोणाला अधिक माहिती असेल तर ते ही सांगा. गड फिरायला बोट वाल्यांनी आम्हाला साधारणतः 50 मिनिटे दिली होती आमच्या कडे फक्त 50 मिनिटे होती गड फिरायला, आम्ही सह्याद्री मध्ये नेहमी भटकत असतो ट्रेकिंग करत असतो. ते skill येथे कामाला आले फक्त 50 मिनिटात 22 एकर चा किल्ला फिरून आम्ही 2 मिनिट आधी बोट जवळ जाऊन थांबलो.
बोट सुरू झाली आणि पुनः किनाऱ्या वर आलो गाडी घेतली आणि साधारणतः 11:30 ला रूम वर आलो 12 वाजता निघायचे होते वाट्टेत खूप ट्रॅफिक ही लागले चिंचोळा रस्ता त्यात मासे विक्री साठी बसलेले लोक ते खरेदी करायला आलेले लोक यांची गर्दी या मुळे रोड वर एक वेळेस एकाच गाडी पास होत होती त्यामुळे गाडीतून खाली उतरून गाडी ट्रॅफिक मधून कशी – बशी बाहेर काढत रूम वर येऊन फ्रेश झालो आणि check out केले रूम मालकाला पुनः येतो म्हणून त्यांचा निरोप घेतला आणि पुनः पाटील खानावळ हॉटेल मध्ये जाऊन जेवण करायला बसलो.
गणेश सोबत पुनः येतो म्हणून फोटोस् घेतले आणि जेवण करून त्याचा ही निरोप घेतला. घरी येताना वाटेत CNG पंप वर खूप गर्दी होती आणि gas ही संपत आला होता, तेवढ्यात पंप वरील एकाने सांगितले येथे थांबून time waste करण्यापेक्षा पुढे जाऊन gas भरा म्हणून आम्ही पुढे निघालो पण वाटेत कुठेच पंप नव्हता म्हणून डायरेक्ट पुणे मध्ये आल्यास CNG भरला वाटेत येताना ताम्हिणी घाट चा नजारा खूपच मस्त दिसत होता तिथे काही वेळ घालवून एका हॉटेल मध्ये चहा आणि कॉफी घेतली आणि पुढे निघालो.
स्वप्नील ने मला साधारणतः 8:30 वाजता मला वाकड बस stop ला सोडले आणि मी बस ने घरी सुखरूप पोहचलो आणि आम्ही सोबत बऱ्याच या कोकण ट्रीपच्या memories मनात आणि कॅमेरा मध्ये साठवून सोबत घेऊन आलो आणि आमची कमीत कमी खर्च मध्ये खूपच भन्नाट अशी कोकण ट्रीप ची सांगता झाली..
Thank you…