Hosted Open वर तुमचं मनःपूर्वक स्वागत!

Hosted Open About Us

मला प्रवास करायला आणि नवनवीन ठिकाणे बघायला फार आवडते. माझ्यासाठी प्रवास म्हणजे केवळ भटकंती नव्हे, तर तो इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि अनुभवांचा अनमोल ठेवा उलगडण्याचा एक प्रयत्न आहे. भारतात हजारो अप्रतिम पर्यटनस्थळे आहेत प्राचीन मंदिरे, भव्य किल्ले, निसर्गरम्य घाटमार्ग, आणि अनेक अद्वितीय ठिकाणे ज्यांचं सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व आपल्याला खुणावत असतं.

मी नेहमीच अशा ठिकाणांना भेट देण्याचा प्रयत्न करतो, जे लोकांच्या नजरेपासून दूर आहेत, पण त्यांच्यात अपार इतिहास आणि सौंदर्य दडलेलं आहे. मंदिरांची अप्रतिम शिल्पकला, किल्ल्यांची दैदिप्यमान तटबंदी, घाटांचे वळणदार रस्ते आणि निसर्गाचे विविधरंगी आविष्कार हे सगळं अनुभवणं म्हणजेच माझ्यासाठी खरा प्रवास.

Hosted Open या वेबसाईट चा उद्देश प्रवासवर्णन आणि प्लांनिंग बद्दल माहिती देण्याबरोबरच त्या ठिकाणांचं महत्त्व, इतिहास, आणि त्याठिकाणी कसे जावे, काय पाहावे, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही तुमच्या पुढच्या ट्रिपला निघालात, तर ती अधिक चांगली, योजनाबद्ध आणि संस्मरणीय व्हावी, यासाठी ही वेबसाइट नक्कीच उपयुक्त ठरेल.

ही वेबसाईट सुरू होण्यामागे एक किस्सा आहे. २०२२ मध्ये एका संध्याकाळी मी आणि माझा मित्र निवांत चहा पीत असताना मी google वर पुढच्या ट्रिपचे नियोजन करत असताना एक गोष्ट लक्ष्यात आली ती म्हणजे, आपल्या मराठी भाषेत इंटरनेट वर फारच कमी माहिती उपलब्ध आहे. अचानक एक विचार मनात आला कि आपणच एखादी साईट सुरु करावी, त्याद्वारे मी माझे प्रवास अनुभव आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी ज्यामुळे आपल्या मराठी वाचकांना प्रवासाचे योग्य नियोजन करायला मदत होईल आणि योग्य माहिती मिळेल. आणि त्याच टेबलवर बसून चहा पितानाच Hosted Open तयार केली.

या वेबसाईटवर तुम्हाला काय मिळेल?
१) ऐतिहासिक स्थळांबद्दल विस्तृत माहिती
२) प्राचीन मंदिरे आणि त्यांचा इतिहास
३) आडवाटेवर लपलेली पर्यटनस्थळे
४) रोड ट्रिप प्लॅनिंगसाठी उपयुक्त मार्गदर्शन
५) प्रवासातील फोटो आणि अनुभव
६) प्रवासाशी संबंधित विविध टिप्स आणि ट्रिक्स

तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट दिलीत याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

तुमच्या प्रवासाच्या अनुभवांना अधिक आनंददायी आणि संस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. जर तुम्हाला काही ठिकाणांबद्दल माहिती हवी असेल किंवा तुमचे अनुभव शेअर करायचे असतील, तर आमच्याशी नक्की संपर्क साधा.