पुण्याजवळ सोलो ट्रॅव्हल रोड ट्रिप: भूगोल हा फक्त पुस्तकं वाचून काळात नाही तर त्यासाठी प्रवास करावा लागतो. प्रवास म्हटलं की अनुभवायला जगायला भरपूर वाव. गमतीदार, नाविन्यपूर्ण तर कधी थरारक असे बरेच अनुभव येत प्रवासात असतात. खरंतर प्रवास हा माणसाला मानसिक दृष्ट्या परिपक्व बनवतो. प्रवासामुळे निर्णयक्षमता आणि प्रसंगावधान सुधारते. वेगवेगळे प्रदेश फिरल्याने बोलण्याचे कसब वाढते, आपला इतिहास आणि भूगोल समजतो. थोडक्यात काय तर जग कळते.
प्रवास करणे म्हणजे खरेतर जगणे. प्रवास हा मनाच्या कक्ष्या रुंद करतो आणि त्यातील पोकळी भरून काढतो. ज्यांना प्रवासाची आवड नसते, त्यांचे जीवन एकाच पानावरच अडकून राहते, कारण जग हे एक पुस्तक आहे आणि प्रवास हे त्यातील विविध रंगी पानांप्रमाणे आहे. बऱ्याचदा प्रवासात सुखसोयींच्या वस्तू नाही मिळत, परंतु निसर्गाच्या सान्निध्यात जी शांती, समाधान आणि आराम मिळतो, ते कशातही मोजता येत नाही. जीवन हा एक प्रवासच आहे, ज्यामध्ये धनाची नाही, तर मनाची आणि इच्छाशक्तीची गरज असते. स्वतःहून काही शिकायचे असेल तर एकट्याने प्रवास करा. प्रवास तुमच्या भीतीच्या मर्यादा कमी करतो आणि तुमच्या विचारांच्या मर्यादा वाढवतो.
पुण्यातून सुरु करून त्याच्या जवळ असणारी कोणकोणती ठिकाणे तुम्ही एकट्याने देखील फिरू शकता हे आपण पुढे पाहू.
पुण्याजवळ सोलो ट्रॅव्हल रोड ट्रिप:
१) पुणे ते मुळशी धरण, ताम्हिणी घाट, कुंडलिका व्हॅली:
पुणे ते मुळशी धरण या मार्गावरील निसर्गाचे सौंदर्य अतुलनीय आहे. ताम्हिणी घाटांची उंची, कुंडलिका नदीची शांतता आणि असंख्य धबधब्यांची मनमोहक दृश्ये अनुभवता येतात.
२) पुणे ते लेण्याद्री गणपती मंदिर, भीमाशंकर मंदिर, माळशेज घाट:
पुणे ते लेण्याद्री, भीमाशंकर आणि माळशेज घाट हा प्रवास आपल्याला धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जातो. लेण्याद्रीतील गणपतीचे अद्भुत शिल्प, भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग आणि माळशेज घाटातील हिरवेगार निसर्ग आपल्या मनाला शांतता देऊन जातात.
३) पुणे ते व्हरांधा घाट इथून कोकण किंवा ताम्हिणी मार्गे पुणे असाही प्रवास करता येईल.
४) पुणे ते महाबळेश्वर, वाई, सातारा, रायगड, प्रतापगड, पोलादपूर घाट:
महाबळेश्वरच्या हिरव्यागार डोंगरांनी, वाईच्या ऐतिहासिक मंदिरांनी, साताऱ्याच्या राजवाड्यांनी, रायगडच्या आणि प्रतापगडाच्या भव्यतेने आणि पोलादपूर घाटाच्या निसर्गाने आपले मन नक्कीच मोहित होईल.
५) पुणे – ताम्हीणी घाट – माणगाव – महाड – व्हरांधा घाट – पुणे असाही तुम्ही एक अद्भुत प्रवास करू शकता.
६) पुणे ते श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर:
पुणे पासून थोडेसे दूर असलेले श्रीवर्धन, दिवेआगर आणि हरिहरेश्वर हे कोकण किनार्यावरील सुंदर ठिकाणे आहेत. या ठिकाणी तुम्हाला शांत समुद्रकिनारे, हिरव्यागार नारळांची झाडे, मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळे पहायला मिळतील. या ठिकाणी जाऊन तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण विश्रांती घेऊ शकता.
७) पुणे ते कोलाड, रेवदंडा, कोर्लई किल्ला, पुणे
८) पुणे ते लोणावळा, भुशी डॅम, टायगर पॉईंट, कामशेत पुणे
९) पुणे – ताम्हिणी – लोणावळा – पुणे
१०) पुणे – खेड शिवापूर – प्रति बालाजी मंदिर, पुरंदर, सासवड, जेजुरी, पुणे
११) पुणे – भिगवण डॅम – पुणे
१२) पुणे – नाणेघाट – जुन्नर – पुणे
१३) पुणे – शिर्डी – देवगड – रांजणगाव गणपती – पुणे
१४) पुणे – कोकण – समुद्राकाठच्या रस्त्याने दमण पर्यंत जाऊन दमण – सापुतारा – नाशिक – पुणे:
हा प्रवास आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जातो. या प्रवासात तुम्हाला कोकण किनार्याची सुंदर दृश्ये, दमणचे ऐतिहासिक वास्तू, सापुताराच्या हिरव्यागार डोंगरांनी भरलेले जंगल आणि नाशिकच्या प्राचीन मंदिरे यांचे दर्शन घडेल.
१५) पुणे – सातारा – कोल्हापूर – गोवा:
कोल्हापूर नंतर गोव्याला जाण्यासाठी करूळ घाट, फोंडा घाट, आंबोली घाट, तिलारी घाट असे ४ पर्याय आहेत. सर्व घाट अनिश्चय सुंदर आहेत. या सर्वात फोंडा घाट दरड कोसळण्याच्या दृष्टीने इतर घाटांपेक्षा सुरक्षित आहे.
१६) पुण्याहुन सोलापूर, नगर औरंगाबाद या बाजूला बाईक वरून फिरणारे खुप कमी आहेत त्यामुळे या बाजूला सुद्धा खूप प्रेक्षणीय स्थळे आहेत.
१७) पुणे – सोलापूर – अक्कलकोट – तुळजापूर – पंढरपूर – पुणे
अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर बरोबर सोलापुरात प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घ्याल विसरू नका, अतिशय सुंदर मंदिर आहे.
१७) पुणे – सातारा रोड – कापूरहोळ – काळदरी फाटा – काळदरी – वीर धरण – पुणे
१९) पुणे – विजापूर – ऐहोल – पट्टडकल – बदामी – पुणे
२०) पुणे ते खडकवासला धरण
२१) पुणे ते लवासा सिटी, पानशेत डॅम, पुणे
२२) पुणे ते पवना डॅम, लोणावळा, पुणे
तर अश्या या काही पुण्याजवळ सोलो ट्रॅव्हल रोड ट्रिप पुण्यातून सुरु होणाऱ्या आहेत. तर तुमच्याही काही आईडिया असतील आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर पुण्याच्या जवळ खूप किल्ले आणि धरणे आहेत, जर ट्रेकिंग करणार असाल तर तोही पर्याय उत्तम आहे.
धन्यवाद.