रामेश्वरम मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही गाडी घेऊन धनुष्कोडीच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केली. आज पर्यंत धनुष्कोडी हे फक्त गुगल वर पाहिलेअसल्यामुळे प्रत्यक्षात बघण्याची ओढ हि सतत असायची, आणि अनेक स्वप्नांपैकी एक आज प्रत्यक्षात येत पूर्ण होत होते.
भारताच्या आग्नेय टोकाला, जिथे बंगालचा उपसागर हिंदी महासागराला मिळतो, तिथे धनुषकोडी हे गाव आहे. एकेकाळी गजबजलेले व्यापार केंद्र आणि मासेमारीचे एक गाव होते, धनुषकोडी आता खवळलेल्या समुद्राने वेढलेले आणि अनेक रहस्यांनी झाकलेले आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी:
धनुषकोडी, रामेश्वरम बेटाला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणाऱ्या जमिनीच्या अरुंद पट्टीवर वसलेले आहे, एके काळी त्याच्या मोक्याच्या स्थानासाठी आणि सागरी व्यापारासाठी ओळखले जात होते. रामायणात सांगितल्याप्रमाणे प्रभू रामाने येथून लंकेपर्यंत एक पूल बांधला, ज्याला रामसेतू असेही म्हणतात.
20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात गावची समृद्धी शिगेला पोहोचली होती, रेल्वे मार्गाने ते देशाच्या इतर भागाशी जोडले होते. पण, 22 डिसेंबर 1964 च्या रात्री एका चक्रीवादळाने धनुषकोडीला वेढले आणि हजारो लोकांचा बळी घेतला. तेंव्हापासून तिथे कोणीही राहत नाही.
आम्ही जसजसे धनुष्कोडीच्या दिशेने पुढे जात होतो तसतसे आम्ही आश्चर्याने भारावून जात असत. कारण पुढे जात असताना निमुळता होत जाणारा रास्ता, आणि दोन्ही बाजूने समुद्र. एका बाजूला हिंदी महासागर तर दुसऱ्याबाजूला बंगालचा उपसागर. हे खूपच एक्ससायटेड होते.
सरकारने इथे येणार रास्ता खूपच सुंदर पद्धतीने मेंटेन केलाय. सर्वात शेवटच्या ठिकाणी पोचल्यावर तिथे जाणीव होते कि आपण खूपच पवित्र ठिकाणावर आहोत. जिथून प्रभू श्री राम यांनी लंकेला जाण्यासाठी रामसेतू बांधला.
मला कन्याकुमारी आणि इथे एक गोष्ट लक्ष्यात आली ती म्हणजे, इथल्या बीचवर उभे राहून एकाच ठिकाणाहून सूयोदय आणि सूर्यास्त दोन्ही बघता येतो. जे आपल्याकडे कोकण किनारपट्टीवर शक्य नाही. इथे बरेच पाहता येतात, जसे इथे मंदिर हि आहेत. तेही पाहता येते.
इथे आल्यानंतर सर्वजण एकदम शांत होते. प्रत्येक क्षण अनुभवत होतो आम्ही. आणि पुढच्या प्रवासासाठी ची ऊर्जा घेत होतो. थोडावेळ इथे थांबून समुद्रामध्ये उतरून शांत उभे राहिले आणि त्यानंतर नयनरम्य सूर्यास्त पहिला.
आयुष्यात काहीतरी नक्कीच वेगळे केल्याची जाणीव आज झाली. आत्तापर्यंत केलेले प्रवास एकीकडे आणि हा प्रवास आणि इथली ठिकाणे एकीकडे असा दररोज अनुभव येत होता. आणि रोज काही ना काही नवीन गोष्टी शिकवत होता.
रामेश्वरम आणि धनुष्कोडी इथल्या अनेक आठवणी, किस्से आणि अनुभव घेऊन आम्ही आमचा पुढल्या प्रवासाच्या ठिकाणांसाठी निघालो. आजचा आमचा मुक्काम मदुराई ला होता.