कावळे – बावळे खिंडीची एक अतुलनीय शौर्य गाथा:
हा काळ आहे ११ मार्च १६८९ जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच निधन झाले (फाल्गुन वाद्य ३०). राजधानी रायगड़ावर वयाने अवघे लहान असलेले राजाराम महाराज गाधीवर आले, छत्रपती झाले. आता औरंगज़ेबने जणूं मराठा साम्राज्य संपवण्याचा प्रण केला होता.
त्याने कर्तबगार सरदार शहाबुद्दीनला रायगडला वेढा टाकण्यास व राजाराम राजेंना पकडण्यास पाठवले. जुल्फिकार खानाच्या थोड़क्या सैन्यानि आधीच रायगडला विळखा टाकला होता. हाच वेढा(विळखा) मजबूत करण्यासाठी औरंगज़ेब ने तेवढच मोठं सैन्य शहाबुद्दीन सोबत पाठवले. सर्वत्र कापाकापि सुरुच् होती. जो समोर येईल त्याला फक्त चिरायच् एव्हढच ते करत होते. रक्तानं ते भीजले माकलेले तासा वर तास उलटले. सुमारे १६ तास सरले होते. जीवाजी सर्कले यांचा हां महापराक्रम पाहुन मुग़ल सरदार स्तब्द झाला होता. (जीवाजी सर्कले यांनी खानाची अर्ध्र्याहून आधिक सेना परास्त केली होती , सुमारे ४००० हुन अधिक)
काही तासांनी ही गोष्ट खाली सांदोशी गावात समजली. त्यावेळी गावात मुक्कामी असलेले गोदाजी जगताप काही साठ सत्तर गावातील मावळे घेऊन जीवाजी सर्कले यांच्या मदतीसाठी त्यानी खिंडीकडे धाव घेतली. आता मराठ्यांची अशी मुठभर जेमतेम् साठ सत्तर ची ही फ़ौज खिंडीत आली.
खिंडीत आता भयानयुद्ध सुरु होत. . रक्ताचे पाट वाहायला लागले. जीवाजी सर्कले रक्तात भिजुन गेले. तळपत्या सूर्या सारखे ते लालबूंद झाले होते. . या मराठ्यांनी जणु कहरच केला होता. खिंडीत रक्ताचा अभिषेक झाला. खानाला आता घाम फुटला, मराठ्यांच्या तूफानी वारांने पठाण कापले गेले. खानाच् सैन्य आता संपत चालल् होत्. आपली हार होणार हे ख़ानाला आता समजल्. .
आपला जीव वाचवण्यासाठी शहाबुद्दीन खान व् राहिलेल्या काही शे दीडशे सैन्याने खिंडीतून पळ् काढला. मुठभर मराठ्यांनी हजारोंना संपवल. मावळ्यांनी अखेर युद्ध जिंकल. मात्र , जीवाजी नाईक सर्कले यांचा या अग्निकुंडात बळी गेला. जिवाजी नाईक सर्कले यांनि मरेपर्यंत खिंडीतून एक हि गनीम जाऊन दिला न्हवता.
त्यांनी विजयश्री चा झेंडा लावत आपला देह रणी ठेवीला. तब्बल १६ तास पेटलेल् हे युद्ध शांत झाल्. स्वराज्यावरच् सर्वात मोठ् संकट टाळल् होत्. युद्ध संपल्या वर राहिलेल्या काही मवळ्यांनी , जीवाजी सर्कले व् शहीद झालेल्या मावळ्यांना ते, त्याचं (प्रेत) घेऊन खाली सांदोशी गावात आले.
गावात जीवाजी नाईक सर्कले व् इतर शहीद झालेल्या मवळ्यांचे अंत वीधी पार पडले. त्यांच्या घरातील स्त्रीया सती गेल्या, हे त्याग असामान्य होते!!
पुढे हा शहाबुद्दीन दख्ान पळून दक्षिणेत गेला आणि पुढे हैद्राबाद च् जे निजाम-उल-मुल्क घराण् जन्माला आल ते या पळालेल्या शहाबुद्दीनच.
तब्बल १६ तास पेटलेल् हे युद्ध, १६ तास लढणारे ते मराठे काय असतील आणि अखेर मराठ्यांच्या बलिदानने व् विजयाने ते संपल्. जीवाजी सर्कले नाईक यांच्या मरणाच् सार्थक झालं कारण छत्रपती राजाराम महाराज सुखरूप दक्षिणेत पोहोचले.
एक मावळा शंभराला भिडला. . दहा मराठे हजारोंशि भिडले हजरोंना चिरले. दहा जणांनी हजारोंना कंठस्नान घातल्. जेमतेम ६०-७० मावळ्यांनी जवळपास सात हजार गनीमाला परास्त केले, अखंडा सेना पराजीत केली. मणभर मोघली फ़ौजेला कणभर मराठ्यांनी यंमसदनि धाड़ल्. काय पराक्रम. . ते स्वराज्य प्रेम . . ती स्वामी निष्ठा. . याचा परिणाम म्हणजेच (शके १६११ शुल्क संवस्तरे, चैत्र वैद्य १०) राजाराम महाराज छत्रपती प्रतापगड करुन पुढे दक्षिणेत , सरसेनापति हर्जीराजे परसोजी राजेमहाडिक यांस कड़े सुखरूप पोहोचले. व् पुढच्या काही काळात एक अफट अश्या मराठा साम्राज्याचा उदय झाला.
हा पराक्रम तीनशे बांदलांनी व् बाजीप्रभु देशपांडे यांनी लढविलेली पावन खिंड आणि हजारोंवर तूटुन पड़णारे प्रतापराव गुजर (सात मराठे) यांची एकत्रित आठवण करुन देतो.
आजही या लढाईत शहीद झालेल्या वीरांचे, जीवाजी सर्कले नाईक यांची साक्ष असलेल्या विरगळी, समाधि, सतिशिळा गावात आहेत. ३५० वर्षांन पूर्वी खिंडीत कोरलेली त्यांची “मूर्ति ” त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देते. अस म्हणतात की हा अतुलनीय पराक्रमाने पाहुन छत्रपती घराण्याने सर्कले घराण्याला ला पंचधातुत कोरलेले इनामी पंचधातु स्तुति पत्र दिले होते (सध्या ते उपलब्ध नसून ह्याच पुरव्याचा शोध चालू आहे)
२५ मार्च हा दिवस शौर्य दिवस म्हणून सर्कले यांच्या सांदोशी गावी थाटात साजरा केला जातो. वीरांना श्रद्धांजली अर्पित केली जाते. जेधे शकावलीत ह्या भव्य लढाईची ही ऐतिहासिक नोंद आहे. जर त्यावेळी “सरखेल जीवाजी सर्कले नाईक” लढले नसते तर इतिहास काही औरच असता. . .
जय शिवराय
– महाड रायगड माझं गाव माझा अभिमान.