नमस्कार, मी सोमेश तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे.
जर तुम्ही ही सिरीज फॉलो करत असाल, तर तुम्हाला नक्कीच माहित असेल की आम्ही चौघे मित्र कसे अचानक दक्षिण भारत फिरायचा प्लॅन बनवतो आणि शुक्रवारी रात्री ऑफिस झाल्यानंतर डायरेक्ट गाडी काढून बाहेर पडतो. त्यानंतर गोव्यात कसे पोहोचतो, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गोकर्ण मुर्डेश्वर चे दर्शन घेऊन मंगलोर मध्ये येऊन कसे पोहोचतो. हे सर्व तुम्ही वाचले असेल.
आजचा दिवस हा मंगलोर मधून सुरू होतो. मंगलोर हे शहरात आम्ही चौघेही पहिल्यांदाच गेलो होतो. शहराची आर्थिक सुबत्ता पाहता काही प्रश्न पडले. त्यातील पहिला प्रश्न हा होता की इथल्या लोकांचा मेन इनकम सोर्स काय असेल? कारण पूर्ण शहर फिरताना मोठमोठे रस्ते, मोठ्या मोठ्या बिल्डिंग, हॉटेल्स, रेस्टॉरंट, सोन्याची दुकाने, मॉल्स इत्यादी गोष्टी पाहायला मिळत होत्या.
त्यानंतर रस्त्यावरून प्रवास करत असताना ही गोष्ट समजली की मंगलोर हे दक्षिण भारतातील सर्वात मोठे पोर्ट असलेले शहर आहे. इथून भारताचा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट एक्स्पोर्टचा बिजनेस चालतो. त्याचबरोबर मंगलोरहुन बंगलोर हे शहर जोडले गेले असल्यामुळे पूर्ण दक्षिण भारताची कनेक्टिव्हिटी त्याचबरोबर महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर केरळ, पश्चिम आंध्रप्रदेश इकडची सुद्धा चांगल्या पद्धतीची कनेक्टिव्हिटी मंगलुरला आहे.
मंगलोर ही अत्यंत सुंदर सिटी आहे. स्वच्छता भरपूर आहे. सर्वजण ट्राफिक रूल्स फॉलो करतात, सगळ्या गोष्टी एकदम डिसिप्लिन आहे.
सकाळी लवकर उठून हॉटेलच्या खाली छोट्याशा टपरीवर मिळणारा मेदूवडा आणि इडलीचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो. पाऊस अजूनही पाठ सोडत नव्हता. पण थोडंसं पावसाचं प्रमाण कमी झालं होतं, आमचा आजचा प्लॅन असा आहे की मंगलोर मधून निघणे आणि मैसूरला मुक्कामाला पोहोचणे. पण या प्रवासामध्ये कोण कोणती पर्यटन स्थळ आहेत जी की आपण जात जाता ऑन द वे पाहू शकतो हे शोधण्याचा काम मी आणि दीपक सर सतत करायचो.
त्यातून आम्हाला काही पर्यटन स्थळ दिसले जसे की संपजे, जे की रबर साठी सर्वात फेमस आहे त्यानंतर मला भेटले कूर्ग जे कॉफीसाठी सर्वात फेमस आहे. तर अशी आम्ही ठिकाण बघत बघत जाण्याचा निर्णय घेतला. मंगलोर पासून आम्ही जेव्हा हायवेला लागलो तो हायवे होता मंगलोर ते बेंगलोर या हायवेचं काम सुरू असल्यामुळे हा अत्यंत खराब परिस्थितीतील हायवेचा टप्पा साधारण 30 ते 40 किलोमीटरचा होता. तो पार करायला आम्हाला दीड एक तास गेला, त्यानंतर जेव्हा आम्हाला म्हैसूर राइट साईडला असा बोर्ड दिसला त्यावेळी जीव भांड्यात पडला.
तेव्हा मी म्हैसूर कडे गाडी वळवली तेव्हा आमच्या लक्षात आले की, आज आपला दिवस अतिशय सुंदर आणि एडवेंचर्स होणार आहे. कारण पूर्ण सिंगल रस्ता दोन्ही बाजूने पुष्पगिरीचे जंगल, निलगिरीचं जंगल आणि दिवसा सुद्धा अंधार पडलेला.
त्यातच पाऊस चालूच होता. पण एक चांगलं होतं की जसं जसं आम्ही पुढे जाऊ तसं तसं पावसाचं प्रमाण हे कमी होत चालले होते. त्यानंतर आम्ही वळणदार रस्ते, जंगल घाट, डोंगर दर्या, चढ-उतार, बोगदे, ब्रिज असे वेगवेगळे गोष्टी पार करत करत जंगलाचा आनंद घेत, सोबतीलाच चहा भजी यांचा आनंद घेत आमचा प्रवास हा सुरू होता.
जंगलातून वळण घेत आमची गाडी पुढे पुढे जात होती. आम्ही डोंगर जसं जसं वर चढत होतो, तसं तसं पावसाचं प्रमाण कमी होत होतं. आणि प्रत्येक वळणावर आम्हाला कोणता तरी जंगली प्राणी दिसेल याची बालिश अपेक्षा होती.
आमचं नशीब एवढे चांगलं नव्हतं की, आम्हाला दिवसाढवळ्या एखादा जंगली प्राणी दिसावा, पण असेच आमचे गाणी, गप्पा, मस्करी, एकमेकाची चेष्टा करत आणि ऑफिसच्या चर्चा करत करत संपजे या ठिकाणी पोहोचलो.
संपजे हे दक्षिण भारतातील प्रमुख रबर उत्पादनाचे ठिकाण आहे. तिथे काही फोटोशूट झाल्यानंतर पुन्हा एकदा चहा घेतला आणि पुढील मार्गाला लागलो त्यानंतर दुपारी जेवणाच्या वेळेला आम्ही कूर्ग येथे पोचलो.
इथे अस्सल केरळची थाळी खाऊन मन तृप्त झाले. त्यानंतर आम्ही कूर्ग येथील प्रसिद्ध अप्पे धबधबा बघायला गेलो. धबधब्याचे परफेक्ट नियोजन पाहून मला प्रश्न पडला की, अशी सुविधा महाराष्ट्र शासन का देऊ शकत नाही? त्या ठिकाणी कुर्गमध्ये वीस रुपये तिकीट लावला होता धबधबा बघण्यासाठी, पण धबधब्याच्या ठिकाणी जाऊन पर्यटकांचा जीव धोक्यात येणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली होती.
दोन्ही बाजूंनी निलगिरीची जंगल आणि कॉफीचे मळे, मधून काँक्रीट चा रस्ता, उतार स्वच्छतेसाठी सेवक, सुरक्षेसाठी गार्ड आणि 12 ते 14 फूट उंचीचे तारेचे भक्कम कुंपण इतक्या सुरक्षिततेमध्ये पूर्णपणे इतका मोठा धबधबा मी जवळ जाऊन पाहू शकलो ते फक्त आणि फक्त चांगल्या सुविधेमुळेच.
तिथे प्रति मानसी 20 रुपये घेतले याचे वाईट वाटले नाही, पण सुरक्षित राहून धबधबा पाहत आला याचा आनंद हा वेगळाच होता. अशा सुविधा महाराष्ट्रामध्ये होणे गरजेचे आहे. कारण आपल्या सह्याद्री मध्ये अनेक प्रसिद्ध धबधबे आहेत जिथे जाण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.
त्यानंतर धबधब्याजवळ व्हिडिओ शूट, फोटोशूट करून आम्ही पुन्हा गाडीत आलो आणि गाडी थेट मैसूरच्या दिशेने निघालो. संध्याकाळी सात, साडे सातच्या सुमारास आम्ही म्हैसूर या कर्नाटकच्या ऐतिहासिक शहरामध्ये पोहोचलो.
शहरांमध्ये पोहोचताच आम्हाला वेगळ्याच दुनियेत आल्याची जाणीव झाली. आज हॉटेलच बुकिंग केलं नव्हतं पण ऑन द स्पॉट आम्हाला एका ठिकाणी स्वतः हॉटेल मिळाले. मस्तपैकी जेवण जेवून थोडसं रात्री म्हैसूर एक्सप्लोर करून आम्ही निवांत झोपी गेलो ते दुसऱ्या दिवसाच्या प्रवासासाठी.