महाराष्ट्र कोकण कोस्टल रोड ट्रिप प्लॅन | Maharashtra Konkan Coastal Road Trip Plan

Hosted Open
6 Min Read
महाराष्ट्र-कोकण-कोस्टल-रोड-ट्रिप-मुंबई

महाराष्ट्र कोकण कोस्टल रोड ट्रिप प्लॅन – Maharashtra Coastal Road Trip

निसर्गरम्य किनारपट्टीवर एक अनोखा आनंददायी प्रवासाचा अनुभव देते. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईपासून सुरुवात करून, आपण नयनरम्य किनारपट्टीवरील गावं, शहरं, मंदिरं आणि पर्यटन स्थळं पाहत एक आयुष्यभरासाठी संस्मरणीय ट्रिप करू शकता.

हा प्रवासात अनेक मंदिरे, समुद्रकिनारे, जेट्टी क्रॉसिंग, पाण्यावरील लहानमोठे पूल, आंबा, नारळ, सुपारी यांच्या बागा, सुरु ची खारफुटीच्या जंगले, डोंगर दऱ्या, किल्ले, नद्या ओढे, ओहळ, सूर्योदय आणि सूर्यास्त या सर्वानी भरलेला आहे.

आपल्याला महासागराच्या जवळून प्रवास करायचा असल्याने SH4 हा किनारी मार्ग म्हणून ओळखला जातो. एकूण पाच ते सहा वेळा तो समुद्रात किंवा एखाद्या मोठ्या बॅकवॉटर जवळ जाऊन थांबतो, ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी फेरी बोट घ्यावी लागते.

Maharashtra Costal road trip plan
Maharashtra Costal road trip plan

तुम्ही हा प्रवास सुरु करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की Google map तुम्हाला मेन मुंबईपासून गोवा हायवे ने जाण्यास सांगेल, पण आपल्याला किनारपट्टीच्या बाजूने प्रवास करायचा असल्याने तुम्हीसुद्धा थोडा त्याबद्दल जागरूक राहा.

प्रवास सामान्यत: मुंबईपासून दक्षिणेकडे पश्चिम द्रुतगती महामार्गाने अलिबागच्या किनारी शहराकडे सुरू होतो. अलिबाग हे अलिबाग बीच आणि काशिद बीच सारख्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते, जिथे तुम्ही आराम करू शकता आणि आनंद घेऊ शकता.

दक्षिणेकडे जात असताना तुम्हाला अनेक बीच आणि पर्यटन स्थळे मिळतील, त्यानंतर तुम्ही मुरुडच्या मोहक शहरात पोहोचाल, जो मुरुड-जंजिरा किल्ला नावाच्या भव्य सागरी किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. हा किल्ला एका बेटावर उभा आहे आणि अरबी समुद्राचे विहंगम दृश्य इथून दिसते.

Kokan ghats view
Kokan ghats view

पुढे या किनार्‍याच्या दक्षिणेला, तुम्ही दिवेआगर, हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन पाहू शकता, ज्यांना एकत्रितपणे “ट्राय-सी बीच” म्हणून ओळखले जाते. प्रामुख्याने हे किनारे शांतता आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जातात पण सध्या सोशल मीडिया चे फोटो पाहून हल्ली इथेही लोकांची गर्दी होऊ लागली आहे. मुख्यतः पुणे, नाशिक, आणि नगर चे पर्यटक जास्त असतात इथे.

यानंतर तुम्ही आंजर्ले, हर्णे, मुरुड, कोळथरे या समुद्रकियांकडे जाऊ शकता. हे तुलनेने अजूनही कमी गर्दीचे आहेत, पण चांगल्या बेसिक सुविधा उपलब्ध असणारे किनारे असल्याने इथे कोणतीही अडचण येत नाही. इथे तुम्हाला शांत किनाऱ्यांसोबतच मंदिरेही पाहता येतील.

इथून पुढे दाभोळ च्या जेट्टी मार्गे अंजनवेल, गुहागर, वेळणेश्वर अशी ट्रिप करून जयगड जेट्टी/बंदरावर पोचता येईल. या प्रवासात तुम्ही अतिशय मनमोहक रस्ते, किनारे आणि मंदिरे पाहू शकता.

जयगड जेट्टी क्रॉस करून तुम्ही जगप्रसिद्ध अश्या गणपतीपुळे येथे भेट देऊ शकता. हे मंदिर एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. जयगड ते गणपतीपुळे हा सुद्धा रास्ता अतिशय सुंदर आहे, इथून जर तुम्ही अजून दक्षिणेकडे गेलात तर, तुम्ही रत्नागिरी या शहरात पोहोचाल, जे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हे महान स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान आहे आणि तुम्ही त्यांचे वडिलोपार्जित घर, टिळक संग्रहालयाला भेट देऊ शकता. निसर्गरम्य रत्नागिरी दीपगृह आणि प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ला चुकवू नका.

Kokan water crossing jetty
Kokan water crossing jetty

इथून पुन्हा दक्षिणेकडे मार्गक्रमण सुरु ठेवल्यास पावस येथील प्रसिद्ध मठ पाहून तुम्ही विजयदुर्ग किल्ला, देवगड, कुणकेश्वर अशी प्रसिद्ध ठिकाणे बघत बघत नितांत सुंदरता भरलेल्या आणि निसर्गाने मुक्त पणे उधळण केलेल्या मालवण या ठिकाणी पोचाल. मालवण हे नयनरम्य शहर आहे, जे मूळ समुद्रकिनारे, जलक्रीडा आणि ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. हा किल्ला एका छोट्या बेटावर वसलेला असून छोट्या बोटीतून येथे पोहोचता येते. हे त्याच्या भव्य वास्तुकला आणि अरबी समुद्राच्या विहंगम दृश्यांसाठी ओळखले जाते.

मालवण च्या दक्षिणेला तारकर्ली, भोगावे, वेंगुर्ला, शिरोडा आणि रेडी चा गणपती असा प्रवास करत गोवा या राज्यात पोचाल.

तिथून पुन्हा मुंबई ला परत येताना तुम्ही कोणत्याही नॅशनल हायवेने येऊ शकता.

संपूर्ण प्रवासादरम्यान, तुम्ही समुद्रकिनाऱ्यावरील विविध स्वादिष्ट स्थानिक सीफूड आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. महाराष्ट्रातील कोस्टल रोड ट्रिप नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक खुणा आणि सांस्कृतिक अनुभव यांचे पूर्ण मिश्रण आहे ज्यामुळे भारताच्या नयनरम्य पश्चिम किनारपट्टीचे अन्वेषण करणार्‍या प्रवाशांसाठी ते एक संस्मरणीय धाडस बनते.

टीप: प्रवास करत असताना Google तुम्हाला सतत नॅशनल हायवे ने जाण्यासाठी सुचवत राहील. पण तुम्ही त्यावेळी आजूबाजूच्या परिस्थीचा अंदाज घेऊन आणि स्थानिक लोकांना विचारून समुद्र किनाऱ्याजवळ राहण्याचा प्रयत्न नक्की करा. काहीवेळा तुम्हाला रास्ता निर्मनुष्य, किंवा चुकल्यासारखं वाटेल, पण हाच रास्ता तुम्हाला सर्वात सुंदर कोकण दर्शन घडवेल.

महाराष्ट्र कोकण कोस्टल रोड ट्रिप प्लॅन: konkan road trip itinerary

दिवस १: मुंबई ते श्रीवर्धन
दिवस २: श्रीवर्धन ते गणपतीपुळे
दिवस ३: गणपतीपुळे ते मालवण
दिवस ४: मालवण ते गोवा

हा मार्ग आणि ४ दिवसाचे प्लांनिंग हे मी जेंव्हा पहिल्यांदा प्रवास केला होता तेंव्हाचे आहे. कृपया इथे एक गोष्ट लक्ष्यात घ्यावी कि, प्रत्येकाच्या गाडी चालवण्याच्या क्षमतेनुसार आणि रस्त्यांची स्थिती यामुळे वरील नियोजनामध्ये थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो.

मुंबई ते गोवा समुद्र किनारी मार्गातील ठिकाणे:

१. अलिबाग
२. नागाव
३. रेवदंडा
४. कोर्लई
५. काशीद
६. दिवेआगर
७. श्रीवर्धन
८. हरिहरेश्वर
९. वेळास
१०. केळशी
११. आंजर्ले
१२. हर्णे
१३. मुरुड
१४. आंजर्ले
१५. कोळथरे
१६. अंजनवेल
१७. गुहागर
१८. वेळणेश्वर
१९. जयगड
२०. गणपतीपुळे
२१. रत्नागिरी
२२. पावस
२३. विजयदुर्ग
२४. देवगड
२५. कुणकेश्वर
२६. मालवण
२७. तारकर्ली
२८. भोगावे
२९. वेंगुर्ला
३०. शिरोडा
३१. रेडी गणपती मंदिर

तर मग अश्या पद्धतीने तुम्ही कोकण किनारपट्टीची रोडट्रीप प्लॅन करू शकता. यापेक्षा तुम्ही अजून काही भन्नाट आणि वेगळे काही प्लॅन केले असतील तर ते आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद!!

Share This Article
2 Comments
  • आम्हाला 7 दिवसांची कोस्टल कोकण सहल पुण्यातुन करायची आहे.अलिबाग पासून सुरू करून कुठे पर्यंत करता येईल कृपया नियोजन देता येईल का

    • कोकण ट्रिप करण्यासाठी सात दिवस हा बऱ्यापैकी चांगला वेळ आहे. या सात दिवसात तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे ठिकाणे निवडू शकता, अलिबाग पासून ते शिरोडा, सावंतवाडी हे कोकण प्रामुख्याने गृहीत धरले जाते. तिथून खाली गोवा सुरू होतो. अलिबाग ते शिरोडा या प्रवासात आपल्याला बरेच बीच, मंदिरे किल्ले आहेतच तर हे सर्वच पहायचे असतील तर सात दिवसात ते शक्य होणार नाही, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार महत्त्वाची ठिकाणे पाहू शकता, त्याचबरोबर सात दिवसांपैकी शेवटचा दिवस हा तुम्हाला shiroda/sawantwadi ते pune/mumbai via kolhapur(Mahalakshi Mandir) या प्रवासासाठी लागेल त्यामुळे कोकण किनारपट्टी फिरण्यासाठी तुमच्याकडे खरं बघायला गेले तर सहाच दिवस असतील, तर त्यानुसार तुम्ही नियोजन करावे, पुढे काही महत्त्वाची ठिकाणे दिली आहेत त्यांना आवर्जून भेट द्या .. धन्यवाद.

      अलिबाग, रेवदंडा , चौल गावातील सर्व मंदिरे , कोर्लई किल्ला (सकाळी लवकर जाणे योग्य), जंजिरा किल्ला , दिवेआगर बीच आणि मंदिरे , दिवेआगर तो श्रीवर्धन कोस्टल रोड , हरिहरेश्वर , वेळास बीच , श्री केशवराज मंदिर दापोली , वेळणेश्वर मंदिर आणि बीच, कोळथरे बीच, उन्हवरे गरम पाण्याचे झरे, गुहागर , हेदवी बीच आणि गणपती मंदिर, गणपतीपुळे , आरेवारे बीच, थिबा पॅलेस, पावस देवस्थान, देवघळी बीच (श्यक्यतो संध्याकाळी जावे), विजयदुर्ग किल्ला, श्री विमलेश्वर मंदिर, देवगड विंडमिल गार्डन, कुणकेश्वर मंदिर, सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, देवबाग बीच, शिरोडा बीच, रेडी गणपती मंदिर व बीच

      अजूनही बरेच सुंदर points आहेत त्यांची नाव इथे दिली नाहीत, पण ते तुम्हाला वाटेतच लागतील. अधिक माहितीसाठी इथे वाचावे. https://hostedopen.com/7-days-kokan-trip-plan/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *