पुण्याच्या मानाच्या ५ गणपतींचे दर्शन कसे घ्यावे? मार्ग, आणि माहिती | Manache 5 Ganpati in pune map, route

Hosted Open
5 Min Read

पुण्यातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. मुळात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवातच आणि त्याचा पाया हा पुण्यामध्ये घातला गेलेला आहे, त्यामुळेच पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा निश्चितच इतरांपेक्षा वेगळा आहे. यामध्ये कालांतराने अनेक गणेश उत्सव मंडळे निर्माण होत गेली आणि आज सध्या हजारो मंडळे पुण्यामध्ये कार्यरत आहेत.

पण त्यापैकी काही निवडक, जुने, ऐतिहासिक आणि मानाचे असे पाच गणपती पुण्यात आजही आहेत. आणि याच मानाच्या पाच गणपतींचे दर्शन कसे घ्यायचे हे आपण आजच्या ब्लॉगमध्ये वाचूया तर मग शेवटपर्यंत ब्लॉक नक्की वाचा आणि योग्य रस्ता समजून घ्या.

पुण्याच्या मनाच्या ५ गणपतींचे दर्शन कसे घ्यावे? How to get darshan of the 5 manache Ganpati of Pune?

१. दर्शनाची सुरुवात मानाचा पहिल्या गणपती कसाबा गणपती पासून करावी.
२. त्यानंतर ४५० मीटर वर असलेल्या मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेशवरी चे दर्शन घ्यावे.
३. त्यानंतर २३० मीटर वर असलेल्या गुरुजी तालीम या मानाचा तिसरा गणपतीचे दर्शन घेता येईल.
४. इथून १५० मीटर वर असणाऱ्या तुळशीबाग गणपती या मानाचा चौथा गणपती चे दर्शन घ्यावे.
५. आणि सर्वात शेवटी ९०० मीटर वरील मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपती चे दर्शन घ्यावे.
सर्व गणपतींचे दर्शन जास्तीत जास्त २.५ किलोमीटर मध्ये होईल.

पुण्याच्या 5 मानाचे गणपतीचे दर्शन कसे घ्यावे

 

पुण्याच्या 5 मानाचे गणपतीचे दर्शन मार्ग, आणि माहिती | Pune’s 5 Manache Ganapati Darshan Routes, and Information

  1. कसाबा गणपती – मानाचा पहिला गणपती | Kasaba Ganapati – Manacha pahila Ganapati

मासाहेब जिजाबाई भोसले यांच्या घराजवळ राहणाऱ्या विनायक ठकार यांच्या घराजवळ गणेशाची मूर्ती सापडली. हे मंदिर शिवाजी महाराज आणि जिजाबाई भोसले यांनी १६३९ साली बांधले होते.

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचे नेतृत्व श्री कसबा गणपती करतात. या मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतरच इतर मंडळे त्यांचे विसर्जन करू शकतात. पुण्याच्या आयुक्तांसह महापौर यांच्या तर्फे आरती होते आणि नंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होते.

शहाजीराजेंनी १६३६ साली लाल महाल बांधला त्यावेळी जिजामातांनी या गणपतीची स्थापना केली. येथील मूर्ती स्वयंभू असून प्रारंभीच्या काळात ती तांदळा एवढी होती, आता सातत्याने शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फुट उंचीची झाली आहे असे सांगितले जाते.

  1. तांबडी जोगेशवरीमानाचा दूसरा गणपती | Tambadi Jogeshwari – Manacha dusra Ganapati

तांबडी जोगेश्वरी हे दुर्गा देवीचे मंदिर आहे जिला पुणे शहराची ग्रामदेवता म्हणून ओळखले जाते. येथील वैशिष्ट्य म्हणजे, दरवर्षी गणेशोत्सवाच्या शेवटी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते आणि सलग वर्षभरात त्याची पुनर्स्थापना केली जाते.

हे मंदिर १५ व्या शतकात बांधले गेले असले तरी दुर्गादेवीची मूर्ती अजूनही शाबूत आहे. सन 2000 पर्यंत मंदिरातच गणेश मूर्तीची स्थापना केली जात होती. 2000 पासून मंदिरासमोर स्वतंत्र पेंडल लावून मूर्तीची स्थापना चांदीच्या घुमटात केली जाते.

इथल्या गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते आणि दरवर्षी मूर्तींची प्रतिष्ठापना करतात. या उत्सवाची सुरुवात १८९३ साली झाली झाली. बुधवार पेठेतील या गणेशोत्सवास श्री भाऊ बेंद्रे यांनी प्रारंभ केला. इथल्या पितळी देव्हाऱ्यात गणेश मूर्तीची स्थापना करतात, तसेच चार युगातील बाप्पांचे एकाच ठिकाणी इथे रूप पाहायला मिळतात

  1. गुरुजी तालीममानाचा तिसरा गणपती | Guruji Talim Ganapati – Manacha tisara Ganapati

गुरुजी तालीम हा पुण्यातील तिसरा मानाचा गणपती आहे. 1887 मध्ये भिकू शिंदे आणि उस्ताद नलबन या दोन हिंदू आणि मुस्लिम कुटुंबांनी प्रथम स्थापना केली. त्यामुळेच पुण्यातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून गुरुजी तालीम गणपतीचे उदाहरण दिले जाते.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी ६ वर्षे या मंडळाची स्थापना झाली होती; त्यांउळे प्लॅटिनम ज्युबिली साजरी करणारे ते पहिले मंडळ बनले.

  1. तुळशीबाग गणपती – मानाचा चौथा गणपती | Tulshi baag Ganpati – Manacha chotha Ganapati

जगप्रसिद्ध तुळशीबागेतील गणपती हा पुण्यातील चौथा मानाचा गणपती आहे. याची स्थापना 1901 मध्ये झाली होती. 1975 पासून प्रथम ग्लास फायबर ची मूर्ती स्थापन करण्याचा मान या मंडळाला मिळाला आहे. हा शहराच्या मध्यभाग आणि सर्वात गजबजलेला भाग आहे. पुतळा 13 फूट उंच आहे आणि 80 किलोपेक्षा जास्त वजनाचे दागिने घालतात. कलाकार डी.एस.खटवकर अनेक वर्षांपासून मूर्तीची सजावट करत आहेत.

  1. केसरीवाडा गणपती – मानाचा पाचवा गणपती | Kesariwada Ganpati – Manacha pachawa Ganapati

टिळकांच्या केसरी संस्थेचा केसरीवाडा गणपती हा पुण्यातील ५वा मानाचा गणपती आहे. १८९४ मध्ये स्थापन झाल्यापासून केसरीवाड्याचा गणेशोत्सव कुमठेकर रोडपासून दूर असलेल्या विंचूरकर वाड्यात आयोजित केला जायचा, जे त्यावेळचे टिळकांचे वडिलोपार्जित घर होते. त्यानंतर ते गायकवाड वाड्यात स्थलांतरित करण्यात आले, जो सध्या केसरीवाडा म्हणून ओळखला जातो.

इथे गणेशोत्सव काळात टिळकांची नियमित व्याख्याने होत असत. आज हि या गणपतीची मिरवणूक पालखीतून निघते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *