कधी कधी आपल्याला असं वाटतं का की, आयुष्यातील रोजच्या भानगडी पासून शहराच्या गर्दीतून थोडं दूर जावे, आणि निवांत राहावे किंवा फिरावे. आणि त्यातही जर तुम्ही इतिहास प्रेमी असाल आणि असं काहीतरी पहावं, जे फक्त दगडातच नाही तर इतिहासातही कोरलं गेलंय? तर एकदा तरी पुणे ते हंपी रोड ट्रिप करायलाच हवी.
पुण्यातील थकवणाऱ्या दिनक्रमातून सुटका मिळवायची असेल, आणि त्याचवेळी इतिहास, शिल्पकला आणि निसर्ग यांचं अप्रतिम कॉम्बो अनुभवायचं असेल तर हंपीपेक्षा योग्य ठिकाण दुसरं नाही असं मला वाटतंय.
हंपी म्हणजे भारताच्या वैभवशाली विजयनगर साम्राज्याची राजधानी. इथले प्रत्येक दगड, प्रत्येक मंदिर आणि प्रत्येक अवशेष तुमच्याशी काहीतरी सांगतात. “हेच ते ठिकाण जिथे कधी काळी राजा-कुमारांची गर्दी असे, व्यापार चालत असे, आणि आज फक्त अवशेष उरले आहेत” असं जाणवतं. परंतु त्या शांत अवशेषांत एक वेगळीच जादू आहे. फोटोग्राफर, इतिहासप्रेमी आणि रोड ट्रिपर्स सगळ्यांना हंपी प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही.
हंपी (Hampi) हे युनेस्कोने घोषित केलेले World Heritage Site आहे. पुण्याहून हंपीपर्यंतचा प्रवाससुद्धा रोमांचक आहे. तुम्ही कार, बाईक किंवा रेल्वेने प्रवास केला तरी रस्त्यातून दिसणारा पश्चिम महाराष्ट्राचा आणि कर्नाटकचा निसर्ग, घाट, आणि गावांची दृशे मनात घर करून जातात. या लेखात आपण पाहूया, पुण्याहून हंपीला कसं जावं, काय पाहावं, किती खर्च येतो आणि ट्रिप प्लॅन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तर शब्दरूपी प्रवासाला सुरुवात करूया चला..
हंपी कुठे आहे? (Hampi Location)
- हंपी हे कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यात आहे.
- पुण्यापासून अंदाजे ५७० ते ६०० किमी अंतरावर आहे.
- तेथे पोहोचण्यासाठी तुम्ही रस्तामार्गाने, रेल्वेने किंवा विमानाने जाऊ शकता.
पुणे ते हंपी रोड ट्रिप मार्ग (Pune to Hampi Route)
१. पुणे ते हंपी रोड ट्रिप
पुणे ते हंपी हा प्रवास म्हणजे एक अप्रतिम रोड ट्रिप अनुभव. अंदाजे ५७० ते ६०० किमी चे अंतर तुम्ही सुमारे १० ते १२ तासांत पूर्ण करू शकता. रस्ता सुंदर आहे, काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरु असू शकतात. पुणे → सातारा → कोल्हापूर → बेलगाव → हुबळी → होसपेट → हंपी असा नेहमीचा रूट घेतला जातो. NH48 आणि NH50 हे दोन्ही हायवे व्यवस्थित आणि सीनिक आहेत. मध्ये कोल्हापूरमध्ये थांबून जेवण किंवा हुबळी जवळ विश्रांती घ्यायला उत्तम पर्याय आहेत. रस्त्याने प्रवास करताना तुम्हाला दक्षिण भारताचा निसर्ग, छोटे गावं आणि पारंपरिक दृश्य बरोबरच आधुनिक गोष्टी सुद्धा पाहायला मिळतात. म्हणूनच अनेक ट्रॅव्हल लव्हर्ससाठी ही रोड ट्रिप एक अविस्मरणीय सफर ठरते.
मार्ग:
पुणे → सातारा → कोल्हापूर → बेलगाव → हुबळी → होसपेट → हंपी
एकूण अंतर: ५७० ते ६०० किमी
वेळ: अंदाजे १० ते १२ तास
रस्त्याची स्थिती: NH48 आणि NH50 मार्ग उत्तम, ४ लेन हायवेवर प्रवास चांगला होतो.
महत्त्वाचे स्टॉप:
- कोल्हापूर (महालक्ष्मी मंदिर)
- हुबळी (जेवण व पेट्रोल साठी योग्य ठिकाण)
- होसपेट (हंपीच्या अगदी जवळचे शहर)
२. रेल्वेने हंपीला जाणे
मुख्य गाड्या:
- Pune-Hubballi Express
- Vijayapura Express
- Kolhapur-Hyderabad Express (Hubballi/ Hospet वरून बदल)
होसपेट ते हंपी अंतर: १२ किमी
तुम्ही ऑटो, कॅब किंवा स्थानिक बसने जाऊ शकता.
३. विमानाने प्रवास
हंपीजवळचा प्रमुख विमानतळ म्हणजे जिंदाल विमानतळ (Jindal Vijaynagar Airport), जो हंपीपासून फक्त ३५ किमी अंतरावर आहे. हा विमानतळ छोटा असला तरी काही मर्यादित देशांतर्गत उड्डाणे इथे चालतात. सध्या पुण्याहून हंपीला थेट विमानसेवा उपलब्ध नाही, पण तुम्ही बंगळुरू किंवा हुबळी विमानतळावर सहज उड्डाण करू शकता.
बंगळुरू किंवा हुबळी येथून पुढे तुम्ही खासगी कॅब, बस किंवा ट्रेन ने हंपीकडे जाऊ शकता. हुबळीहून हंपीपर्यंतचा प्रवास सुमारे ४ तासांचा आहे, तर बंगळुरूहून सुमारे ६ ते ७ तासांचा. या प्रवासात कर्नाटकातील रम्य निसर्ग, गावे आणि ऐतिहासिक स्थळे दिसतात. त्यामुळे विमान + रोड असा हा संयोजन प्रवास आरामदायी आणि वेळ वाचवणारा ठरतो.
हंपीमध्ये पाहण्यासारखी ठिकाणे (Best Places to Visit in Hampi)
हंपी हे खरं तर एक “खुलं संग्रहालय” आहे. इथला प्रत्येक दगड, शिल्प आणि भग्नावशेष तुम्हाला विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचा अनुभव देतो. १३३६ साली स्थापन झालेलं विजयनगर साम्राज्य कधीकाळी भारतातील सर्वात समृद्ध राज्यांपैकी एक होतं. आज या साम्राज्याचे अवशेष म्हणजेच हंपी. जिथे तुम्हाला इतिहास, वास्तुकला, निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.
इथे एकूण ५०० हून अधिक ऐतिहासिक ठिकाणं, मंदिरे, बाजारपेठा, राजवाडे आणि बुरुज आहेत. खाली काही प्रमुख स्थळांची सविस्तर माहिती दिली आहे.
१. विरुपाक्ष मंदिर (Virupaksha Temple)
हंपीचं हृदय म्हणावं असं ठिकाण म्हणजे विरुपाक्ष मंदिर. हे मंदिर भगवान शिव यांचे आहे आणि ७व्या शतकात उभारले गेले असल्याचं मानलं जातं. मंदिराचा १६० फूट उंच गोपुरम (मुख्य मनोरा) दूरवरूनच दिसतो आणि त्यावर कोरलेली सूक्ष्म शिल्पं आकर्षक आहेत. मंदिराच्या परिसरात लहान देवळं, गोदामं आणि हत्ती साठी राहण्याची ठिकाणही आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात विरुपाक्ष उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. हे ठिकाण फोटोग्राफर्ससाठी आणि धार्मिक वातावरण अनुभवू इच्छिणाऱ्यांसाठी योग्य आहे असे आपण म्हणू शकतो.
२. विट्ठल मंदिर आणि दगडी रथ (Vittala Temple & Stone Chariot)
हंपीचं सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे विट्ठल मंदिर. हे मंदिर भगवान विष्णूच्या विठ्ठल अवताराला समर्पित आहे. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे एक संपूर्ण दगडात कोरलेला रथ (Stone Chariot) जो आता हंपीचं प्रतीक बनलं आहे.
या मंदिरातील संगीत देणारे स्तंभ (Musical Pillars) हा एक चमत्कार आहे. प्रत्येक स्तंभावर हलकासा ठोका मारला तरी वेगवेगळे संगीत सूर ऐकू येतात. संध्याकाळच्या वेळेला मंदिर परिसरात पडणारा सोनेरी प्रकाश अप्रतिम दृश्य तयार करतो.
३. हंपी बाजार आणि पुष्करणी (Hampi Bazaar & Pushkarini)
विरुपाक्ष मंदिरासमोरच पसरलेला जुना हंपी बाजार (Hampi Bazaar) एकेकाळी साम्राज्याचा व्यापारी केंद्र होता. इथे सोनं, रत्ने, मसाले आणि वस्त्रांची देवाणघेवाण होत असे. आजही या बाजारात तुम्हाला जुन्या दगडी ओट्यांचे अवशेष दिसतात, जिथे व्यापारी आपली मालमत्ता ठेवत असत.
बाजाराच्या शेवटी असलेली पुष्करणी अत्यंत सुंदर आहे. या तलावात मंदिराचं प्रतिबिंब पडताना पाहणं हा अनुभव खासच असतो. फोटोग्राफी, व्हिडिओ आणि ड्रोन शॉट्ससाठी हे परिसर अतिशय लोकप्रिय आहे. ड्रोन उडवण्याआधी परवानगी घ्यावी लागते.
४. रॉयल एरिया (Royal Enclosure)
हंपीतील सर्वात मोठा आणि प्रभावशाली भाग म्हणजे रॉयल एरिया, म्हणजेच विजयनगरच्या राजांचे निवासस्थान आणि दरबार परिसर. इथे तुम्हाला महानवमी डिब्बा (Mahanavami Dibba) नावाचा विशाल मंच दिसतो, जिथून राजा सैन्याची पाहणी करत असे. इथल्या भिंतींवर कोरलेल्या युद्धदृश्य आणि उत्सवांचे शिल्पं त्या काळच्या जीवनशैलीचा अनुभव देतात.
५. कमळ महाल आणि हत्ती शाळा (Lotus Mahal & Elephant Stables)
हा परिसर हंपीच्या सर्वाधिक Instagram-worthy ठिकाणांपैकी एक आहे.
Lotus Mahal ही इमारत आपल्या कमळाच्या आकाराच्या घुमटामुळे प्रसिद्ध आहे.
ती राजघराण्याच्या स्त्रियांसाठी बनवली गेली होती, आणि तिची रचना हि इंडो-इस्लामिक शैलीचा अप्रतिम नमुना आहे. तिच्या शेजारीच Elephant Stables म्हणजे हत्ती ठेवण्याची भव्य जागा आहे, मोठमोठे घुमट आणि प्रचंड आकार पाहून प्रत्येकजण थक्क होतो.
६. मतंगा टेकडी (Matanga Hill)
हंपीचा सर्वोत्तम व्ह्यूपॉइंट म्हणजे मतंगा टेकडी. ही टेकडी शहराच्या मध्यभागी असून इथून हंपीचा संपूर्ण परिसर, मंदिरं, नदी आणि अवशेष एकाच फ्रेममध्ये दिसतात. सकाळच्या सूर्योदयाच्या वेळी किंवा संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळी इथलं दृश्य मन मोहून टाकतं. फोटोग्राफर आणि ट्रेकिंग लव्हर्ससाठी हे ठिकाण अवश्य भेट देण्यासारखं आहे.
७. हेमाकुटा टेकडी (Hemakuta Hill)
विरुपाक्ष मंदिराजवळच असलेली हेमकूट टेकडी अनेक लहान देवळांनी भरलेली आहे. येथून सूर्यास्ताचं दृश्य अप्रतिम दिसतं, आणि संध्याकाळच्या वेळी हा परिसर सोनेरी प्रकाशाने न्हाऊन निघतो. शांत वातावरण, पसरलेली मंदिरे आणि दूरवरून दिसणारा हंपी बाजार, बस्स हा अनुभव खूपच कडक असतो.
८. अंजनाद्री टेकडी (Anjanadri Hill)
हनुमानाचं जन्मस्थान मानली जाणारी ही टेकडी आनेगुंडी गावात, तुंगभद्रा नदीच्या पलीकडे आहे. टेकडीवर जाण्यासाठी सुमारे ५५० पायऱ्या आहेत, आणि वर गेल्यावर तुम्हाला सुंदर दृश्य दिसतं. शिखरावर हनुमान मंदिर आहे, आणि सकाळी लवकर किंवा संध्याकाळी इथून हंपीचा परिसर सोनेरी रंगात न्हाऊन निघालेला दिसतो.
९. किंग्स बाथ (Queen’s Bath)
हे ठिकाण म्हणजे राजघराण्याचं आलिशान स्नानगृह. अंदरून संगमरवरी कोरीवकाम आणि बाहेरून साधं दगडी बांधकाम — यामुळे याचं आर्किटेक्चर अनोखं आहे. असं म्हणतात की, इथे राजघराण्यातील स्त्रिया आणि पाहुण्यांसाठी स्नान व्यवस्था होती.
१०. हझारारामा मंदिर (Hazara Rama Temple)
हे मंदिर विशेषतः त्याच्या भिंतींवरील कोरीव रिलीफ शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. रामायणातील अनेक प्रसंग इथल्या दगडी भिंतींवर कोरलेले दिसतात. राजघराण्याच्या वैयक्तिक पूजेचं हे ठिकाण असल्याचं मानलं जातं.
११. तुंगभद्रा नदी किनारा (Tungabhadra River Bank)
हंपीतून वाहणारी तुंगभद्रा नदी हा या संपूर्ण ट्रिप चा आत्मा म्हणावा असा भाग आहे. नदीकिनाऱ्यावरच्या पायऱ्या, दगडी घाट आणि बोटराईड हे अनुभव अविस्मरणीय असतात. स्थानिक कोरकल नावाच्या गोल बोटींमध्ये फेरफटका मारणं ही एक मजेदार गोष्ट आहे ती करायला विसरू नका.
१२. अचलिंगटा बझार, सुग्रीवाची गुहा, आणि रघुनाथ मंदिर
ही कमी प्रसिद्ध पण ऐतिहासिक ठिकाणं आहेत जी Ramayana Circuit चा भाग मानली जातात. सुग्रीवाची गुहा ही हनुमान आणि सुग्रीव यांच्या कथेशी संबंधित आहे, आणि रघुनाथ मंदिरातून तुंगभद्राचं दृश्य अप्रतिम दिसतं. जर तुमच्या कडे पुरेसा वेळ असेलतर इथे नक्की भेट द्या.
फोटोग्राफी आणि सोशल मीडियासाठी स्पॉट्स
- स्टोन चॅरियट (Vittala Temple)
- मतंगा हिलवरील सनसेट पॉईंट
- विरुपाक्ष मंदिराची शिखरे
- तुंगभद्रा नदीकिनारा
- Lotus Mahal आणि Elephant Stable
राहण्यासाठी ठिकाणे (Where to Stay in Hampi)
१. हंपी व्हिलेज (Hampi Bazaar area)
- बजेट ट्रॅव्हलर्ससाठी योग्य.
- होमस्टे, कॅफे आणि बॅकपॅकर्स हॉस्टेल्स उपलब्ध.
२. होसपेट शहर
- थोडं आधुनिक वातावरण आणि चांगली हॉटेल्स.
३. नदीपलीकडचा भाग (Virupapur Gaddi / Hippie Island)
- शांत, नैसर्गिक आणि ट्रॅव्हल व्हाईबने भरलेला परिसर.
- पण अलीकडच्या काळात काही रिसॉर्ट्सना बंदी असल्याने आधी तपासून जा.
खाण्यासाठी ठिकाणे (Food in Hampi)
- Mango Tree Restaurant – पारंपरिक साऊथ इंडियन व थोडं वेस्टर्न मेन्यू.
- Laughing Buddha Café – नदीकिनाऱ्यावर सुंदर दृश्यासह.
- Gopi Guest House Café – प्रवाशांमध्ये लोकप्रिय.
तुम्हाला इडली, दोसा, उत्तप्पा, फिल्टर कॉफी या स्थानिक पदार्थांचाआनंद घ्यायलाच हवा.
हंपी ट्रिपचा अंदाजे खर्च (Hampi Trip Cost from Pune)
| घटक | खर्च (प्रति व्यक्ती अंदाजे) |
|---|---|
| फ्युएल (रोड ट्रिप) | ₹4500 – ₹6000 |
| राहणे | ₹800 – ₹3000 प्रति रात्र |
| भोजन | ₹500 – ₹800 प्रति दिवस |
| पर्यटन शुल्क / तिकीट | ₹50 – ₹200 |
| एकूण अंदाज | ₹7000 – ₹12000 (२-३ दिवसांची ट्रिप) |
टीप: इथे ट्रिप चा खर्च हा एक मध्यम ऍव्हरेज काढून दिला आहे. तुम्ही कोणत्या प्रकारच्या गाडीने जाताय (CNG/पेट्रोल/डिझेल), कुठे राहता, कधी आणि कोणत्या सिजन मध्ये जाता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, शिवाय toll हि असतोच.
हंपीला भेट देण्यासाठी योग्य वेळ (Best Time to Visit Hampi)
ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी सर्वात उत्तम मानला जातो. या काळात हवामान थंडगार आणि फोटोग्राफीसाठी परिपूर्ण असते. मार्च ते मे मध्ये उष्णतेमुळे प्रवास टाळावा.
रोड ट्रिप लव्हर्ससाठी टिप्स (Hampi Road Trip Tips from Pune)
- पुण्याहून सकाळी लवकर निघा, दुपारी हुबळीला पोहोचा.
- रस्त्यावरील छोट्या धाब्यांवर स्थानिक खान्याचा आस्वाद घ्या.
- हंपी परिसरात पेट्रोल पंप मर्यादित आहेत, म्हणून टाकी भरून ठेवा.
- हंपीमध्ये ड्रोन शूटिंगसाठी परवानगी आवश्यक आहे.
- स्थानिक गाईड घेतल्यास तुम्हाला इतिहासाची खरी मजा येते.
जवळची पर्यटनस्थळे (Nearby Places to Visit from Hampi)
- आनेगुंडी (Anegundi): हंपीच्या विरुद्ध किनाऱ्यावरचं प्राचीन गाव.
- तुंगभद्रा धरण (Tungabhadra Dam): होसपेटजवळ सुंदर गार्डनसह.
- बदामी, ऐहोळे, पट्टडकल: दक्षिण भारतातील प्राचीन मंदिरांची शिल्पकला अनुभवण्यासाठी.
काही सतत विचारले जाणारे प्रश्न
प्र. १: पुण्याहून हंपीला जाण्यास किती वेळ लागतो?
> अंदाजे १० ते १२ तास रोडने, रेल्वेने सुमारे १४-१५ तास.
प्र. २: हंपीला किती दिवस पुरेसे आहेत?
> २ ते ३ दिवसांत तुम्ही प्रमुख स्थळं पाहू शकता.
प्र. ३: हंपीमध्ये मराठी गाईड मिळतो का?
> हो, होसपेट किंवा हंपी बाजार परिसरात काही गाईड मराठी किंवा हिंदी समजतात.
प्र. ४: हंपीमध्ये कार घेऊन जाता येते का?
> हो, पण काही क्षेत्रात गाडी पार्किंगनंतर चालत किंवा सायकलने जावं लागतं.
प्र. ५: पुण्याहून हंपीला कसं जावं?
> पुणे ते हंपी सुमारे ५७० किमी अंतरावर आहे. तुम्ही कार, बाईक किंवा रेल्वेने होसपेटपर्यंत प्रवास करून तिथून १२ किमी अंतरावर असलेल्या हंपीला सहज पोहोचू शकता. विमानाने जायचं असल्यास हुबळी किंवा बंगळुरू विमानतळ सर्वोत्तम पर्याय आहेत.
प्र ६: हंपीमध्ये काय पाहावं?
> विरुपाक्ष मंदिर, विट्ठल मंदिर आणि स्टोन चॅरियट, कमळ महाल, हत्ती शाळा, मतंगा टेकडी आणि तुंगभद्रा नदी ही हंपीतील प्रमुख ठिकाणं आहेत.
थोडक्यात पण महत्वाचे
पुण्याहून हंपीला केलेली ट्रिप म्हणजे इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांचं सुंदर मिश्रण. विजयनगर साम्राज्याचे वैभव, पाषाणातील अप्रतिम शिल्पं आणि शांत वातावरण हे सर्व तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जातात. जर तुम्ही रोड ट्रिप लव्हर किंवा ऑफबीट डेस्टिनेशन सीकर असाल, तर “हंपी ट्रिप फ्रॉम पुणे” तुमच्या पुढच्या प्रवास यादीत असायलाच हवी.
तुम्ही हंपीला गेले आहात का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद

