कोल्हापूर पाहाण्यासारखी ठिकाणे:
पुणे ते कोल्हापूर दोन दिवसांची ट्रिप हि तुलनेने कोल्हापूर बघण्यासाठी कमी असेल, परंतु तरीही तुम्ही काही महत्वाची ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. त्यासाठी खाली दोन्ही प्लॅन्स दिले आहेत. पहिला २ दिवसांचा आहे. व त्यानंतर खाली पूर्ण कोल्हापूर व्यवस्थित बघण्यासाठी चा प्लॅन दिला आहे.
पुणे (नवले ब्रिज/कात्रज) ते कोल्हापूर अंतर: २३५ किमी (वेळ ३ ते ५ तास)
२ दिवसांचा पुणे ते कोल्हापूर ट्रिप प्लॅन:
दिवस 1:
- सकाळी लवकर पुण्याहून कोल्हापूरला रस्त्याने निघणे. ट्रॅफिक परिस्थितीनुसार नवले ब्रिज किंवा कात्रज पासून प्रवासाला अंदाजे 3 ते ५ तास लागतात.
- दुपारी कोल्हापुरात पोहोचा आणि तुमच्या हॉटेलमध्ये चेक इन करा. त्यानंतर मिसळ पाव किंवा कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा यांसारखे अस्सल कोल्हापुरी पदार्थ खाऊन पहा. जर हे पदार्थ खाल्ले नाहीत तर खरी कोल्हापुरी चव कळणार नाही. कोल्हापूरच्या बाहेर हॉटेल मध्ये एखाद्या डिशला कोल्हापुरी नाव देऊन उगाचच भयंकर तिखट बनवतात याची जाणीव होईल तुम्हाला.
- त्यानंतर जगप्रसिद्ध साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले महालक्ष्मी मंदिराला भेट द्या. हे मंदिर प्रथम 7 व्या शतकात बांधले गेले आहे. अनेक पुराणांमध्ये मंदिराचा उल्लेख आहे.
- इथून जवळ असलेल्या मंदिराजवळील स्थानिक बाजारपेठा फिरून पहा, जेथे तुम्ही कोल्हापुरी चप्पल, दागिने आणि हस्तकला वस्तू खरेदी करू शकता.
- खरेदीनंतर २ किमी वर असलेल्या प्रसिद्ध रंकाळा तलावाभोवती फिरण्याचा आनंद घ्या, जे शांत वातावरण आणि सुंदर परिसरासाठी प्रसिद्ध आहे. जर उपलब्ध असल्यास आपण तलावावर बोट राईड देखील करू शकता.
- त्यानंतर कोल्हापूर सिटी मधील टाउन हॉल हे जुन्या वस्तूंचे संग्रहालय किंवा श्री छत्रपती शाहू संग्रहालय पाहू शकता. आणि रात्री मस्त पुन्हा चमचमीत तांबडा रस्सा पिऊन झोपून जा.
दिवस २:
- सकाळी लवकर उठून तुमच्या दिवसाची सुरुवातच “न्यू पॅलेस” ला भेट देऊन करा, जिथे कोल्हापूरच्या राजघराण्यातील कलाकृती आणि संस्मरणीय वस्तू प्रदर्शित करणारे संग्रहालय आहे.
- संग्रहालय एक्सप्लोर करण्यासाठी आणि प्रदेशाचा इतिहास आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी काही वेळ घालवणे गरजेचे आहे. पण त्यामुळे तुम्हाला खूप समाधान लाभेल.
- संग्रहालय पाहून झाल्यावर कोल्हापूरपासून 20 ते २३ किलोमीटर अंतरावर असलेल्या पन्हाळा किल्ल्याकडे जा. हा ऐतिहासिक किल्ला आजूबाजूच्या लँडस्केपची अतिशय नेत्रदीपक दृश्ये देतो आणि त्याच बरोबर त्याला महत्त्वपूर्ण ऐतिहासिक महत्त्व देखील आहे.
- इथून तुम्ही जवळच असणाऱ्या प्रसिद्ध जोतिबा मंदिराला हि भेट देऊ शकता. मंदिराचे पावित्र्य आणि शांतता आणि डोंगरदऱ्या पाहून एक वेगळेच मानसिक समाधान मिळते. जर वेळ सेल तर तुम्ही इथून पुणे मलकापूर ला जाऊन प्रसिद्ध आणि तितकाच खडतर आंबा घाट पाहू शकता.
- या नंतर कोल्हापुरला परत या आणि स्थानिक रेस्टॉरंटमध्ये जेवण करा, अधिक कोल्हापुरी स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या. आणि कोल्हापूरहून सायंकाळी पुण्याकडे प्रस्थान करा. रात्री पुण्याला पोहोच.
टीप: हा प्रवास कार्यक्रम दोन दिवसांत कोल्हापुरातील प्रमुख ठळक ठिकाणे कव्हर करून त्वरित भेट देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. तुमच्याकडे अतिरिक्त वेळ असल्यास, शहर आणि जवळपासची आकर्षणे पूर्णपणे एक्सप्लोर करण्यासाठी तुमचा मुक्काम वाढवण्याची शिफारस केली जाते. त्यासाठी खाली संपूर्ण पुणे तो कोल्हापूर ट्रिप प्लॅनिंग लिहिले आहे.
पुणे – कोल्हापूर ट्रिप प्लॅनिंग आणि पर्यटन स्थळे योग्य पद्धतीने फिरण्याचा प्लॅन:
पहिला दिवस:
पुणे ते कोल्हापूर प्रवास, साधारण ४ ते ५ तास लागतात.
- सकाळी लवकर पुण्याहून निघालं तर ११ पर्यंत आपण कोल्हापुरात पोहोचू, हॉटेल वर चेक इन करून तुम्ही फ्रेश होऊन दुपारनंतर सिटी फिरू शकता, महालक्ष्मी मंदिरात भेट देऊ शकता. तिथे तुम्हाला जुना राजवाडा आणि भवानी मंडप सुद्धा पाहता येईल. आणि त्या यानंतर तुम्ही रंकाळा तलाव भेट देऊ शकता.
दिवस दुसरा:
- सकाळी ८ वाजता निघून कोल्हापूर पासून ६० ते ७० किमी वर असलेल्या राधानगरी डॅम आणि दाजीपूर अभयारण्य याला भेट देता येईल. या साठी तुम्हाला पूर्ण एक दिवस लागेल तर मग त्याची मजा घेता येईल.
- या दिवशी राधानगरी डॅम, दाजीपूर अभयारण्य, काळम्मावाडी डॅम, राऊतवाडीचा धबधबा, तुळशी डॅम, फोंडा घाट इ. ठिकाणे आरामात पाहता येतील.
दिवस तिसरा:
– या दिवशी तुम्ही जोतिबा दर्शन, आणि त्या बाजूचे सर्व ठिकाणे करू शकता.
– यामध्ये सकाळी आधी जोतिबाचे दर्शन घेऊन प्रसन्न होऊन ऐतिहासिक पन्हाळगडावर जाऊ शकता. गड पाहून झाल्यावर तिथून नयनरम्य आंबा घाटात जाऊन सूर्यास्त पाहू शकता.
दिवस चौथा:
कोल्हापूर ते नरसोबाची वाडी अंतर हे ५० किमी आहे.
या दिवशी तुम्ही कोल्हापूर जवळील प्रसिद्ध कणेरी मठ पाहू शकता.
– त्यानंतर कृष्णा आणि पंचगंगा नदी तीरावर वसलेले श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे जाऊन दत्ताचे दर्शन घेऊ शकता.
– त्यानंतर जगप्रसिद्ध खिद्रापूर चे कोपेश्वर मंदिर पाहू शकता. हे मंदिर श्री क्षेत्र नृसिंहवाडीयेथून जवळ आहे.
दिवस पाचवा:
या दिवशी तुम्ही कोल्हापूर शहरातील राहिलेली सर्व ठिकाणे तुम्ही बघून घेऊ शकता, त्याचसोबत खरेदी सुद्धा करू शकता. आणि त्यानंतर संध्याकाळी पुण्याला परतीचा प्रवास करू शकता.