खूपच कमी लोकांना माहीत असलेली महाड तालुक्यातील कोल गावातील अपरिचित बौद्ध लेणी.
महाड तालुक्यात कोल हे गाव आहे या गावात प्राचीन बौद्ध लेणी आहेत इथे एकूण ७ लेणी आहेत. या गावात बौद्धवाडी च्या वरच्या डोंगरात ऐतिहासिक बौद्ध लेण्या आहे या लेण्यांचा इतिहास पाहता सातवाहन काळातील ब्राह्मी लिपी मधील शिलालेख असून लेखामध्ये कोणत्याही ज्ञात राजवंश उल्लेख केलेला नाही तरी साधारण भाषा लिपी व लेण्यांचे बांधकाम शैलीवरून हि लेणी सातवाहन काळात कोरलेली आहेत यात शंका नाही.या लेण्यांचा इतिहास पाहता हि सातवाहन कालीन लेणी आहेत गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या अधिपत्याखाली अपरांत संघराज्य होते.
नहपान राजाकडून अपरांत गौतमी पुत्र सातकर्णी ने आपल्या अधिपत्याखाली घेतले होते.याच वेळी भारतात बौद्ध धम्म हि जोमाने वाटचाल करीत होता सम्राट अशोकाचे मांडलिक राजे म्हणून सातवाहन राजांचा उल्लेख सापडतो आणि अशोकाच्या काळात महाराष्ट्रात बौद्ध धम्म प्रगतीच्या उंच शिखरावर होता अगदी इसवी सन दहाव्या शतकानंतर हि कोल लेण्याची बांधणी सातवाहन काळात असून ती भिक्षु ना निवास करण्यासाठी बांधलेली लेणी आहे शिवाय हा एक व्यापारी मार्ग देखील असल्याने या ठिकाणी व्यापाऱ्यांना विसावा घेण्यासाठी देखील या लेण्यांचा वापर केला जात असावा कारण यासाठी जवळपास सहा भिक्खू निवास आहेत.
या लेण्या बांधण्यामागाचे कारण बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे भिक्खू प्रवास करीत असतात त्याच्या राहण्याची व्यवस्था म्हणून हि लेणी कोरलेली आहेत या लेण्यांवर असणाऱ्या लेखात लेणी कोरण्यासाठी दान देणाऱ्या लोकांची नाव देण्यात आली आहेत.
सदर सर्व लेण्या पाहिल्यानंतर हि बौद्ध धम्माच्या भिक्खू साठी बांधण्यात आलेली बौद्ध लेणी आहेत या लेण्यांची बांधणी एकाच दगडात कोरलेली आहेत कातळात हि लेणी कोरलेली आहेत याच्या बाजूच्याच डोंगरात अजून काही लेणी आहेत
शिवाय कोल लेणी हि प्राचीन लेणी असून सातवाहन कालीन इतिहास आहे त्यांचा पुरातन वारसा मौल्यवान आहे
बौद्ध लेण्यांची अशी अवस्था कायम होत राहिलेली आहे कारण लोकांच्या मनात असणारे अज्ञान आणि यामुळेच हि लेणी आजवर अशीच पडलेली आहेत. हि लेणी उपेक्षित राहू नये म्हणून याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
– महाड रायगड माझं गाव माझा अभिमान