वासोटा किल्ला ट्रेक संपूर्ण माहिती | Vasota fort information in Marathi

Hosted Open
8 Min Read

Vasota fort information in marathi: सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात स्थित असलेला वासोटा किल्ला हा इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध आहे. कोयना म्हटल्यावर लगेचच आपल्या डोळ्यासमोर पाणी आणि घनदाट जंगल येते. याच जंगलात एक “वाघ” म्हणजेच वासोटा किल्ला ठाण मांडून बसलेला आहे, आणि अश्या या किल्ल्याला किमान एकदा तरी भेट देऊन तेथील वैभव अनुभवले पाहिजे.

ज्ञानेश्वरीमध्ये “वसौटा” असा शब्द आढळतो, ज्याचा अर्थ “आश्रयस्थान” असा सांगितला जातो. म्हणूनच, या जंगलातील वाघाला आश्रय देणारा म्हणून वासोटा हे नाव पडले असावे.

वासोटा किल्ल्यावर पोहोचण्यासाठी तीन प्रमुख मार्ग आहेत. पहिला मार्ग साताऱ्यातील कास पठाराजवळच्या बामणोली गावातून आहे, जिथून जलमार्गे लाँचने पाण्यातून प्रवास करत कोयना धरणाचा शिवसागर जलाशय पार करून किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. दुसरा मार्ग कोकणातील खेड जवळच्या चोरवणे गावातून नागेश्वर गुहेमार्गे जातो. तिसरा मार्ग चिपळूणच्या तिवरे घाटातून रेडे घाट मार्गे जातो. पहिल्या मार्गापेक्षा या दोन मार्गांचा प्रवास अत्यंत खडतर असतो, परंतु सर्व मार्ग जंगलातूनच जात असल्याने ज्यांना असे काहीतरी उच्च कोटीचे धाडस करायचे असेल त्यांनी हा मार्ग नक्की अनुभवावा.

जंगलातून जाताना आजूबाजूची हिरवळ, झाडे, वेली, फुले, फुलपाखरे आणि पक्ष्यांच्या मधुर आवाज याने मनाला आनंद मिळतो. बोटीतून प्रवास करत जाताना हळूहळू घनदाट करण्याची जाणीव व्हायला वेळ लागत नाही. बोटीने उतरून चालत जाताना वाटेतच एका स्वच्छ पाण्याच्या ओढा लागतो, जिथे हनुमानाचे सुंदर शिल्प आपल्यामध्ये उत्साह भरते. साधारण दीड ते दोन तासांच्या पायपिटीनंतर आपण वासोटा किल्ल्यावर पोहोचतो.

गडाचा आकार शिवलिंगासारखा असून, आवश्यक तिथे तटबंदी आहे. किल्ल्यावर चुन्याच्या घाण्या, पाण्याचे टाके, वाड्याचे अवशेष, असून काही ठिकाणी इमारतींचे अवशेष दिसतात. किल्ल्याच्या दक्षिण टोकावर ‘बाबुकडा’ नावाचा सरळसोट कडा आहे, तर माचीवर काळकाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या एका बाजूला घनदाट अरण्य, तर दुसऱ्या बाजूला खोल पाताळत गेलेले बेलाग कडे आहेत. यामुळे या किल्ल्याला वनदुर्ग असंही म्हटलं जातं.

वासोटा किल्ला शिलाहार राजांनी बांधला. त्यानंतर तो काही काळ शिर्के मोरे घराण्याच्या ताब्यात होता. इ.स. १६६० मध्ये जावळी खोर्‍यासह हा किल्ला स्वराज्यात समाविष्ट झाला आणि शिवाजी महाराजांनी याचे नाव ‘व्याघ्रगड’ असे ठेवले. हा किल्ला बराच काळ तुरुंग म्हणून वापरला गेला.

वासोटा किल्ल्याचे भौगोलिक स्थान आणि दुर्गमता: Vasota fort information in Marathi

सह्याद्रीची मुख्य रांग दक्षिणोत्तर दिशेने पसरलेली आहे आणि या रांगेस समांतर घेरा-दातेगडाची रांग आहे. या दोन पर्वतरांगांच्या मधून कोयना नदी वाहते याला जावळीचे खोरे असेही म्हणतात. वासोटा किल्ला याच जावळीच्या खोर्‍यात, या दोन्ही रांगेच्या दरम्यान वसलेला आहे. येथे बांधलेले कोयना धरण आणि त्याचा ‘शिवसागर’ जलाशय किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पसरलेला आहे, ज्यामुळे परिसराला एक अद्वितीय दृश्य प्राप्त होते. पूर्वेला घनदाट जंगल आणि पश्चिमेला कोकणातील बेलाग कडे या मुळे किल्ला सहज प्रवेश करण्यास कठीण आहे. यामुळे वासोटा किल्ल्याची नैसर्गिक दुर्गमता खूपच वाढली आहे.

वासोटा किल्ल्यावर पोहोचण्याचे ३ मार्ग: 3 ways to reach Vasota Fort

वासोटा किल्ल्यावर पोहोचण्यासाठी तीन प्रमुख मार्ग उपलब्ध आहेत: Vasota fort information in Marathi

१) बामणोली मार्ग: सातारा जिल्ह्यातील कास पठाराजवळच्या बामणोली गावातून हा मार्ग सुरू होतो. या मार्गातून बोटीने शिवसागर जलाशय पार करून किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. हा सर्वात प्रसिद्ध मार्ग असून बहुतांशी लोक याच मार्गाचा वापर करतात.

२) चोरवणे मार्ग: कोकणातील खेड जवळील चोरवणे गावातून नागेश्वर गुहेकडे जाणारा हा मार्ग आहे. हा मार्ग खडतर असल्यामुळे साहसप्रियांना हा मार्ग आवडतो. नवख्या आणि जंगलाची माहिती नसणाऱ्या लोकांनी या मार्गाचा वापर करणे शक्यतो टाळावे.

३) रेडे घाट मार्ग: चिपळूणच्या तिवरे घाटातून रेडे घाट मार्गे हा मार्ग पार करावा लागतो. हा देखील खडतर असला तरी जंगलातून जात असल्याने या मार्गावर निसर्गाचा पुरेपूर आनंद आणि अनुभव घेता येतो.

पहिल्या मार्गापेक्षा दुसरा आणि तिसरा मार्ग अत्यंत खडतर आहेत, परंतु सर्व मार्ग जंगलातूनच जात असल्यामुळे ट्रेकिंगचा अनुभव अनोखा आणि रोमांचकारी असतो.

वासोटा ट्रेकिंग अनुभव आणि निसर्गाचे सौंदर्य: Vasota trekking experience and beauty of nature

वासोटा किल्ल्यावर पोहोचण्याचा प्रवासच एक अविस्मरणीय अनुभव आहे. जंगलातून जाताना निसर्ग व चौबाजूंची हिरवाई, विविध झाडे, वेली, फुले, फुलपाखरे आणि पक्ष्यांच्या मधुर आवाजांचा आनंद मिळतो. शिवसागर जलाशय पार करून झाल्यानंतर बोटीतुन उतरल्यावर चालत जाताना पहिल्यांदा स्वच्छ पाण्याच्या ओढा लागतो, ज्यामुळे मार्ग अधिकच रोमांचक बनतो. हनुमानाचे सुंदर शिल्प या मार्गात दिसून येते, ज्यामुळे मनाला उभारी मिळते. मजलंदरमजाल करत साधारण दीड ते दोन तासांच्या पायपीटीनंतर वासोटा किल्ल्यावर पोहोचता येते. किल्यावर जाण्यासाठी महाराष्ट्र वन विभागाची पूर्व परवानगी घ्यावी लागते.

वासोटा किल्ल्याची बांधणी आणि वैशिष्ट्ये: Construction and Features of Vasota Fort

वासोटा किल्ल्याचा आकार शिवलिंगासारखा असून, आवश्यक तिथे तटबंदी करण्यात आली आहे. किल्ल्यावर चुन्याच्या घाना, पाण्याचे टाके, वाड्याचे अवशेष, दिसतात. किल्ल्याच्या दक्षिण टोकावर ‘बाबुकडा’ नावाचा सरळसोट कडा आहे, तर माचीवर काळकाई देवीचे ठाणे आहे. किल्ल्याच्या एका बाजूला घनदाट अरण्य, तर दुसऱ्या बाजूला खोल पाताळत गेलेले बेलाग उंच कडे आहेत, ज्यामुळे या किल्ल्याला ‘वनदुर्ग’ असेही म्हटले जाते.

किल्ल्यावर जांभ्या दगडाने बांधलेले एक लहानसे चंदकाईचे मंदिर व स्वच्छ पाण्याची दोन टाकी आहेत. गडाच्या पश्चिमेस ताई तेलिणीचा कडा प्रसिद्ध असून सु. ४५७ मी. उंच लांबट भिंतीसारखा आहे. पूर्वी देहांताची शिक्षा झालेल्या कैद्यांचा कडेलोट तेथून करीत.

माथ्याच्या उत्तरेकडील एक सुळका सोंडेप्रमाणे लांबवर पसरला आहे. ही किल्ल्याची माची होय. तिला काळकाईचे ठाणे म्हणतात. तिच्या पोटात एक गुहा आहे. तिथे नागेश्वर नावाचे शिवलिंग असून त्यावर गुहेच्या छतातून पाणी झिरपत असते. त्या ठिकाणी शिवपार्वतीची एक सुबक मूर्ती आहे. अलीकडे संशोधकांना तेथे बाराव्या शतकातील काही वास्तूंचे जोते, विशेषतः नहाणीघर व कोठार यांच्या खुणा आढळल्या तसेच सोळाव्या शतकातील काही हत्यारेही उपलब्ध झाली आहेत.

वासोटा किल्याच्या भोवतीचे पर्यावरण आणि जैवविविधता: Environment and Biodiversity around Vasota Fort

वासोटा किल्ल्याच्या परिसरातील जंगल हे कोयना अभयारण्याचा एक भाग आहे, जिथे जैवविविधता खूपच उत्तम आहे. येथे अनेक वन्यजीव आणि पक्षी आढळतात, ज्यामुळे वन्यजीवप्रेमीं आणि फोटोग्राफीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. या अरण्यात बिबट, सांबर, विविध प्रकारचे सरडे आणि अनेक दुर्मिळ पक्षी प्रजाती, तसेच हिंस्र वन्य प्राणी देखील आढळतात. या ठिकाणी पर्यटकांनी विशेषतः पर्यावरण संवर्धनाची काळजी घ्यावी. कचरा, प्लास्टिक इत्यादी फेकू नये.

वासोटा किल्ल्याची महत्त्वाची माहिती: Important information about Vasota Fort

उंची: समुद्रसपाटीपासून अंदाजे ११९० मीटर (३९०० फूट)

प्रवेश शुल्क: कोयना अभयारण्य क्षेत्रात असल्याने प्रवेशासाठी वनखात्याचा परवाना आवश्यक आहे.

ट्रेक श्रेणी: मध्यम ते कठीण (विशेषतः पावसाळ्यात निसरडं होतं)

पर्यटकांसाठी सर्वोत्तम काळ: नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ वासोटा किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.

वासोट्याच्या किल्ल्याबद्दल थोडक्यात: Vasota fort information in Marathi

१) वासोटा किल्ला हा निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी आणि ट्रेकिंग प्रेमींसाठी एक अप्रतिम ठिकाण आहे.

२) घनदाट अरण्यात लपलेला हा किल्ला दुर्गम असला तरी तो अद्वितीय आहे.

३) शिवसागराचे शांत पाणी, जंगलाचा आवाज, आणि सह्याद्रीच्या पर्वतांचे भव्य दृश्य हे अनुभवण्यासाठी वासोटा हा एक उत्तम पर्याय आहे.

४) वाटेत येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा सामना करत, निसर्गाच्या कुशीत रमताना हा किल्ला पाहणे एक पर्वणीच.

५) वन विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय जाऊ नये.

६) रस्ता माहित नसेल तर सोबत गाईड किंवा स्थानिकांना सोबत घेऊन जावे.

७) इतर किल्यांच्या परिथिती पेक्षा या किल्ल्याची परिस्थिती वेगळी असल्याने अति उत्साहीपणा जीवावर बेतू शकतो.

८) सर्वात महत्वाचे, तिथे गेल्यानंतर स्वच्छता राखावी, कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये.

 

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *