जीव गुदमरतोय आता…
खरं तरं माणसाला कुठल्याही गोष्टीचा कहर करण्याची सवयच आहे स्वतःच्या सुखासाठी इतरांच्या सुखाचा विचार न करणारी मनुष्य व्रुत्ती एक दिवस स्वतः लाच गिळून टाकणार हे नक्की वाढते इंधनाचे भाव वाढती महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली उष्णता आणि प्रदुषणाचे प्रमाण ह्याला जबाबदार कोण आहे?
आहे त्या गोष्टीमध्ये जर माणुस समाधानी झाला असता तर आज कदाचित हे दिवस आले नसते मुळात माणसाने स्वतः लाच हे प्रश्न विचारावे की आजच्या समस्यांना खरं कोण जबाबदार आहे.
आज माणसाला सर्वात मोठा त्रास सहन करावा लागतोय तो दिवसगणीक वाढत चाललेल्या भरमसाठ वाहनांमुळे ज्या गोष्टी वर आता कुठल्याही प्रकारचा ताबाच उरला नाही प्रगतीच्या नावाखाली ओरबाडली जाणारी जंगल आणि विकासाच्या नावाखाली तयार होणारे निक्रुष्ठ दर्जाचे रस्ते त्यात पुरेशी सार्वजनिक वाहतूक अस्तित्वात असताना देखील आपण भरमसाठ वाढणारी अवैद्य आणि वयक्तिक वाहनांना दाखवत असलेली पसंती एक दिवस आपल्याला गिळणार हे नक्की आज देशभरात कित्येक महत्वाच्या वाटांवर वाहतुक कोंडीच्या घडामोडी ऐकायला मिळतात.
शहरामध्ये तर अक्षरशं जिवघेणी वाहतूक कोंडी निदर्शनास येते वाहतुक कोंडी मुळे लाखो लिटर इंधन वाया जातयं हे या सुशिक्षित माणसाला सांगायला नको पण या वाहतुक कोंडी ला जन्म आपल्या अडाणी विचारांनी दिला सार्वजनिक वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी असंख्य खाजगी वाहतुकीला परवानगी देण्यात येते जवळपास ५०-५५ टक्के वाहने हि गरज नसतना सुद्धा रस्त्यावर धावताना दिसत आहेत जी सद्याच्या वाढत्या प्रदुषणाची वाढत्या इंधन दर वाढीची खरी कारणे आहेत.
गरज नसताना अवलंब केलेल्या ह्या भाकड वाहतुकिचा निसर्गावर आणि आपल्या जनजीवनावर नक्कीच परिणाम होताना दिसतं आहे तरीही आपल्याला आपल्या नाकर्तेपणाची जा़णिव होत नाही हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे स्वताच्या हाताने गळा आवळताना आपल्याला त्या गोष्टी चे जरा देखील भान राहिले नाही प्रदुषणाचे प्रमाण आवाक्याचे बाहेर वाढत्या चाललंय निसर्गाचे संतुलन बिघडत चाललंय वाढत्या इंधनाच्या दरांनी आपलं कंबरडं मोडलयं ह्या सगळ्यतुन आपण आता वेळीच धडा घेणे गरजेचे आहे अजुनही वेळ गेली नाही आजचं सावध व्हा निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा ही सेवा आपल्या सुखकर प्रवासा साठीच आहे.
बघा विचार करा…. जीव गुदमरतोय आता…!!
Thank you…