बाईकवरून मुंबई-लंडन-मुंबई प्रवास । २८००० किमी । योगेश आलेकरी

Hosted Open
6 Min Read
yogesh alekari

प्रवास हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात नक्कीच प्रवास करत असते. प्रवासामुळे नवीन अनुभव, नवीन माणसे, नवीन कल्पना, नवीन ऊर्जा, नवीन ताजेपणा इ. प्रवासाचे अनेक फायदे आहेत.

प्रत्येक शेतकरी कुटुंबातील मुलांचे स्वप्न असते कि आपल्याकडे एखादी अशी बाइक असावी ज्यावरून आपण दूरदूरचे प्रवास करू शकू, पण परिस्थितीच्या मर्यादा सांभाळत आणि शेती व इतर जबाबदाऱ्या पार पाडत स्वप्न हि स्वप्नच राहतात. हि मुले फक्त इतरांनी केलेल्या प्रवासाचे आणि त्यांच्या गाड्यांचे फोटो बघून मनातल्या मनात नियोजन करत असतात कि एक दिवस आपणही असे करू.

आणि हेच स्वप्न सत्यात उतरवण्याचे काम एका तरुणाने केले आहे. आणि माझ्यासारख्या अनेकांना परिस्तिथी कशीही असली तरी इच्छाशक्ती असेल तर त्यातूनही मार्ग काढता येतो व जगभर फिरत येते याचा जणू धडाच शिकवला आहे. या बद्दल मी त्यांचे आभार मानतो.

प्रवास करणे म्हणजे जगणे, प्रवास आपल्या मनाचा आणि बुद्धिमत्तेचा विस्तार करतो. आणि अश्याच प्रवासाबद्दल ध्येयवेडे असलेले नाव म्हणजे “योगेश आलेकरी”

यांनी नुकताच मुंबई – लंडन – मुंबई हा अश्यक्यप्राय वाटणारा २८००० किमी चा प्रवास १२६ दिवसात पूर्ण केलाय. आणि ते सध्या भारतात परतले आहेत. या संपूर्ण प्रवासाबद्दल आपण पुढे त्यांच्याच शब्दात थोडक्यात माहिती घेऊ.

स्वप्न पूर्तीच्या अंतिम टप्यात

॰ मुंबई लंडन मुंबई ॰
-एक बेधुंद प्रवास

दिवस १२४ वा ( ५ डिसेंबर)

भटकंती हा मानवी स्वभावाचा गाभा आहे.

अगदी काहीच वर्षापूर्वी मी स्वकमाईची स्वतःची दुचाकी घेतली. त्या आधी मित्रांच्या दुचाकी घेऊन भारत फिरलो. Himalayan घेतली तीच मुळात मुंबई ते सिंगापूर अशी एक छोटीशी आंतरराष्ट्रीय राईड समोर ठेऊन. 2018 साली एक आराखडा बनवला – दर 4 वर्षांनी एक आंतरराष्ट्रीय राईड. अशा 5 राईड चा गोल सेट केला.

पहिला नंबर मुंबई ते सिंगापूर चा होता वर्ष ठरलेलं 2022. आणि कोविड मुळे 1 वर्ष पुढे गेला विषय. व्हिसा कार्यक्रम हाती घेतला म्यानमार ची बॉर्डर उघडण्याची काही चिन्हे दिसेनात. तिथला स्थानिक एजंट संपर्कात होता तो सतत update देत होता. त्याने एके दिवशी सांगितले वर्षभर उघडेल असं वाटतं नाही. मी तर जाणारच होतो सीमा भेदून कुठेतरी.

मग डायरेक्ट 3 नंबर वर असलेला मुंबई – लंडन या प्लॅन ला बढती दिली आणि लागलो कामाला. ऑक्टोबर 2022 मध्ये documentation सुरू केले ते August 2023 ला पूर्ण झाले आणि मी सिमोलंघन करण्यास सज्ज झालो.

पृथ्वी च्या सर्वात मोठ्या भूभागावर रस्ते मार्गे जास्तीत जास्त दूरवर भरारी मारण्याच्या उद्देशाने 24 देशाचा प्लॅन करून निघालो.

प्रचंड अडचणी येत राहिल्या सतत नवी आव्हाने समोर उभी राहत होती जे आडवे येईल ये शक्य त्या मार्गाने आडवे पाडत मी लंडनच्या दिशेने निघालो. मध्य पूर्व आशियाई देशांमध्ये अनंत अडचणी असतात त्यामुळं या मार्गावर माझ्या आधी फक्त दोघेच solo गेलेले ते ही एक जण 2007 आणि दुसरा 2013 त्यामुळे फर्स्ट hand माहिती पदरात पडली नव्हतीच.

तरीही आत्मविश्वासाच्या बळावर मी माझ्या Himalayan सह इराण च्या रस्त्यावर पश्चिमेच्या दिशेने मार्गक्रमण करू लागलो. नियोजित उदिष्ट होते मुंबई ते लंडन आणि सर्व कागदपत्रे तयार केलेली तीही मुंबई ते लंडन समोर ठेऊन.

बघता बघता मी ग्रीस मध्ये पोहचलो ही. उत्साह प्रचंड होता. निघण्याच्या तारीख ते route, बजेट सर्वात च सतत काही ना काही बदल करावे लागत होते. त्यातच एक क्रांतिकारी बदल केला 😎 हा प्लॅन मुंबई लंडन मुंबई असा दुहेरी प्रवास करण्याचे ठरवलं.

प्रचंड मोठं नियोजन लागणार होते अजुन लंडन ही आले नव्हते आणि लंडन ते मुंबई यावर काम सुरू केले २ दिवसात पूर्ण ही केले. ठरलेली सर्व ठिकाणी पाहून लंडन गाठले. अटलांटिक महासागर पहिला, इंग्लिश खाडी पार केली, भुमध्य समुद्र पहिला काळा समुद्र पहिला कास्पियन समुद्र पाहिला मारमरा समुद्र , बॉस्फोरास ची ऐतहासिक खाडी पार केली . जगातील सर्वात बीजी गल्फ गल्फ ऑफ पर्शिया पार केला.

तेहरान, इस्तंबूल, बकु, अथेन्स, बर्न, पॅरिस, लंडन, मुनीच, व्हिएन्ना, व्हेनिस, दुबई अशी जगप्रसिद्ध शहरे Himalayan वर पालथी घातली.

असंख्य सीमा पार केल्या अगणित अनुभव जमा झाले प्रचंड कष्ट उपसले.
शारीरिक क्षमतेचा कस पहिला असंख्य प्रकारचे अन्नसंस्कृती पचवली, २७ देशांचे पाणी प्यायलो.

थेम्स थडीच्या तट्टांना कृष्णेचे पाणी पाजले. १२४ वा आज दिवस दिनांक ५ डिसेंबर. आज केरळ मध्ये आहे. प्रवासात अनंत अडचणी येत राहिल्या त्यापैकी एक म्हणजे गाडी आपली चुकून दुसऱ्या flight मध्ये चढवली गेली आणि कोची ऐवजी जेद्दह ला गेली जे की सौदी मध्ये अगदी पश्चिमेला असलेलं शहर आहे. पुन्हा सूत्र हलवून ती कोचीन ला पोहचेल याची रातोरात व्यवस्था लावली.

मी २ डिसेंबर पासून कोचीन मध्ये वाट बघतोय आणि Himalayan तिकडे सौदी चां फेरफटका मारत बसली आहे. फायनली हिमालयन कोचीन च्या दिशेने निघते आहे उद्या ही ऐतहासिक गाठ भेट घडेल आणि मी पुढे मुंबई लंडन मुंबई च्या शेवटच्या टप्प्या ला सुरुवात करेल.

कोचीन – कर्नाटक – गोवा – कराड – सातारा – पुणे – मुंबई – १५-१६०० km

अशा तऱ्हेनं खालील चित्रात दिसत आहे त्या पाऊलखुणा उमटवायला मला ४ महिने लागले.

एक स्वप्न पाहिलेलं पूर्ण होते आहे.

शेतकरी कुटुंबातून येऊन असले नसते उद्योग करणारा तरुण म्हणून लोकं वेड्यात ही काढतील पण त्याच साठी केला आहे हा अट्टाहास ❤️

मुंबई – लंडन – मुंबई
– एक बेधुंद प्रवास.

mumbai to london mumbai

शेतकरी कुटुंबातून येऊन जग बाईकवरून पालथे घालण्याच्या या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवून अनेकांना आत्मविश्वास दिल्याबद्दल योगेश दादा तुमचे मनापासून आभार.

Instagram: https://www.instagram.com/roaming_wheeels/
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61552659069157

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *