पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम संपूर्ण माहिती | Panhala to Pawankhind Mohim all information

Hosted Open
8 Min Read

पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम:

पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम या वर्षी पावसाळ्यात करायचे नियोजन आखले ते ही जुलै च्या महिन्यात ज्या दिवशी घोडखिंडी मध्ये हा रणसंग्राम झाला त्या पौर्णिमेला. पण पाऊस खूप असल्यामुळे आणि सर्वत्र १४४ कलम लागू असल्यामुळे आम्ही Plan काही दिवस पुढे ढकलला आणि २९ जुलै ते ३१ जुलै दरम्यान करायचे आम्ही निश्चित केले. आम्ही सर्व ट्रेक TTMM ने करतो त्यामुळे लोकांची जमवाजमव, आणि इतर नियोजन सुरू झाले आणि तो दिवस उजडलाच ज्या मोहिमेसाठी वर्षभर लोक उत्साही असतात. खूप जण Cancel झाले खूप नवीन जण ग्रुप मध्ये join झाले.

प्रत्येक वयाचे ट्रेकर्स आपल्या ग्रुप मध्ये होते. १४ सदस्य पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम या मोहिमेला जोडले गेले आणि २९ जुलै रात्री १०/११ वाजता. ४/५ Pickup Points Pune आणि Pcmc मधून ठेवले होते, सर्व सदस्य जमवाजमव केली आणि “गणपती बाप्पा मोरया” “जय भवानी जय शिवाजी” “हर हर महादेव” च्या घोषणा देत पन्हाळा गडाकडे रवाना झालो.

Panhalgad te pawankhin mohin

वाटेत १/२ ठिकाणी चहा साठी थांबलो आणि गाडी जाऊन थांबली ती डायरेक्ट वीर बाजी प्रभु यांच्या स्मारका समोर येथे नतमस्तक होऊन पुढे एका हॉटेल मध्ये फ्रेश होण्यासाठी गेलो थोडा वेळात फ्रेश होऊन पुढे पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम ला निघालो. सुरुवातच रस्ता चुकण्यापासून झाली, उजवीकडे जावे का डावीकडे कारण आधी कोणीही या मोहिमेला गेले नव्हते. मग सर्व जण उजवीकडची वाट पकडून निघालो हळू करत जंगल मार्गे खाली महाळुंगे गावात आलो आणि तिथून पुढे मसाई पठार कडे रवाना झालो.

वाटेत खूप निसरडी वाट होती खूप जण घसरून पडले पण लागले कोणालाही नाही. अर्धा तासात मसाई पठार वर पोहचलो मसाई पठार म्हणजे ९१३ एकर मध्ये पसरलेले टेबल लँडच मसाईच्या एका टोकापासून दुसरे टोक साधारण ४ ते ५ किलोमीटर आहे. या दुसऱ्या टोकावरच मसाई देवीचे छोटेसे एक मंदिर आहे, आणि मुख्य मंदिर थोडेसे पुढे आहे. त्यामुळे या पठाराला मसाई पठार नाव पडले.

Panhalgad te pawankhin mohin

पठारावर जांभ्या दगडात खणलेले जुने तलाव देखील आहेत. एका बाजूला इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील पांडवकालीन लेणी असून अजून त्या आपले अस्तित्व टिकवून आहेत.

मसाई पठार उतरून खाली कुंभारवाडी गावात आलो खूप सदस्य पाठीमागे असल्यामुळे ते येई पर्यंत आम्ही तिथेच थोडा वेळ आराम केला. मसाई पठार साधारण उतरायला २.३० तास लागले. चाफेवाडी, मंडलाईवाडी गाव पार केले, खोतवाडी गावात थोडा वेळ विश्रांती करून सोबत आणलेली न्याहरी केली आणि पुढे निघालो. खूप जण या मोहिमेला वेगवेगळ्या ग्रुप सोबत आले होते सर्व जण आप आपल्या speed नुसार चालत करपेवाडी गावात जिथे मुक्काम करणार होतो तिथे पोहचलो. एकूण २४ km अंतर आम्ही पार केले.

३० जुलै सकाळी ८ वाजता या मोहिमेला सुरुवात केली होती आणि संध्याकाळी ३/३:३० वाजता आम्ही करपेवाडी गावात पोहचलो. साधारणतः ७/८ तासात पहिला टप्पा पार केला. गावात पोहचलो आणि अचानक पाऊस सुरू झाला थोडा वेळ पावसात भिजून जिथे stay करणार होतो तिथे fresh होण्यासाठी गेलो. बाकी members हळू गावात आले. पहिला टप्पा व्यवस्थित पार पडल्यामुळे सर्व जन खूपच आनंदित होते. आमच्या पैकी एकजण नवीन ट्रेकर आला होता त्याचे पाय खुप दुखत असल्यामुळे पुढच्या टप्प्याला आमच्या सोबत न येता बस सोबत डायरेक्ट तो पावनखिंड कडे रवाना झाला.

जेथे मुक्काम केला त्यांनी सर्व व्यवस्थित सर्व सोय करून दिली veg/nenveg जेवण खूपच मस्त बनवले होते सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि खूप थकलो होतो म्हणून लवकरच झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी लवकर उठून पुढचा टप्पा पार करायचा होता. ३१ जुलै पहाटे ४:३० ला सर्व जण उठलो आणि पटकन फ्रेश होऊन नाष्टा आणि चहा घेतला आणि सकाळी ६ वाजता पुढचा टप्पा पार करायला सुरुवात केली.

Panhalgad te pawankhin mohin

काल झालेल्या पावसामुळे रस्ता सर्वत्र निसरडा झाला होता. त्यातून वाट काढत काही ठिकाणी घसरत-पडत या मोहिमेची सुरुवात झाली. पुढे निलगिरीचे जंगल लागले त्याची घनता ही खूप होती, उंचच उंच झाडे या ठिकाणी होते. २ जंगल patch पार करून आंबेवाडी, काळेवाडी, माळेवाडी, पाटेवाडी गावातून पुढे निघालो खूप जण पुढे निघून गेले होते मागे फक्त आम्ही ४ जणच होतो.

आत्तापर्यंत शरीरात काहीच जीव उरला नाही चालून तरीही ही पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम पार करायचीच होती म्हणून हळूहळू पुढे निघालो पांढरे पाणी गावातील शिवकालीन विहीर ही महाराजांनी बांधून दिली असे म्हणतात ति बघून पुढे निघालो शेवटचे ४ km चालणे खूपच मुश्किल झाले होते पायाला छोटे-मोठे फोडे आले होते, जवळपास सगळ्यांची हीच अवस्था होती. शेवटी त्या ठिकाणी कसेही करून पोहचलो आणि दुसरा २४ km चा टप्पा साधारणतः ६ तासात यशस्वी पणे पार केला.

पावन खिंडीचे दर्शन घेऊन येथे नतमस्तक झालो आणि या ठिकाणी झालेली लढाईचे क्षण कसे असेल याचा विचार करत तो काळ आठवू लागलो, आणि नकळतच डोळ्यात अश्रु आणि अंगावर शहारे आले होते. आम्ही सारे खरच खूप भाग्यवान होतो जे या पावन झालेल्या भूमीला भेट देण्यासाठी आलो होतो. आणि या ठिकाणाच्या सर्व आठवणी मनात आणि कॅमेरा मध्ये साठवून पुनः पुणे कडे रवाना झालो. सर्वांच्या साथीने हा ट्रेक यशस्वी पार पडला त्या बद्दल सर्वांचे आभार.

Panhalgad te pawankhin mohin

पावनखिंड ची थोडक्यात माहिती:

दोन उंच डोंगरांच्या मध्ये असलेल्या या खिंडीतील वाट इतकी अरुंद आहे की येथून एकावेळी फक्त एक घोडेस्वार पार जाऊ शकतो. हत्ती, मेणे किंवा इतर वाहनांनी ही खिंड पार करणे अशक्य आहे. यामुळे या खिंडीला घोडखिंड असे नाव आहे. १३ जुलै, १६६० रोजी पन्हाळगडाला पडलेल्या वेढ्यातून निसटून निघालेले छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात असताना सिद्दी मसूदच्या सैन्याने त्यांना येथे गाठले.

तेव्हा झालेल्या निकराच्या लढाईत बाजी प्रभू देशपांडे, त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे व त्यांच्यासह मोजक्या सैनिकांनी ही खिंड जबरी लढवली व आदिलशाही सैन्याला थोपवून धरले. यामुळे शिवाजी महाराजांना विशाळगड गाठणे शक्य झाले. यात प्रभू देशपांडे भावंडे व त्यांच्यासह मागे थांबून शेवटचा एल्गार (लास्ट स्टॅन्ड) करणाऱ्या त्यांच्या बव्हंश सैन्याने मरण पत्करले. त्यांच्या या बलिदानाची आठवण म्हणून या खिंडीला पावनखिंड असे नाव दिले गेले.

इतिहास:

इ.स. २ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुद्धा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिद्धी गाफील राहिला. शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिद्दी जौहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला. शिवा काशीदचे खरे रूप कळल्यावर सिद्धीने त्यांस ठार केले, तोवर छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते.

छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून,विशाळगडाकडे निसटून गेल्याचे समजल्या- नंतर, सिद्दीने जोहरने सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले, अशावेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले. घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली, शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू, फ़ुलाजी, संभाजी जाधव, बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला.

महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा आवाज झाला. आणि इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऐकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला. या युद्धात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले. बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली. आणि त्याचबरोबर बाजी प्रभू, फुलाजी आणि बांदल सेनेचा पराक्रम, त्यांचे शौर्य आणि बलिदान अलौकिक आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *