घनगड हा मुळशी तालुक्यातील एकोले गावाजवळ आहे. खरं पाहिले तर घनगडाचा असाकाही फारसा इतिहास ऐकला नाहिये. पण तिथल्या स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की घनगड हा किल्ला कोलाड, पेन, रोहा कडून म्हणजेच समुद्र तटाकडून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी बनवला असावा.
Route:
पुण्यापासून घनगड सुमारे 108 km आहे. पुण्यातून एकोले गावात पोहचण्यासाठी आपण ताम्हिणी घाट, मुळशी मार्गे, जीवन-तुंगी मार्गे (तुंग-तिकोना) किंवा लोणावळा मार्गे जाऊ शकतो.
ताम्हिणी घाट मार्गे जातांना तुम्हाला मध्ये देवकुंड, कुंडलिका वॅली, निवे, आडगाव पाझरे, भांबर्डे, मग एकोले असा यावं लागेल.
गडाच्या मागे तैला-बैला, डाव्या बाजूस सुधागड, तर डाव्या बाजूस ताम्हिणी आहे. गडाच्या पायथ्याशी एकोले गाव आहे. जिथे राहण्याची व खाण्याची सोय आपण गावकऱ्यांकडे करू शकतो. एकोले गावाच्या लागतच एक सुंदर असा धबधबा आहे. ज्याचं नाव काळ-धोंडे धबधबा ( Blackstone waterfall) असे आहे. धबधब्याची उंची जरा कमी असली तरी २-३ बाजूने पाणी पडतांना दिसते.
गडावर बघण्यासारख म्हणजे आजूबाजूला दिसणारा सूंदर असा परिसर. गडावर जातांना तुम्हाला एकोले गावातून जावं लागेल. थोडं चढून झाल्यावर वाटेच्या जवळच २ मंदिर दिसतात. त्यातील एक मंदिर म्हणजे “वेताळ देवाचे”, अजून थोडं चढून झाल्यावर एक मंदिर लागते, कदाचित ते महादेवाचे असेल.
मंदिराला बाहेरून लॉक असल्या मुळे आम्हि तिकडे जायचं टाळले. कारण अजून आम्हाला खूप स्पॉट्स बघायचे होते, आणि आमच्या कडे फक्त तेवढा एक दिवस होता.
तिथूनच वर एक खिंड आहे म्हणजे घनगड आणि बाजूच्या डोंगराला जोडणारी एक दरी. तिथुन उजव्या बाजूस आपण गडाच्या पहिल्या दरवाजा जवळ पोहचतो. जो की अजूनही आहे त्याच स्थितीत ताठ पणे उभा आहे. गडाकडे बघून वाटतें की १७०० च्या सुमारास गडाचे बांधकाम झाले असावे.
घनगड ट्रेक माहिती
ट्रेकची लेव्हल व वेळ
ट्रेक किती वेळ लागतो?
एकोले गावातून घनगड किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचायला साधारणतः ४५ ते ६० मिनिटं लागतात.ट्रेक सोपा आहे का मध्यम? कोणासाठी योग्य?
हा ट्रेक सोप्या ते मध्यम श्रेणीत मोडतो. थोडंसं चढावाचं अंतर आहे, पण विशेष तांत्रिक कौशल्य लागत नाही. प्रथमच ट्रेक करणाऱ्यांसाठी पण योग्य आहे, विशेषतः पावसाळ्यात निसर्ग अनुभवायला.
गाइडची गरज आहे का?
स्थानिक गाइड लागतो का? वाटा स्पष्ट आहेत का?
एकोले गावातून ट्रेक सुरू होतो, आणि वाटा स्पष्ट आहेत. गावातील लहान मुलं किंवा स्थानिक गाइड छोट्या फीमध्ये मदतीला येतात. पहिल्यांदाच जात असल्यास गाइड घेणं चांगलं.
बेस्ट सीझन
कुठल्या ऋतूमध्ये जाणं अधिक छान ठरेल?
जुलै ते फेब्रुवारी हा काळ घनगडला भेट देण्यासाठी सर्वोत्तम.पावसाळ्यात (जुलै-सप्टेंबर) हिरवाई, ढगाळ वातावरण, आणि धबधब्यांचा भरभराट अनुभवायला मिळतो.
हिवाळ्यात (ऑक्टोबर-फेब्रुवारी) हवामान आल्हाददायक असतं, ट्रेकिंगसाठी उत्तम.
पावसाळ्यात काळ-धोंडे धबधब्याचं सौंदर्य अधिक खुलतं का?
हो, पावसाळ्यात काळ-धोंडे धबधबा पूर्ण जोरात असतो. तीन बाजूंनी पडणारे पाण्याचे प्रवाह हे खूपच सुंदर दृश्य असतं. मोठा जलप्रपात नसला तरी फोटोसाठी एकदम योग्य स्पॉट आहे.
GPS लोकेशन / पार्किंग माहिती
एकोले गावाचं Google Map लोकेशन
गाड्या पार्क करण्याची सोय आहे का?
एकोले गावात ट्रेकच्या सुरूवातीस गाड्या पार्क करण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध आहे. गावकरी मदतीला येतात आणि काहीजण थोडीफार पार्किंगची फी घेतात.
इतर जवळची ठिकाणं
सुधागड, तैला-बैला हे इथून ट्रेकिंगसाठी जोडता येऊ शकतं का?
हो, घनगड किल्ला हा सुधागड, तैला-बैला यांच्या अगदी जवळ आहे. तैला-बैला हे क्लायम्बिंगसाठी प्रसिद्ध, तर सुधागड एक मोठा आणि इतिहासाने समृद्ध किल्ला आहे.घनगडला जोडून एक दिवसात अजून कोणती ठिकाणं बघता येतील?
काळ-धोंडे धबधबा (Blackstone waterfall)
देवकुंड धबधबा (थोडा वेळखाऊ पण अप्रतिम)
कुंडलिका व्हॅली व्यू पॉइंट
सुधागड किल्ला (जर वेळ असेल तर)
फोटोज / ट्रेकिंग टिप्स
फोटो सुचवणं:
गडावरून दिसणारी आजूबाजूची दरी व पर्वतरांगा
काळ-धोंडे धबधब्याचा २-३ बाजूंनी पडणारा प्रवाह
एकोले गाव आणि वाटेतील मंदिर
ट्रेकसाठी आवश्यक गोष्टी:
भरपूर पिण्याचं पाणी
हलके स्नॅक्स (सुकामेवा, बिस्किटं, फळं)
चांगल्या grip असलेले शूज
रेनकोट / पोंचो (पावसाळ्यात)
चार्ज केलेला फोन व Powerbank
स्थानिकांशी आदरपूर्वक संवाद – जेवण/राहणं तेच सांभाळतात.
लेखन:- सागर कोळी