घनगड: पुण्याजवळील असा किल्ला जो खास कोकणातून येणाऱ्या शत्रूंवर लक्ष्य ठेवण्यासाठी बांधलाय.

Hosted Open
2 Min Read
Ghangad

घनगड

घनगड हा मुळशी तालुक्यातील एकोले गावाजवळ आहे. खरं पाहिले तर घनगडाचा असाकाही फारसा इतिहास ऐकला नाहिये. पण तिथल्या स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की घनगड हा किल्ला कोलाड, पेन, रोहा कडून म्हणजेच समुद्र तटाकडून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी बनवला असावा.

पुण्यापासून घनगड सुमारे 108 km आहे. पुण्यातून एकोले गावात पोहचण्यासाठी आपण ताम्हिणी घाट, मुळशी मार्गे, जीवन-तुंगी मार्गे (तुंग-तिकोना) किंवा लोणावळा मार्गे जाऊ शकतो.

ताम्हिणी घाट मार्गे जातांना तुम्हाला मध्ये देवकुंड, कुंडलिका वॅली, निवे, आडगाव पाझरे, भांबर्डे, मग एकोले असा यावं लागेल.

गडाच्या मागे तैला-बैला, डाव्या बाजूस सुधागड, तर डाव्या बाजूस ताम्हिणी आहे. गडाच्या पायथ्याशी एकोले गाव आहे. जिथे राहण्याची व खाण्याची सोय आपण गावकऱ्यांकडे करू शकतो. एकोले गावाच्या लागतच एक सुंदर असा धबधबा आहे. ज्याचं नाव काळ-धोंडे धबधबा ( Blackstone waterfall) असे आहे. धबधब्याची उंची जरा कमी असली तरी २-३ बाजूने पाणी पडतांना दिसते.

गडावर बघण्यासारख म्हणजे आजूबाजूला दिसणारा सूंदर असा परिसर. गडावर जातांना तुम्हाला एकोले गावातून जावं लागेल. थोडं चढून झाल्यावर वाटेच्या जवळच २ मंदिर दिसतात. त्यातील एक मंदिर म्हणजे “वेताळ देवाचे”, अजून थोडं चढून झाल्यावर एक मंदिर लागते, कदाचित ते महादेवाचे असेल.

मंदिराला बाहेरून लॉक असल्या मुळे आम्हि तिकडे जायचं टाळले. कारण अजून आम्हाला खूप स्पॉट्स बघायचे होते, आणि आमच्या कडे फक्त तेवढा एक दिवस होता.

तिथूनच वर एक खिंड आहे म्हणजे घनगड आणि बाजूच्या डोंगराला जोडणारी एक दरी. तिथुन उजव्या बाजूस आपण गडाच्या पहिल्या दरवाजा जवळ पोहचतो. जो की अजूनही आहे त्याच स्थितीत ताठ पणे उभा आहे. गडाकडे बघून वाटतें की १७०० च्या सुमारास गडाचे बांधकाम झाले असावे.

लेखन:- सागर कोळी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *