रायगडावर काय पाहावे? | What to see on Raigad?

Hosted Open
3 Min Read

रायगडावर काय पाहावे? : रायगडावरील पाहण्यासारखी २५ ठिकाणे – आपले आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या शौर्याने आणि नेतृत्वगुणांनी मराठा साम्राज्याला अभूतपूर्व उंचीवर नेले. रायगड किल्ला हा त्यांच्या साम्राज्याचा एक प्रमुख केंद्रबिंदू होता. रायगड हा किल्ला शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि स्वराज्य स्थापनेचे प्रतीक आहे. येथेच त्यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याच्या स्वप्नांची मूर्त रूप दिली. रायगडच्या अभेद्य किल्ल्याने मराठ्यांच्या शौर्याची गाथा लिहिली आणि आजही तो इतिहासाच्या पानांमध्ये अजरामर आहे.

ज्यांनी लहानपणापासूनच स्वराज्य उभारण्याचे स्वप्न पहिले आणि ते सत्यात उतरवले अश्या या राजाच्या सानिध्याने पावन असलेल्या किल्ल्याला आयुष्यात एकदा तरी भेट देणे गरजेचे आहे. अश्याच या रायगडाला भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. या किल्ल्यावर पाहण्यासारखे खूप आहे पण त्यापैकी गडावरील पहाण्यासारखी प्रमुख ठिकाणे कोणती याबाबद्दल आपण पुढे माहिती घेऊ.

रायगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे:

१. पाचाडचा जिजाबाईंचा वाडा
२. खुबलढा बुरूज
३. नाना दरवाजा
४. मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा
५. महादरवाजा
६. चोरदिंडी
७. हत्ती तलाव
८. गंगासागर तलाव
९. स्तंभ
१०. पालखी दरवाजा
११. मेणा दरवाजा
१२. राजभवन
१३. रत्‍नशाळा
१४. राजसभा
१५. नगारखाना
१६. बाजारपेठ
१७. शिरकाई देऊळ
१८. जगदीश्वर मंदिर
१९. महाराजांची समाधी
२०. कुशावर्त तलाव
२१. वाघदरवाजा
२२. टकमक टोक
२३. हिरकणी टोक
२४. वाघ्या कुत्र्याची समाधी
२५. रायगडावरील अश्‍मयुगीन गुहा

रायगड किल्ला हा सह्याद्री पर्वताच्या शिखरावर असलेला एक भव्य किल्ला, या मुळे मराठा साम्राज्याची भव्यता आणि तेज समजते. समुद्रसपाटीपासून 1,356 मीटर उंचीवर असलेला, रायगड किल्ला तीन बाजूंनी खोल दऱ्यांनी वेढलेला आहे. त्याच्या मोक्याच्या स्थानामुळे तो अक्षरशः अभेद्य बनलाय. किल्ला त्याच्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे, हिरोजी इंदुलकर हे शिवाजीचे मुख्य अभियंते होते. किल्ल्यामध्ये मार्ग, पाण्याचे टाके, धान्याचे कोठार आणि राहण्याचे ठिकाण यांचे एक उत्तम नेटवर्क आहे.

रायगडावर कसे जावे?

रायगडावर जाण्यासाठी २ मार्ग आहेत, ते पुढील प्रमाणे.
१. पायवाट
२. रोपवे Ropeway

रायगडाचे पुण्यापासून अंतर किती?

पुणे तो रायगड किल्ला: १३५ km
पुणे – ताम्हिणी – निजामपूर – रायगड
(पुण्याहून रायगडला सातारा मार्गेही जात येते पण या मुळे अंतर आणि वेळ वाढतो.)

रायगड किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ कोणती?

रायगड किल्ल्याला भेट देण्यासाठी हिवाळ्याच्या महिन्यांत (ऑक्टोबर ते फेब्रुवारी) हि उत्तम वेळ आहे. कारण या पाउसाळ्यानंतच्या या काळात हवामान ट्रेकिंगसाठी उत्तम असते, त्याचसोबत आकाश निरभ्र असल्याने हिरव्यागार निसर्ग सौन्दर्याचा आनंद मनमुरादपणे घेता येतो.

पावसाळ्यामध्ये जर रायगडला जाणार असाल तर हवामानाचा अंदाज आणि प्रशासनाची परवानगी घेऊन जाणे योग्य राहील. कारण रायगड सह्याद्री पर्वत रांगेत येत असल्याने इथे प्रचंड पाऊस पडत असतो, त्याच सोबत अचानक ढगफुटी सदृश्य परिस्थितीही निर्माण होते.

महत्वाची सूचना: रायगड किल्ल्याला वर्षभर भेट दिली जाऊ शकते, परंतु काही तीव्र हवामानामुळे ट्रेक थोडासा आव्हानात्मक होऊ शकतो. तुमच्या सहलीचे नियोजन करण्यापूर्वी नेहमी हवामानाचा अंदाज तपासा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *